
साक्री… साक्री तालुका तसा पुरोगामी विचारांचा तालुका म्हणून ओळखला जातो. मात्र याच तालुक्यामध्ये भोंदू बाबाच्या नादात दुहेरी खून झाल्याची घटना घडल्याने एकच खळबळ उडाली आहे. एकिकडे नाशिकच्या भोंदू बाबा अशोक खरात चे प्रकरण सर्वत्र गाजत असताना साक्री तालुक्यामध्ये पुन्हा भोंदू बाबा कडून हत्या झाल्याची घटना घडल्याने या महाराष्ट्रात नेमके चालले तरी काय?? असा प्रश्न निर्माण झालेला आहे. दररोज अल्पवयीन मुलींवर बलात्काराच्या घटना वाढल्या आहेत. भोंदू बाबांपासून कोणाचे प्रकार वाढले आहेत. राज्याचे सक्षम मुख्यमंत्री समजले जाणारे देवा भाऊ यांनी राज्याचे गृह खाते त्यांच्याकडे ठेवले असून कायद्याचा धाक कुणाला राहिलेला नाही. ठोस निर्णय ठोस कारवाई ही गुन्हेगारांना होत नसल्यामुळे असे प्रकार महाराष्ट्रात वाढले आहेत. ही गृह खात्याची नाचक्की म्हणावी लागेल. धुळे जिल्ह्यातील साखरी तालुक्यातही अंधश्रद्धेची रक्तरंजित घटना समोर आली आहे. योगेश उर्फ भैय्या बापू खैरनार राहणार जैताणे तालुका साक्री असे भोंदू बाबा चे नाव असून तो स्वतःला नवनाथ पंथीय म्हणून घेत साक्षात्काराचा दावा करत असतो भोंदू बाबा योगेश खैरनार ने गेल्या पाच सहा वर्षांपासून साखरी तालुक्यातील उभराडी शिवारात स्वतःचा बोगस आश्रम थाटला आहे घरगुती अडचणी आणि आर्थिक विवांचलित असलेल्या लोकांसाठी तो दर गुरुवारी दरबार भरत असे हवन आणि गुड्या भविष्य सांगण्याच्या नावाखाली तो सुशिक्षित नागरिकांनाही जाळ्यात ओढायचा अघोरी विद्या आणि चमत्कारांचा भुलभुलय्या निर्माण करून त्याने परिसरातील अनेकांना आपल्या नादी लावून आपल्या जाळ्यात ओढून ठेवले होते.जयश्री रजनीकांत काकुस्ते वय वर्ष 25 आणि अक्षय गंगाधर सोनवणे दोघा मृतांची नावे असून शनि अमावस्येला पूजा विधीनंतर वाद मित्र मैत्रिणींची भोंदू बाबा कडून यातूनच हत्या झालेली आहे. मृत अक्षय सोनवणे आणि जयश्री काकुस्ते हे दोघे मित्र असून जयश्री एका फायनान्स कंपनीत एकत्र काम करत होती तर अक्षय हा ग्रामपंचायत शिपाई असून वडिलोपार्जित केबलचा व्यवसाय करत आहे.त्याचाही खुन झाला आहे. साक्री तालुक्यातील निजामपूर परिसरातील रायपूर भडगाव रस्त्यावर शनिवारी सकाळी एका महिलेचा मृतदेह आढळून आला या महिलेचे तोंड रुमालाने बांधले होते शिवाय तिच्या मृतदेहावर दुचाकी क्रमांक (एम एच 18 सीएफ 8151) ही टाकण्यात आली होती तो मृतदेह जयश्री काकुस्ते हिचा असल्याचे चौकशीतून निष्पन्न झाले असून पोलीस तपास सुरू झाला आहे मृत जयश्रीचे काका संजय हिरे यांच्या तक्रारीनुसार जयश्री व अक्षय हे पूजेसाठी कथित भोंदूत योगेश खैरणार कडे गेले होते तेथे पूजा विधी नंतर वाद झाला त्यामुळे योगेशने अक्षयच्या डोक्यात लोखंडी वस्तूने वार करून त्याचा खून केला तर जयश्रीचाही ओढणीने गळा आवळून ठार मारले. मयत अक्षय व मयत जयश्री ही नेमक्या कोणत्या पूजेसाठी या भोंदू बाबा कडे आले होते याचा तपास पोलीस करत आहेत तसेच भोंदू बाबा योगेश खैरनार याला कोण मदत करत होतं याचा तपास सुरू आहे सध्या तरी हा नरबळीचा प्रकार असल्याचे पोलिसांना आढळून आलेले नाही मयूर भामरे पोलीस अधिकारी निजामपूर यांनी तपास सुरू केलेला असून जयश्री चा मृतदेह ज्या ठिकाणी आढळला तेथे एक केशरी रंगाचा रुमाल पोलिसांना आढळून आला त्यावरून श्वान पथकाने थेट भोंदू बाबाच्या मठाचा मार्ग दाखवला त्यानंतर पोलिसांनी भोंदूला ताब्यात घेतले पोलीस खात्यात दाखवताच त्याने घटनेची कबुली दिली त्याने अक्षयचा मृतदेह आश्रमा जवळ पुरल्याचे सांगितले नंतर पोलिसांनी तो मृतदेह ताब्यात घेतला. या भोंदू बाबा ने बनाव करून पोलिसांना अशी माहिती दिली की जयश्रीचा एक जण खून करत होता मी तिला वाचवण्यासाठी गेलो या झटापटीत त्या तरुणाचा आपल्या आतून खून झाला तो मृतदेह उभारणी येथील वनक्षेत्राजवळ दफन केला असा बनाव भोंदू योगेश पोलिसांना सांगत होता मात्र नंतर हा प्रकार स्वतः केल्याचे पोलिसांना चौकशी दरम्यान त्याने सांगितले त्याने मृतदेह नेण्यासाठी बैलगाडीचा वापर केला. हे भयानक दुहेरी खून सत्र तरुण पिढी व समाजाला एक धडा शिकवण्यासारखा प्रकार आहे. सुशिक्षित असूनही अशा भोंदू बाबांच्या नादी लागून आपण आपले भविष्य बघण्यासाठी त्या ठिकाणी जात असतो मात्र आपलं कायमचे भविष्य त्या ठिकाणी संपते हाच यातून संदेश मिळालेला आहे.बातमी पत्र वाचा सा पोलिस व्हिजन धुळे… मुख्य संपादक… प्रल्हाद साळुंके, धुळे.सह संपादक यश साळुंके, पुणे
