
हर घर तिरंगा,हर घर स्वच्छता मोहीमेअंतर्गत एकनाथ महाराज हायस्कूल रानमळा ता जि धुळे येथे स्वच्छता अभियान राबविण्यात आले. धुळे…आज शासनाच्या वतीने माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद धुळे यांच्या आदेशान्वये सर्व शासकीय कार्यालये व सर्व प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालय मध्ये ११आँगष्ट २०२५ हा दिवस हर घर तिरंगा, हर घर स्वच्छता मोहिमे अंतर्गत, संपूर्ण शाळा परिसर, विद्यार्थी, शिक्षक कर्मचारी, यांच्या वतीने हा स्वच्छता अभियान उपक्रम अ.यु.क.कें.धुळे संचलित एकनाथ महाराज हायस्कूल रानमळा ता जि धुळे येथील प्र.मुख्याध्यापक बापूसाहेब किरण पाटील सर यांच्या उपस्थितीत व प्रमुख मार्गदर्शनाखाली राबविण्यात आले. यावेळी सर्व शालेय विद्यार्थी विद्यार्थिनी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी शालेय परिसर व रानमळा गावातील ग्रामपंचायत परिसर मध्ये स्वच्छता करून स्वच्छतेबाबत सर्व ग्रामस्थांना महत्त्व पटवून देण्याची प्रतिज्ञा घेतली. यावेळी विद्यार्थ्यांनी स्वच्छ सुजलगाव प्रतिज्ञा सामूहिक रित्या घेऊन या अभियानाची सुरुवात केली. यावेळी सर्वत्र पसरलेले प्लास्टिक, घाण व कचरा संकलन करून त्याची योग्य प्रकारे विल्हेवाट लावण्यात आली. यावेळी विद्यालयाचे उपशिक्षक श्री जे बी वाघ, श्री एस आर सूर्यवंशी, श्री पी .जी .साळुंखे, श्री.नित्यानंद पवार, श्रीमती वंदना पाटील,श्री.सचिन पावरा सर तसेच शिक्षकेतर कर्मचारी श्री अन्सारी शकिल,श्री.सुभाष शिंदे,श्री शरद देवरे उपस्थित होते.

