कला व संगीत शिक्षकांची एक दिवसीय कार्यशाळा नाशिक येथे उत्साहात साजरा….. महाराष्ट्र राज्य कला शिक्षक महासंघ व व्हिजन नाशिक विभागीय कला शिक्षक संघ वतीने कार्यशाळा संपन्न..

कलासंगम.. नाशिक वृत्त..सा पोलीस व्हिजन धुळे.. दिनांक..२५/८/२०२५..

चौसष्ट कलांचा अधिपती असणा-या गणरायाच्या आगमनाच्या पार्श्वभूमीवर सोमवार दिनांक २५ ऑगस्ट रोजी माध्यमिक शिक्षणाधिकारी कार्यालय, कर्मवीर काकासाहेब वाघ शिक्षण संस्था, महाराष्ट्र राज्य कलाशिक्षक महासंघ संलग्न व्हिजन नाशिक कलाशिक्षक संघ यांच्या संयुक्त विद्यमाने पंजाबराव देशमुख सभागृहात कला व संगीत शिक्षकांची एकदिवसीय कार्यशाळेची सांगता झाली. एकूणच वातावरण पाहता कार्यशाळा या रूक्ष शब्दापेक्षा कला मैफिल म्हणणं उचित ठरेल!

*खरंतर शाळेच्या निर्जीव भिंती,फळे आपल्या कलाकृतीतून बोलक्या करणारे चित्रकला शिक्षक, गणित विज्ञान यांसारख्या विषयातील अवघड संबोधानंतर रूक्ष वातावरणात संगीताच्या माध्यमातून सूरांची बरसात करून शालेय वातावरण सूरमयी करणारे संगीत शिक्षक यांच्या मुळे शाळा ख-या अर्थाने सुंदर होते.!*

“कलाशिक्षक हा शाळेचा आत्मा आहे, समाजाला घडविण्याचे, विद्यार्थ्यांच्या मनावरील ताणतणाव झटकून आनंददायी शिक्षण देण्याचं मोलाचं कार्य कलाशिक्षक करत आहेत असं असताना पाचशे विद्यार्थ्यांमागे एक कला शिक्षक हे शासनाचे धोरण अन्यायकारक आहे याविरोधात मी सभागृहात नक्कीच आवाज उठवेन “, असे प्रतिपादन खासदार भास्करराव भगरे यांनी याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहून केले तर “कला जिवंत राहिली तरच शाळा जिवंत राहतील यादृष्टीने कलाशिक्षक विद्यार्थ्यांच्या जडणघडणीत मोलाचे योगदान देतो..” असे आपल्या अध्यक्षीय मनोगतातून महाराष्ट्र राज्य कलाशिक्षक महासंघाचे प्रदेशाध्यक्ष श्री.प्रल्हाद साळुंके यांनी सांगितले.
जिल्हा परिषद माध्यमिक शिक्षण विभाग, के के वाघ शिक्षण प्रसारक मंडळ आणि नाशिक जिल्हा कला शिक्षक महासंघ,व्हिजन कला शिक्षक संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने पंजाबराव देशमुख हॉल येथे आयोजित सुधारित अभ्यासक्रमावर आधारित कला शिक्षकांसाठी प्रात्यक्षिक मार्गदर्शन कृतीसत्र कार्यशाळेप्रसंगी ते बोलत होते. याप्रसंगी व्यासपीठावर कलाशिक्षक महासंघाचे संस्थापक प्रदेशाध्यक्ष प्रल्हाद साळुंखे, प्राचार्य सचिन जाधव,अधिष्ठाता बाळ नगरकर,प्राचार्य मुरलीधर रोकडे,चंद्रशेखर चिंचोले,चंद्रशेखर देशपांडे,सुरेश लासुरे आदी मान्यवर उपस्थित होते.

आपल्या मनोगतात खासदार भगरे सर पुढे म्हणाले की, “नवीन शैक्षणिक धोरणावर आधारित नवनवीन कल्पना, कृती, प्रात्यक्षिक रुपी ज्ञानाची शिदोरी सोबत घेऊन त्याचा उपयोग आपल्या शाळेतील मुलांसाठी करा,मीही पस्तीस वर्षे शिक्षक,सरपंच,प.स,जि. प. सदस्य ते खासदार प्रवासात खूप अनुभवलं.आजच्या शासनाची धोरण शिक्षण क्षेत्राला मारक असून ज्या शिक्षणा क्षेत्रावर उद्याचे देशाचे भवितव्य घडणार आहे त्यावरच शासन कात्री लावण्याचे काम करत आहे ही शोकांतिका आहे.सभागृहात माझी द्विधा मनस्थिती होते माझे कांदा आणि शिक्षण जिवाळ्याचे विषय यावरील समस्यावर बोलण्यासाठी माझा पुढाकार असतो. खऱ्या अर्थाने शासनाने शिक्षण क्षेत्रावर सहा टक्के निधी खर्च केला पाहिजे पण तो अडीच टक्केच केला जात आहे. हे दुर्दैव आहे. सहाटक्के निधी शिक्षण क्षेत्राला मिळावा म्हणून माझा पाठपुरावा सुरु असून पाचशे विद्यार्थ्यांमागे एक कला शिक्षक या जाचक अटी कलाशिक्षकांना मारक आहेत या निर्णयाविरुद्ध केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांची शिष्टमंडळासह भेट घेऊन २४० विद्यार्थ्यांमागे एक कलाशिक्षक नेमणूक पवित्रपोर्टल मार्फत करण्यात यावी,कलाशिक्षकांवरील जाचक निर्णय रद्द करण्याबाबत पाठपुरावा करण्यासाठी मी आग्रही असून नाशिक जिल्यातील कलाशिक्षकांची थकीत बिले, ATD to AM Scale मान्यतेचे प्रश्न तात्काळ मार्गी लावण्यासाठी शिक्षण उपसंचालक यांची भेट घेणार आहे .” गेले अनेक महिन्यापासून आदिवासी विकास विभागाच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांचा आंदोलनात सहभागी होऊन पाठिंबा दर्शवत त्यांच्या लढ्यात सहभागी होऊन केंद्रशासनाकडे त्यांच्या रास्त मागणी पूर्ण करण्यासाठी लढा देणार असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले.

प्रारंभी सर्व मान्यवरांच्या हस्ते प्रतिमापूजन करण्यात आले.

प्रास्ताविकातून कला शिक्षक संघाचे प्रदेश सदस्य श्री.दत्तात्रय सांगळे यांनी कलाशिक्षक संघटनेच्या कार्याचा आढावा घेऊन शासनाच्या जाचक निर्णयाविषयी नाराजी व्यक्त केली.

प्रवेशद्वाराजवळ रश्मी विसपुते यांनी काढलेल्या मा.श्री. भास्करराव भगरे आणि मा.श्री.आजिंक्य वाघ या द्वयींना रांगोळीद्वारे साकारलेल्या कलाकृतींचे सर्वांनी कौतुक केले.

सुप्रसिद्ध कथ्थक नृत्यांगना कीर्ती भवाळकर यांच्या शिष्यांनी सादर केलेल्या सादर केलेल्या शिववंदनेने कार्यशाळेची सुरूवात झाली. या नृत्याविष्काराने उपस्थितांची वाहवा मिळवली!
सुनीता शिंदे आणि त्यांच्या CCRT शिष्यवृत्तीधारक विद्यार्थिनीच्या कथ्थक नृत्याने उपस्थितांनी कौतुक केले.

गायक ओंकार वैरागकर, दिनकर दांडेकर , भाऊसाहेब लोखंडे, प्रशांत महाबळ, अपर्णा देशपांडे आदि.संगीत शिक्षकांनी सादर केलेली संगीत मैफिलीला उपस्थितांनी भरभरून दाद दिली.

श्री.रविंद्र कांगणे यांनी सादर केलेल्या ‘बाप कळलाच नाही,माय कळलीच नाही…’ गीताने उपस्थितांचे डोळे पाणावले.

श्री.गणेश गायकवाड सरांनी सांगितलेल्या सहजसोप्या मेकअप टीप्स् आणि त्यांनी सादर केलेले नटसम्राट नाटकातील स्वगत यालाही शिक्षकांनी उस्फुर्त दाद दिली.

श्री.भूषण कोंबडे यांनी साकारलेले गणरायाचे शिल्प,श्री.दिपक वर्मा यांनी चितारलेले निसर्गचित्र, श्री.राजेश सावंत सरांनी आपल्या कुंचल्यातून जिवंत केलेले स्टील लाईफ तर प्रा.ऋषिकेश भंडारी यांचे रेखाटलेल्या व्यक्तीचित्राला उपस्थित शिक्षकांनी भरभरून दाद दिली. विशेष म्हणजे या सगळ्या कलाकृती व्यासपीठावर एकाच वेळी साकारल्या गेल्या !!

एका बाजूला लोककवी वामनदादा कर्डकांची गीते शेजवळकर सादर करत होते तर त्याच वेळी चित्रकार भारत पवार सर चित्र महर्षी दादासाहेब फाळके यांचे चित्र फलकावर काढत होते.या निमित्ताने नाशिकच्या या महान कलाकारांच्या स्मृतींना उजाळा मिळाला.

इंडियन आयडॉल फेम प्रतिक सोळसे यांनी सादर केलेल्या ‘पाऊले चालती पंढरीची वाट आणि बाप्पा मोरया रे..’ उपस्थितांची मने जिंकली.

देव हिरे यांनी फलकावर शिक्षणाधिकारी मा.श्री.प्रविण पाटील यांचे काढलेले चित्र केवळ शअप्रतिम कलाकृती !

उपस्थित जवळपास सर्वच शिक्षकांनी फळा बोलका करणा-या या कलाकारांसोबत फोटो काढून स्मृती जपल्या.

‘डिजिटल पेंटिंग’ या नव्या तंत्रज्ञानाची ओळख श्री.स्वप्नील अहिरे सरांनी उपस्थितांना करून दिली.

महेंद्र जगताप यांच्या कॅलिग्राफीला, आणि राहुल पगारे यांच्या स्मरणचित्राला कलारसिकांनी दाद दिली.

रांगोळीसाठी भारतभर प्रसिद्ध असलेल्या श्री. सोमेश्वर मुळाणे यांनी मांडलेल्या जवळपास ऐंशी देशातील नानाविध पोस्ट तिकिटे आणि एकतीस देशातील दुर्मिळ चलनी नोटा- नाणी संग्रह प्रदर्शनाला सर्व कलारसिकांनी भेट दिल्यानंतर या कार्यक्रमाची सांगता झाली.

” जिल्ह्यातील सर्व शिक्षकांसमोर आमची कला सादर करता आली आणि कलाक्षेत्रातील नवीन बाबींची माहिती आम्हाला या कार्यशाळेतून मिळाली ! ” अशा जवळपास सर्वच शिक्षकांच्या उस्फुर्त प्रतिक्रिया…
कला शिकवणं बंद करू नका अशी आग्रही भूमिका मांडणारे श्री. दत्तात्रेय सांगळे, सर्व पाहुण्यांच्या संपर्कात राहून त्यांच्या उपस्थितीसाठी प्रयत्नशील श्री. चंद्रशेखर सावंत,सर्व कामांवर बारकाईने लक्ष ठेवणारे श्री. राजेंद्र लोखंडे, पडेल ते काम करणारे श्री.सचिन पगार, व्यासपीठावरील सर्व व्यवस्था चोखपणे सांभाळणारे श्री.मिलिंद टिळे , डिजिटल बोर्ड तयार करणारे श्री.महेंद्र झोले, प्रसिद्धी प्रमुख श्री.संदीप पवार, Digital Wall उपलब्धतेसाठी धडपड करणारे श्री.योगेश रोकडे, योग्य ठिकाणी पैसे खर्च करून पै न् पै चा हिशेब ठेवणारे श्री.सादिक पटेल आणि संपूर्ण कार्यक्रमाचे eye witness होऊन sharpshoot करणारे छायाचित्रकार श्री.नितीन वांद्रे सर या तसेच जिल्ह्यातील सर्व कलाशिक्षकांना सुखावणारी ठरली.

कार्यक्रमाअंती उपस्थित सर्व मान्यवरांचे आभार श्री.सचिन पगार यांनी मानले.

*_ साद प्रतिसाद _*

“भारतीय संस्कृतीला नृत्य शैलीचा अथांग वारसा लाभलेला आहे. प्राचीन शास्त्रीय नृत्य शैलीचे जतन करणे काळाची गरज आहे.मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी शालेय अध्यापनात नृत्याचा समावेश करण्यात यावा.”
-कीर्ती भवाळकर
(प्रख्यात शास्त्रीय कथक नृत्यांगणा)

“नाशिक जिल्यातील शिक्षणाधिकारी यांनी शासन निर्णयाचा अभ्यास करून ATD to AM स्केल मान्यता अडवणूक करू नये. धुळे जिल्यात काम पूर्ण केले असून कलाशिक्षक महासंघ, व्हिजन कला शिक्षक संघटना सातत्याने कला शिक्षकांच्या प्रश्न सोडवण्यासाठी पाठपुरावा करत असून सर्व कला शिक्षकांनी एकजुटीने घटनेच्या पाठीशी उभे राहणे काळाची गरज आहे.”
-प्रल्हाद साळुंखे
(संस्थापक प्रदेश अध्यक्ष महाराष्ट्र राज्य कलाशिक्षक
महासंघ )

📝🎨🎭🎤🎼🌼🙏🏽🌸🧿😌

filter: 0; fileterIntensity: 0.0; filterMask: 0; captureOrientation: 0; algolist: 0; multi-frame: 1; brp_mask:0; brp_del_th:null; brp_del_sen:null; delta:null; module: video;hw-remosaic: false;touch: (-1.0, -1.0);sceneMode: 0;cct_value: 0;AI_Scene: (-1, -1);aec_lux: 0.0;aec_lux_index: 0;albedo: ;confidence: ;motionLevel: -1;weatherinfo: weather?null, icon:null, weatherInfo:100;temperature: 45;