साप्ताहिक प्रजा न्याय चा प्रकाशन सोहळा धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघ कार्यालयात उत्साहात संपन्न✒️✒️✒️✒️✒️✒️✒️✒️✒️✒️✒️✒️✒️✒️✒️✒️✒️✒️✒️✒️✒️✒️✒️ धुळे…
धुळे शहर व धुळे जिल्हा हा वृत्तपत्रांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो.साप्ताहिक असो की दैनिक हा लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून पत्रकारिता चा आधारस्तंभ आहे.आपल्या लोकशाही बळकटीसाठी व ती अबाधित राहण्यासाठी पत्रकारितेचा मोठा सिंहाचा वाटा आहे. सामान्य जनतेचा आवाज म्हणजेच वृत्तपत्रातून दिला जाणारा संदेश असतो. श्रमिक कष्टकरी यांच्या वरील अन्यायाला छोटे साप्ताहिक वृत्तपत्र प्रथम स्थान देणारे एक हक्काचे गरिबांचे व्यासपीठ ठरते. आज अशाच एका नव्या प्रजा न्याय म्हणून साप्ताहिकाचे प्रथम प्रकाशाचा सोहळा धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या कार्यालयामध्ये मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला. धुळे शहराचे अभ्यासु माजी आमदार, अण्णासाहेब अनिल गोटे यांचे माजी स्वीय सहाय्यक संजय अण्णा कुसळकर यांनी आज आपल्या हक्काचे प्रजा हे साप्ताहिक सुरू केले असून त्याचे ते मुख्य संपादक आहेत. या साप्ताहिकाचे ब्रीद वाक्य म्हणजे एकच ध्येय एकच आवाज असे असून एक स्वच्छ ध्येय घेऊन सामान्य प्रजेसाठी न्याय देण्याचे हे एक लेखणीचे व्यासपीठ साप्ताहिक म्हणून निर्माण झाले आहे.
त्याचे प्रकाशन आज सोमवार दिनांक 19/01/2026 रोजी दैनिक श्रमराज्य चे मुख्य संपादक अतुल पाटील, पोलिस व्हिजन धुळे चे मुख्य संपादक प्रल्हाद साळुंके, जेष्ठ पत्रकार मोरे सर, जेष्ठ पत्रकार बाळासाहेब विभांडीक या प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते साप्ताहिक प्रजा न्याय चे प्रकाशन दिमाखदार करण्यात आले. यावेळी मान्यवरांचा सत्कार साप्ताहिक प्रजा न्याय चे मुख्य संपादक संजय अण्णा कुसळकर यांच्या हस्ते शाल पुष्पगुच्छ देऊन करण्यात आला. यावेळी पत्रकारिता क्षेत्राचे आजची भूमिका आणि आजचे स्थान याबाबत प्रमुख पाहुण्यांनी आपले अनुभव कथित केले.
वृत्तपत्र चालवणे हे तेवढे सोपे नाही अनेक प्रकारच्या अडचणींना सामोरे जाण्याचे काम वृत्तपत्राच्या संपादक यांना करावे लागते. अनेक प्रकारच्या खोट्या केसेस देखील दाखल केल्या जातात. पण त्यावरून त्यांना प्रत्येक संकटाला सामोरे जाऊन आपले वृत्तपत्र अबाधित ठेवण्याचे मुख्य काम संपादक हे करत असतात. त्यातून मार्ग काढून आपले वृत्तपत्र सातत्याने चालवत पत्रकारिता एक वाट मोकळी करून पुन्हा नव्याने तग धरून आपले वृत्तपत्र सुरू ठेवण्यासाठी धडपड ही कायम करावीच लागते. यातून खरी लोकशाही वाचत असते. सामान्य जनतेच्या विविध समस्या या सोडवण्याचे कार्य साप्ताहिक वृत्तपत्रांमधून केले जाते. तो पत्रकारिता एक आत्मा आहे.
प्रजा न्यायचे संपादक संजय अण्णा कुसळकर यांनी पूर्वी वडार समाज हे साप्ताहिक सुरू केले होते त्या साप्ताहिक चे प्रकाशन पत्रकारिता चे बादशाह म्हणून ओळखले जाणारे दैनिक मतदार चे तत्कालीन संपादक कै.जगतराव सोनवणे, पोलिस व्हिजन धुळे चे मुख्य संपादक प्रल्हाद साळुंके यांच्या हस्ते झाले होते.परंतु काही कारणास्तव ते बंद करण्यात आले व आज त्याच आपल्या देखणी च्या अनुभवातून साप्ताहिक प्रजा न्याय हे साप्ताहिक पुन्हा सुरू करण्यात संपादक संजय यांना कुसळकर यांनी हिम्मत केली आहे. या साप्ताहिकांमधून गोरगरीब जनतेचे प्रश्न मांडण्यासाठी व विविध समस्यांना वाचा फोडण्यासाठी प्रामाणिकपणे पत्रकारिता करण्याचा मानस त्यांनी बोलून दाखवला सुरुवातीला प्रजा न्याय साप्ताहिक चे प्रकाशन बाबत प्रास्ताविक पोलीस व्हिजन चे मुख्य संपादक प्रल्हाद साळुंके यांनी केले. आपले मनोगतात संपादक दैनिक श्रमराज्य चे अतुल पाटील यांनी आपले अनुभव कथित केले.तर जेष्ठ पत्रकार मोरे सर यांनी पत्रकारितेतील अडीअडचणी व लोकशाही बाबत सविस्तर माहिती दिली यावेळी संपादक संजय कुसळकर यांचे मित्र पत्रकार तसेच आप्तेष्ट मोठ्या संख्येने उपस्थित होते. बातमी पत्र वाचा सा पोलिस व्हिजन धुळे*





