महाराष्ट्र राज्य कलाशिक्षक महासंघाची नवीन कला संचालक सन्माननीय डॉ. किशोर इंगळे साहेब यांच्यासोबत प्रत्यक्ष त्यांच्या स्वागतासाठी व विविध कला विषयाच्या चर्चेसाठी सर जेजे स्कूल ऑफ आर्ट, कला संचालनालय महाराष्ट्र शासन मुंबई येथे आज दिनांक. 01 जुलै 2025 रोजी महाराष्ट्र राज्य कलाशिक्षक महासंघाचे प्रदेशाध्यक्ष सन्माननीय प्रल्हाद साळुंखे, धुळे व प्रदेश सरचिटणीस सन्माननीय प्रल्हाद शिंदे हस्तेकर, यांच्या मार्गदर्शनाने महाराष्ट्र राज्य कलाशिक्षक महासंघाचे प्रदेश सह चिटणीस सन्माननीय मोहन माने यांच्या नेतृत्वातून आज महाराष्ट्र राज्य कला शिक्षक महासंघाच्या मुंबई टीमने यात ज्येष्ठ महिला आघाडी प्रदेश मार्गदर्शक, श्रीमती नीता राऊत,श्रीमान कुमार गायकवाड मुंबई विभागीय अध्यक्ष, सौ भारतीय जाधव महिला अध्यक्ष मुंबई विभाग, संगीता पाटील महिला अध्यक्ष कल्याण, तसेच मुंबई जिल्हा अध्यक्ष प्रकाशचंद्र मिश्रा, मुंबई उपाध्यक्ष टी के सुतार.श्रीमान राजेंद्र नवाळे मुंबई अध्यक्ष, ठाणे जिल्हा अध्यक्ष श्रीमान अनिल ठाकरे, मुंबई कोषाध्यक्ष नितेश उटेकर, या सर्वांनी नवनियुक्त कला संचालक डॉ.किशोर इंगळे साहेब यांची भेट घेऊन आपल्या कला क्षेत्रातील कला संचालक मिळाल्याचा आनंद व्यक्त करत त्यांचा शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन सामुहिक सत्कार करण्यात आला.या वेळी कला शिक्षक पदभरती प्रत्येक शाळेत एक कला शिक्षक याप्रमाणे व्हावी यासाठी महाराष्ट्र शासनाला शिफारस पाठवा तसेच शासकीय रेखा कला ग्रेड परीक्षांचे अनेक परीक्षा केंद्रांना चार ते पाच वर्ष पासून केंद्र मेहनताना मिळालेला नाही.याबाबत चर्चा केली.यावर महाराष्ट्र राज्य कला शिक्षक महासंघ व कला संचालक यांची सभा लावली जाईल आणि त्यात सर्व आपल्या तक्रारीचे निवारण करण्यात येतील असे आश्वासन कला संचालक डॉ किशोर इंगळे साहेब यांनी महासंघाच्या पदाधिकारीना दिले.साहेबांनी महाराष्ट्र राज्य कला शिक्षक महासंघ च्या पदाधिकारी यांना वेळ दिला महासंघाच्या वतीने खूप खूप अभिनंदन व शुभेच्छा जाहीर आभार🌸🌸🌷🙏🙏🙏🙏 प्रल्हाद साळुंके, प्रदेश अध्यक्ष महाराष्ट्र राज्य कला शिक्षक महासंघ. प्रल्हाद शिंदे प्रदेश सरचिटणीस महाराष्ट्र राज्य कला शिक्षक महासंघ. मोहन माने प्रदेश सह चिटणीस महाराष्ट्र राज्य कला शिक्षक महासंघ व सर्व पदाधिकारी मुंबई विभाग