चिमुकलीवर अत्याचार करून दगडाने ठेचून मारणाऱ्या नराधमाला फाशी द्या समाजाकडून होते मागणी. नाशिक…. नासिक जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यात डोंगराळे येथे चार वर्षाच्या बालिकेवर अमानुष अत्याचार करून तिची हत्या करण्यात आल्याची घटना तीव्र संताप जनक घडलेली आहे. याप्रकरणी संशयित आरोपीला फाशीची शिक्षा द्यावी तसेच हा खटला जलद गती न्यायालयात चालवण्यात यावा या मागणीसाठी सुवर्णकार समाजातर्फे शहरातून निषेध मूक मोर्चा काढण्यात आला तसेच निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले मोर्चात सुवर्णकार समाजाचे अध्यक्ष चंद्रकांत सोनार भाजप महिला मंडळ बेटी बचाव अभियानाच्या अध्यक्षा अल्फा अग्रवाल भाजप महिला आघाडीच्या प्रदेश अध्यक्ष जय श्री अहिरराव नितीन विसपुते जगदीश देवपूरकर सुनील देवरे अजय नाशिककर दीपक वारकर महेंद्र विसपुते रंजना विसपुते ताराबाई वाखारकर आदी सहभागी झालेत मोर्चाला संत नरहरी महाराज यांच्या स्मारकाला अभिवादन करून प्रारंभ झाला जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर निदर्शने देखील करण्यात आली मोर्चात सहभागी झालेल्यांनी घटनेचा निषेध करत आरोपीला फाशी झालीच पाहिजे अशी मागणी केली आहे डोंगराळे येथील ही घटना म्हणजे आज सर्वात क्रूर व कधी कुणाला माफी देण्याची ही घटना नाही सदर घटनेच्या बाबत साप्ताहिक पोलीस व्हिजन ने तीव्र या नराधमाचा निषेध नोंदवला आहे. तसेच साक्री तालुक्यातील निजामपूर पोलीस स्टेशन मध्ये देखील निवेदन देण्यात आले आहे– मालेगाव तालुक्यातील डोगराळे येथे 5 वर्षीय निरागस बालिकेवर झालेल्या अमानुष अत्याचार आणि निर्दयी हत्येच्या घटनेविरुद्ध संतापाची लाट उसळली आहे. या प्रकरणातील आरोपीवर जलद गती न्यायालयात खटला चालवून तात्काळ फाशीची शिक्षा द्यावी, अशी मागणी निजामपूर–जैताणे आहिर सुवर्णकार समाजाच्या वतीने करण्यात आली.
या मागणीसाठी समाजाच्या सदस्यांनी मुक मोर्चा काढत निजामपूर पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस उपनिरीक्षक यांना निवेदन सादर केले. निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, केवळ 5 वर्षांच्या चिमुकलीवर झालेल्या अत्याचार आणि खुनामुळे परिसरात तीव्र भीती, असुरक्षितता आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.
समाज व ग्रामस्थांनी या घटनेचा जाहीर निषेध करत आरोपीला फाशीची शिक्षा व्हावी, अशी मागणी पोलीस ठाण्याचे स.पो.निरीक्षक मयुर भामरे यांच्याकडे लेखी स्वरूपात करण्यात आली.
मुक मोर्चात समाज अध्यक्ष नंदकुमार विसपुते, तुषार सोनवणे, अरविंद जाधव, छोटू जाधव, घनशाम वाघ, कल्पेश जाधव, प्रतिक विसपूते, संतोष विसपूते, महेश सोनवणे, राजेंद्र वाघ, चंद्रकांत विसपुते, विवेक वाघ, कमलेश वाघ, मनोज सोनवणे, राहुल वाघ, आकाश सोनवणे, रूषी थोरात, विपूल विसपुते, धर्मराज विसपुते, संजय विसपुते, संजय बागूल, शातीलाल भदाणे, पत्रकार रघुवीर खारकर, हेमंत महाले तसेच मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.
घटनेतील आरोपीविरुद्ध तातडीने कठोर कारवाई करण्याची मागणी समाजाच्या वतीने करण्यात आली आहे. या लहान चिमुकली साठी असेच म्हणावे लागेल मालेगावजवळील डोंगराळे गावात घडलेली चार वर्षांच्या चिमुरडीवरील अत्यंत क्रूर घटना ही केवळ एका घराची शोकांतिका नाही—ती संपूर्ण समाजाच्या असुरक्षित होत चाललेल्या मनाची किंकाळी आहे. आज आपण कितीही आधुनिक झालो, कितीही सुरक्षिततेच्या घोषणा केल्या, तरी अशा घटना एक कठोर सत्य समोर आणतात: मुलींचं जगणं आजही असुरक्षित आहे… आणि त्यांचं रक्षण करण्यात आपण कुठेतरी कमी पडतोय.
ती फक्त चार वर्षांची होती.
अजून नीट बोलतही नसेल…
जग तिच्यासाठी छोट्या खेळण्याइतकंच होतं…
घर तिच्यासाठी सुरक्षित पांघरूण होतं…
आणि तेच पांघरूण एका क्षणात तुटून पडलं.
लहानपण म्हणजे निरागसता, हसू, पहिलं पाऊल, पहिला शब्द, आणि आई-वडिलांच्या आयुष्याची सर्वात सुंदर सुरुवात.
पण या छोट्याशा जीवाचे सर्व हक्क एका क्षणात हिरावले गेले.
ती एका आईच्या कुशीचा श्वास होती,
एका वडिलांच्या भवितव्याची पहिली कविता होती,
एका घराचा आनंद होती.
आणि आज त्या घरात शांतता नाही…
तेथं फक्त हंबरडा आहे, वेदना आहेत, आणि तिच्या छोट्या पावलांच्या आठवणी आहेत.
डोंगराळे गाव आज रडतंय,
पण तेवढंच रागावलंयही.
कारण हा प्रसंग फक्त त्या घराचा नाही
हा प्रत्येक पालकासाठी दिलेला कठोर इशारा आहे.
आपण आपल्या मुलींना जपण्यासाठी किती जागरूक आहोत?
त्यांना सुरक्षित ठेवण्यासाठी किती सजग आहोत?
आपल्या समाजात कोणत्या मानसिकतेची लोकं वाढत आहेत?
आणि सर्वात महत्त्वाचं
अशा राक्षसी प्रवृत्तीला समाज किती कडक उत्तर देणार आहे?
मुलींचे रक्षण हे केवळ कायद्याचं काम नाही
ते समाजाचं, पालकांचं, आणि प्रत्येक जागरूक नागरिकाचं कर्तव्य आहे.
जिथे मुली सुरक्षित नसतात, तिथं कोणतीही प्रगती, कोणताही विकास अर्थहीन ठरतो.
त्या चिमुरडीचा आवाज आता कायमचा थांबला असेल,
पण तिने मागे ठेवलेला प्रश्न अजूनही घुमतोय:
“माझ्यासारखं आणखी किती जणांसोबत असं होणार?”
हा लेख तिच्या वेदनेची आठवण नाही
हा लेख समाजाच्या अंतरात्म्याला हलवण्याचा प्रयत्न आहे.
जागं व्हायची हीच वेळ आहे.
आणि लेकींच्या सुरक्षिततेसाठी कठोर, निर्भय आणि ठाम भूमिका घेण्याची गरज आहे.
ती गेली…
पण ती सोडून गेलेला प्रश्न समाजाने उत्तर मिळेपर्यंत शांत राहता कामा नये.अशा राक्षसांसाठी शिक्षा नव्हे,
तर उदाहरण बनवणारी शिक्षा आवश्यक आहे
ज्याचं नाव ऐकूनही पुढचा कोणी ही नीचता करण्याचं धाडस करणार नाही.
🕯️ तिच्या आठवणींना आदर. आणि न्यायासाठी
न थांबणारी भूमिका. समाजातील प्रत्येक घटकाने घेतली आहे सा पोलिस व्हिजन वतीने मयत बालिकेस भावपूर्ण श्रद्धांजली


