
धुळे -सा.पोलीस व्हिजन क्राईम न्यूज ब्युरो….दुहेरी हत्याकांडाच्या घटनेनं धुळ्यातील शिरपूर हादरले. पोटच्या मुलानंच आई आणि वडिलांची हत्या केली. बायकोसमोर अपमानास्पद बोलल्याला राग मनात धरून त्यानं आई-वडिलांच्या डोक्यात मुसळचे दणादण एका मागे एक जोरदार प्रहार केले. यात दोघांचाही मृत्यू झाला. दोघांच्या हत्येनंतर आरोपी मुलगा घटनास्थळावरून फरार होण्याच्या तयारीत होता. त्याचवेळी शेजारील नागरिकांनी त्याला पकडले आणि पोलिसांच्या ताब्यात दिले.धुळ्यातील शिरपूर येथील महावीर सोसायटी येथे आज, शुक्रवारी दुपारी दोन वाजताच्या सुमारास ही धक्कादायक घटना घडली. मुलीचे लग्न आटोपून आई-वडील आजच घरी परतले होते. पत्नीसमोर ते अपमानास्पद बोलले म्हणून त्याचा राग आला. त्याच रागातून त्याने आई आणि वडिलांच्या डोक्यात मुसळने प्रहार केले. यात ते दोघेही गंभीर जखमी झाल्याने त्यांचा मृत्यू झाला.
आई-वडिलांची हत्या करून आरोपी मुलगा फरार होण्याच्या तयारीत होता. त्याचवेळी शेजारील नागरिकांनी त्याला पकडले आणि पोलिसांच्या ताब्यात दिले. पोटच्या मुलानेच आई-वडिलांचा जीव घेतल्याने शिरपूर शहर परिसरात खळबळ उडाली आहे. पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले त्यावेळी त्याच्या चेहऱ्यावर पश्चातापाचा लवलेशही नसल्याचे दिसून आले.धुळे, जिल्ह्यातील शिरपूर शहरात आज (दि. १५) घडलेल्या दुहेरी हत्येच्या थरारक घटनेमुळे संपूर्ण परिसर हादरून गेला आहे. पत्नीसमोर अपमानास्पद बोलल्याचा राग मनात धरून मुलानेच आई-वडिलांच्या डोक्यात मुसळाने वार करून त्यांची निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. ही घटना शिरपूर येथील महावीर सोसायटी परिसरात आज (दि. १५) दुपारी सुमारे दोन वाजेच्या सुमारास घडली. या हल्ल्यात गंगा झिरीलाल महतो आणि रनजुदेवी गंगा महतो यांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला.या घटनेनंतर संपूर्ण शिरपूर शहरात दहशत निर्माण झाली.आरोपी मुलगा पोलीसांच्या ताब्यात आहे.त्याची कसून चौकशी होत आहे.
