धुळे, प्रतिनिधी : धुळे जिल्हा परिषदेच्या पंचायत समिती अंतर्गत कार्यरत असलेले केंद्रप्रमुख (उर्दू माध्यम व सोनगीर केंद्र) डॉ. जुबेर अख्तर काझी यांना छत्रपती संभाजीनगर येथील एमजीएम विद्यापीठामार्फत डॉक्टर ऑफ फिलॉसॉफी (Ph.D.) पदवी प्रदान करण्यात आली.
दि. 1 ऑगस्ट 2026 रोजी छत्रपती संभाजीनगर येथे आयोजित अंतिम Viva Voce नंतर “An Impact Study on Technology Enabled Education through Joint Action and Strategic Initiatives (TEJAS)” या विषयावरील त्यांच्या संशोधनास पीएच.डी. पदवी बहाल करण्यात आली. हे संशोधन डॉ. जॉन चेलुदुराई, डीन, इंटरडिसिप्लिनरी स्टडीज, यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण झाले.
या प्रसंगी विद्यापीठाचे External Examiner, Research Advisory Committee (RAC) चे सदस्य, विविध विभागांचे प्राध्यापक, संशोधक (Research Scholars) तसेच पीएच.डी. धारक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
डॉ. जुबेर काझी हे पंचायत समिती, धुळे येथे केंद्रप्रमुख उर्दू माध्यम, सोनगीर म्हणून कार्यरत असून शिक्षण क्षेत्रात त्यांनी उल्लेखनीय योगदान दिले आहे. यापूर्वी त्यांची महाराष्ट्र सरकारच्या वतीने सिंगापूर येथे आयोजित शैक्षणिक अभ्यास दौऱ्यासाठी निवड झाली होती. तसेच ते इस्रो (ISRO), बेंगळुरू येथे आयोजित शैक्षणिक अभ्यास दौऱ्याचेही टीम मेंबर राहिले आहेत. ब्रिटिश कौन्सिल आणि युनिसेफ यांच्यासोबत विविध शालेय उपक्रमात आपले योगदान दिलेले आहे. याशिवाय ते महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ (बालभारती), पुणे यांच्या इंग्रजी अभ्यास समितीचे सदस्य म्हणूनही कार्यरत आहेत.
त्यांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल पंचायत समिती व जिल्हा परिषद धुळे येथील सर्व अधिकारी वर्ग, डायटचे अधिकारी, शिक्षक, सहकारी, विद्यार्थी, मित्रपरिवार तसेच विविध सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.
या यशाबद्दल बोलताना डॉ. काझी यांनी आपल्या संशोधन मार्गदर्शक, विद्यापीठातील सर्व प्राध्यापक, जिल्हा परिषद आणि डायटचे अधिकारी, सहकारी, कुटुंबीय, मित्रपरिवार आणि हितचिंतक यांच्याप्रती मनःपूर्वक कृतज्ञता व्यक्त केली.
विशेष म्हणजे, डॉ. जुबेर काझी हे सेवानिवृत्त शिक्षण विस्तार अधिकारी काझी शाकीरुद्दीन यांचे सुपुत्र असून त्यांचे धाकटे बंधू काझी उझैर अहमद हे स्वित्झर्लंडमधील विद्यापीठात पीएच.डी.चे संशोधन करत आहेत. त्यामुळे काझी कुटुंबाची शैक्षणिक परंपरा अधिक समृद्ध होत असल्याची भावना व्यक्त करण्यात येत आहे.डाँ जुबेर काझी यांना सा पोलिस व्हिजन धुळे वतीने हार्दिक शुभेच्छा..


