मोहाडी (धुळे )ते रानमळा सावळदा रेल्वे अंडर पास गेट मध्ये जास्त प्रमाणात पाणी साठल्याने नागरिकांचे होत आहेत हाल. धुळे…(रानमळा)… धुळे तालुक्यातील रानमळा, तिखी,सावळदे या ग्रामीण भागातील गावांमधील नागरिकांना धुळे या शहरात आपल्या शासकीय कामांसाठी नेहमी जावे लागते. तसेच कॉलेजच्या विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेण्यासाठी धुळे शहरात जावे लागते. अनेक विद्यार्थिनींना शिक्षण घेण्यासाठी धुळे शहरात जाताना धुळे रेल्वे प्रशासनाच्या वतीने तयार करण्यात आलेले मोहाडी सावळदा गेट नंबर 20 अंडर पास सावळदा या गेटमध्ये खाली प्रचंड पाणी साचलेले असते. यातून स्कूटर, मोटरसायकल व पायी जाणारे नागरिकांना गुडघ्या इतके पाण्यातून प्रवास करावा लागतो हा प्रवास करताना अतिशय धोकेदायक प्रवास करण्याचा अनुभव दैनंदिन जीवनात येत आहे. शालेय विद्यार्थिनी याच पाण्यातून आपल्या स्कूटर घेऊन जात असतात त्यांना त्या स्कूटरमध्येच पाण्यात बंद पडतात पाण्याची प्रचंड त्यांना भीती वाटते आणि त्यातल्या त्यात तो खाली बोगदा असल्याने त्या ठिकाणी पूर्णतः सुनसान जागा असते. यातून स्त्रियांना व शाळकरी मुलींना गाडी पाण्यात जाताना बंद पडल्यावर प्रचंड त्रास व मनात भीती वाटत असते तसेच या ठिकाणी गाडी स्लीप होण्याची जास्त भीती असते. रेल्वे प्रशासनाचा ढिसाळ कारभारातून या बोगद्यामध्ये जो रेल्वे प्रशासनाने 20 नंबर दिलेला आहे तो धोक्याचा असा हा मार्ग नेहमी रानमळा ग्रामस्थांना वाटत आहे. काही महिन्यांपूर्वी एका रहिवाशाचा हात देखील याच ठिकाणी तुटलेला आहे. येथील पाणी उपसण्याची जबाबदारी ही पूर्णतः रेल्वे प्रशासनाची असताना त्याकडे पूर्णतः दुर्लक्ष होताना दिसून येत आहे. आज दिनांक सहा जानेवारी 2026 रोजी सकाळपासून तर आज संध्याकाळी साडेचार वाजेपर्यंत पाणी उपसले गेलेले नाही. त्यामुळे या बोगद्यात प्रचंड प्रमाणात पाणी साठलेले असून अनेकांनी तक्रार म्हणून रेल्वे प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना फोन केलेले आहेत प्रत्यक्ष परिस्थितीचे फोटो देखील पाठवलेले आहेत मात्र त्यावर प्रत्येक जण खोवर खो देत हे माझे काम नाही अशीच भूमिका निभावताना दिसत आहेत. रानमाळा, तिखी, इंदिरा नगर,सावळदा या गावाच्या लोकांना धुळे येथे जाताना याचा प्रचंड प्रमाणात त्रास होताना दिसून येत आहे. मागील महिन्यात साप्ताहिक पोलीस विजन कडे देखील याची तक्रार आली होती परंतु संपादक या नात्याने तेव्हा प्रथम फोन करून सांगितल्यावर पाणी तात्काळ उपसणे करून दिले होते. मात्र आज अनेक नागरिकांनी पुन्हा ती समस्या पोलीस व्हिजन कडे पुराव्यानिशी पाठवलेली आहे. संबंधित रेल्वे प्रशासन धुळे यांनी ज्यांच्यावर पाणी उपसण्याची जबाबदारी दिली आहे त्यांच्यावर तात्काळ कार्यवाही करावी अशी जनतेकडून मागणी होत आहे अन्यथा या ठिकाणी या आंदोलन करण्याचा देखील त्यांनी इशारा बोलून दाखवलेला आहे. जनतेची सुरक्षा ठेवणे ही प्राथमिक स्वरूपाची जबाबदारी रेल्वे प्रशासनाने लक्षात घेऊन हा प्रश्न तात्काळ मार्गी लावावा अशी शेवटची विनंती परिसरातील नागरिकांनी केली आहे यापुढे मात्र मोठे आंदोलन करण्याचा इशारा देखील त्यांनी दिलेला आहे.*




