
धुळे… नवीन शैक्षणिक वर्ष हे 15 जून 2026 पासून सुरू झाले आहे. विद्यार्थ्यांनी सुट्टी चा आनंद घेतला असुन त्यांना नवीन वर्गात शाळेमध्ये जाण्याचा उत्साह लागलेला होता. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी शिक्षणाची सोय व्हावी यासाठी सामाजिक कार्यकर्ते व राजकीय पदाधिकारी आण्णासाहेब प्रा.श्री.प्रकाश सोनवणे यांनी आपल्या तामसवाडी या छोट्याशा गावातील विद्यार्थ्यांना शिक्षणाचा लाभ व्हावा यासाठी तामसवाडी येथे एक सुंदर शाळेची स्थापना केली. कारण स्वतः अण्णासाहेबांचे वडील कैलासवासी श्रावण जिभाऊ हे अतिशय गरीब परिस्थितीतून वर आलेत त्यांनी आयुष्यभर कष्ट करून आपल्या मुलांना उच्चशिक्षित केले आपल्या ग्रामीण भागातील विद्यार्थी आज शिकला पाहिजे या उदात्त भावनेतून अण्णासाहेब प्राध्यापक प्रकाश सोनवणे यांनी हे शैक्षणिक वटवृक्षाची स्थापना केली आणि आज हे वटवृक्ष अतिशय सुंदर व निसर्गरम्य वातावरणामध्ये आपल्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षण घेण्यासाठी या शैक्षणिक संकुलाचा फायदा होऊ लागला आहे.15जून 2026 रोजी शाळेचा पहिला दिवस विद्यार्थी आनंदाने शाळेत आलेले होते यावेळी.माध्यमिक विद्यालय तामसवाडी, साक्री, शाळेत आलेल्या सर्व विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप करण्यात आले. त्याच बरोबर त्यांच्या वर्गांची शालेय पुस्तके ही देण्यात आलीत.
विशेषतः इयत्ता 5 वी साठी आलेल्या विद्यार्थ्यांचे हे माध्यमिक विद्यालयाचे पहिले वर्ष !!! त्यांना माध्यमिक विद्यालयाचे व वर्गातील बेंचेसचे मोठे आकर्षण ! सुरुवातीस सर्व शिक्षक वर्गाने या चिमुकल्यां चे पुष्प देऊन स्वागत केले व मुख्याध्यापक प्रविण नांद्रे सरांनी या नवीन विद्यार्थ्यांना इयत्ता 5 वी च्या वर्गात नेऊन बसवले शाळेतील सर्व शिक्षक कर्मचारी, शिक्षकेतर कर्मचारी यांनी या उपक्रमात उत्साहाने भाग घेतला.
इयत्ता 5 च्या विद्यार्थ्यांना माध्यमिक विद्यालयाचे आकर्षण वाटावे म्हणुन सर्वच कर्मचारी वर्गाने त्यांच्यात शाळेविषयी आपुलकीची भावना निर्माण केली. यावेळी विद्यालयाचे सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी मोलाचे सहकार्य केले .असे श्री प्रवीण नांद्रे मुख्याध्यापक माध्यमिक विद्यालय तामसवाडी तालुका साक्री जिल्हा धुळे यांनी कळवले आहे.

