शेवाळी येथे संत जनाबाई बहुउद्देशीय महिला भजन मंडळ द्वारा विविध उपक्रम घेतले जातात…

धुळे…..सा.पोलीस व्हिजन न्यूज विशेष दखल…शेवाळी येथे संत जनाबाई बहुउद्देशीय महिला भजन मंडळ द्वारा विविध भक्तीभावाच्या सानिध्यात भजन महिला भगिनींकडून गायले जात आहे. शेवाळी गावात विविध तरुण मित्र मंडळ यांच्याकडून जसे गावाच्या विकासासाठी व पूर्वीचे संस्कार टिकवून ठेवण्यासाठी जसे विविध उपक्रम राबवले जातात त्यात अध्यात्मक, सामाजिक व इतर सहकार्याचे कामे या तरुण मित्रमंडळांकडून केली जातात. शेवाळी येथील फार पूर्वीपासून भजनी मंडळ कोणाच्याही घरी दुःख असो की सुख या ठिकाणी भजनी मंडळ आपली सेवा देत असतात. आता महिला देखील मागे राहिलेल्या नाहीत. आपल्या शेवाळी गावातील महिलांनी पुढाकार घेऊन संत जनाबाई बहुउद्देशीय महिला भजनी मंडळ ची स्थापना करून आज त्या सुंदर आवाजामध्ये भजन गाण्याचा उत्तम उपक्रम त्यांनी सुरू केलेला आहे. हे कौतुकास्पद आहे सर्व महिला भजनी मंडळ मधील भजन कीर्तन करणाऱ्या आपल्या महिला भगिनींना समस्त शेवाळी ग्रामस्थांकडून हार्दिक शुभेच्छा आहेतच.व आमच्य साईबाबा पुरुष बचत गट शेवाळी सर्व पदाधिकारी यांच्या कडुन शुभेच्छा,तसेच सा पोलीस व्हिजन धुळे वतीने देखील आपणास खूप खूप शुभेच्छा व अभिनंदन . शेवाळी गावातील महिला देखील आता कोणत्या क्षेत्रात मागे नाहीत हा शेवाळी गावाचा इतिहास आहे. नाट्य क्षेत्रात देखील नाव लौकिक करणारे नाट्यकल्यावंत कैलासवासी विश्वासराव साळुंखे यांनी संपूर्ण महाराष्ट्रात या गावचे नावलौकिक केले आहे त्यांनी स्वतःचा नाट्यफड उभा करून साडेसहाशे ते सातशे प्रयोग आपल्या नाट्य लेखनातून व सादरीकरणातून करून एक मोठे नाट्य क्षेत्रात नावलौकिक केलेले आहे. फार पूर्वीपासून ग्यारा हा कंपनी नावाचे एक मोठा गट नाट्यकलावंतांचा शेवाळी गावात होता आणि विविध नाट्य प्रयोग प्रत्यक्ष सादरीकरण करून त्यावेळेस कोणतेही करणुकीचे साधन नसल्याने याच नाट्यप्रयोगातून मनोरंजनाचे काम ग्रामस्थांचे होत होते. शेवाळी पंचक्रोशीतील जे ग्रामीण भाग आहेत तेथून जनता हे नाट्यप्रयोग पाहण्यासाठी बैलगाडीने येत असत. आज त्याच ललीत कलांचा म्हणजे चित्र,शील्प, नृत्य ,नाट्य, गायन ,वादन,संगित, याचा वारसा या ठिकाणी चालवला जात आहे. या गावात डॉक्टर वकील शिक्षक शासकीय अधिकारी चित्रकार नाट्यकलावंत तसेच लळीद जे रामायणातील व्यक्तिरेखा साकारत आदिवासी समाजाकडून सादर होणारी कला देखील प्रसिद्ध आहे असे विविध क्षेत्रातील कलावंत आहेत. आज संत जनाबाई महिला भजनी मंडळ त्याच संस्काराच्या पावलावर पाऊल टाकून चांगल्या पद्धतीने आपले कार्य या भजन मंडळातर्फे उपक्रम राबवत आहेत. शासनाने याची दखल घेतली पाहिजे आणि त्यांना जे साहित्य लागते तसेच भजनी मंडळाचे साहित्य त्यांना दिल्यास या महिला पथकांना नक्कीच एक चांगली चालना मिळणार आहे.असे पोलीस व्हिजन चे मुख्य संपादक प्रल्हाद साळुंके यांनी शासनाला आवाहन केले आहे.🌸.🌸🌸🌹🌹🌹☘️☘️☘️🌳🌳🌳 प्रल्हाद साळुंके मुख्य संपादक सा पोलीस व्हिजन धुळे