इव्हिएम हटवा लोकशाही वाचवा चे निवेदन सर्वपक्षीयांनी धुळे जिल्हा अधिकारींना अखेर दिले

धुळे –
नुकत्याच झालेल्या महानगरपालिकेच्या निवडणुकीचे निकाल केवळ राजकीय पक्षांनाच नव्हे तर सामान्य मतदाराला सुध्दा अचंबित करणारे आहेत.
ज्या प्रमाणे सत्ताधारी भाजप पक्षाचे आमदार, मंत्री निवडणुकीपूर्वीच भाजपाचे पन्नास प्लस नगरसेवक निवडून येतील असे छातीठोकपणे सांगतात व घडते देखील त्याप्रमाणेच. धुळे शहरात भाजपाचे पन्नास नगरसेवक निवडुन आले आहेत.
अनेक प्रभागांमध्ये आम्ही यांना मतदानच केले नाही, मग हे निवडून कसे आले ? अशी चर्चा शहरात अनेक ठिकाणी घडते आहे.
सत्ताधारी भाजप पक्षाकडेच महापौर पद होते. प्रशासकाच्या माध्यमातून आमदार व पालकमंत्रीच महापालिकेचा कारभार करत होते. पण नागरिकांचे मुलभूत प्रश्‍न देखील सुटलेले नाहीत. नागरिकांना 8-8 दिवस पाणी मिळत नाही, कचर्‍याचे ढीग जागोजागी आढळतात. एक रस्ता धड नाही, सर्वत्र खड्डेच खड्डे दिसतात. वाहतुकीची कोंडीमुळे नागरिकांना अतोनात मानसिक त्रास होतो. महापालिका नगरसेवक, पदाधिकार्‍यांबद्दल तीव्र रोष, संताप नागरिकांमध्ये असतांना 50 नगरसेवक फक्त ईव्हीएम मशीनमध्ये छेडछाड करुनच होवू शकतात, असे आता सामान्य नागरिक देखील बोलू लागले आहेत.
काहीच काम न करणारे, प्रभागाला परिचित नसणार्‍या उमेदवारांनी 8 ते 10 हजार मते घेतली आहेत. नगरसेवक 5-5 हजाराच्या मताधिक्यांनी निवडून आले आहेत. हे कसे शक्य आहे ?
या निवडणुका मुळीच पारदर्शी व निष्पक्षपणे व भयमुक्त वातावरणात झाल्या नाहीत. ईव्हीएम मशीनद्वारे निवडणूका पारदर्शी होवूच शकत नाही, म्हणून जिल्ह्यातील किंबहुना संपूर्ण राज्यातील होवू घातलेल्या जिल्हा परिषद, पंचायत समिती व ग्राम पंचायतीच्या निवडणूका बॅलेट पेपरवर घ्याव्यात अशी मागणी आम्ही करीत आहोत.
कर्नाटक सरकारने नुकतेच सर्व निवडणूक बॅलेट पेपरने घेण्याचे धोरण अवलंबले आहे. त्याच अनुषंगाने आता महाराष्ट्रातही सर्व निवडणुका बॅलेट पेपरवर घेण्यात याव्या अशा आशयाचे निवेदन आज धुळे जिल्ह्यातील सर्व विरोधी पक्षांच्या वतीने देण्यात आले याप्रसंगी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांनी निवडणूक आयोगाच्या विरोधामध्ये तसेच ईव्हीएम मध्ये करण्यात आलेल्या मत चोरी विरोधात प्रचंड घोषणाबाजी केली तसेच राज्य शासनाचा व भारतीय निवडणूक आयोगाचा धिक्कार देखील केला याप्रसंगी धुळे शहरातील विरोधी पक्षाचे भगवान करणकाळ, साबीर शेख, रमेश श्रीखंडे, अतुल सोनवणे, सुनील नेरकर, नरेंद्र परदेशी, प्राची कुलकर्णी अजित राजपूत, एड. दुष्यंत देशमुख, धीरज पाटील, संतोष मिस्त्री, निंबा मराठे , प्रभादेवी परदेशी,सुरेश बैसाणे ,चंद्रमणी वाघ, सुरेश आण्णा लोंढे , मनोज बंब, आलोक रघुवंशी, शंकर खरात, जयश्री वानखेडे, संगीता जोशी ,अरुणा मोरे, सुनिता वाघ, सोनी सोनार, अण्णा फुलपगारे , प्रशांत ठाकूर, अनिल पाटील, संदीप सूर्यवंशी, सुभाष मराठे ,मुन्ना पठाण, सुरज भावसार,दिनेश पाटील, स्वप्निल लोंढे, निलेश कांजरेकर, अमोल ठाकूर, पंकज भारस्कर, सागर निकम, पिनू सूर्यवंशी, मुकेश भोकरे, आबा हरळ, वैभव पाटील सचिन शिंदे ,गुलाब धोबी, हिमांशू परदेशी, इशतियाक अन्सारी आदीसह सर्व पदाधिकारी उपस्थित होते.