धुळे…सा.पोलिस व्हिजन धुळे..महाराट्र राजपत्रित अधिकारी महासंघ संलग्न अखिल महाराष्ट्र शिक्षण सेवा राजपत्रित अधिकारी संघाच्या वतीने हे आंदोलन धुळे जिल्हा परिषदेच्या आवारात करण्यात आले. यावेळी अधिकाऱ्यांनी बोगस शालार्थ प्रकरणातील अटकसत्र थांबविणे, कोणतीही चूक नसतानाही अधिकारी व कर्मचाऱ्यांवर अन्यायकारक कारवाई न करणे, तसेच वाढत्या कामाच्या ताणातून मुक्ती मिळावी, अशा विविध मागण्यांचा पुनरुच्चार केला. अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले की, आम्ही शिक्षण व्यवस्थेला प्रामाणिकपणे साथ देत आहोत, मात्र चुकीचे पद्धतीने वागणूक दिली जात असल्यास त्याचा तीव्र निषेध केला जाईल. बोगस शालार्थ आयडीप्रकरणी दोषींवर कारवाई झालीच पाहिजे, पण निर्दोष अधिकाऱ्यांना वेठीस धरणे हे अन्यायकारक असल्याचे आंदोलकांचे मत आहे. आजच्या आंदोलनानंतरही जर शासनाने सकारात्मक पावले उचलली नाहीत, तर आंदोलन तीव्र करण्याचा इशारा संघटनेने दिला आहे.

