पंचायत समिती शिक्षण विभाग धुळे व शासकीय जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था धुळे वतीने पहिली ते आठवी विषय शिक्षकांचे मूल्यवर्धन 3.0 तालुकास्तरीय प्रशिक्षण सुरू. धुळे ….सा पोलीस व्हिजन धुळे…..नगांव…. धुळे तालुक्यातील प्राथमिक व माध्यमिक शाळेतील शिक्षकांसाठी पंचायत समिती शिक्षण विभाग धुळे व शासकीय शिक्षक प्रशिक्षण केंद्र वतीने इयत्ता पहिली ते आठवी या इयत्तांमध्ये शिक्षण देणाऱ्या विषय शिक्षकांचे मूल्यवर्धन 3.0 धुळे तालुकास्तरीय प्रशिक्षण गंगामाई शिक्षण शास्त्र महाविद्यालय नगाव ता जि धुळे येथे सुरू आहे. या प्रशिक्षणामध्ये राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे व शांतीलाल मुथा फाउंडेशन वतीने मूल्यवर्धन उपक्रम पुस्तिकांचे देखील निर्मिती करून शिक्षकांना पुस्तकांचे वाटप करण्यात आले आहे. महाराष्ट्र शासन व शांतीलाल मुथा फाउंडेशन पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने मूल्यवर्धन कार्यक्रम सुरू करण्यात येत आहे या निमित्ताने शिक्षक आणि विद्यार्थ्यांना उपयुक्त होईल अशी ही मूल्यवर्धन पुस्तिका शिक्षकांना त्यांच्या हातात मिळालेली आहे. लहान विद्यार्थ्यांनाही त्यांच्या परीने मूल्य विषयक विचार प्रक्रियेत सहभागी करून घेणारे श्रेणीबद्ध सहयोगी व बाल स्नेही उपक्रम हा मूल्यवर्धन पुस्तिकांचा आत्मा आहे मुलांना स्वतःची स्व विकासाची आणि आपल्या जबाबदाऱ्यांची ओळख करून देत हे उपक्रम नातेसंबंधांच्या आणि अखेरीस सामाजिक जबाबदाऱ्यांच्या विस्तृत वर्तुळात अलगदपणे नेऊन सोडतात. मूल्यवर्धन शिक्षण विद्यार्थ्यांना फार गरजेचे आहे. विद्यार्थ्यांना उपक्रमांद्वारे मूल्य शिक्षणाचा अत्यंत सकारात्मक अध्याय शाळांमध्ये पुन्हा सुरू होईल आणि राज्याला अभिमान वाटावा अशी त्याची वाटचाल होईल या संकल्पनेतून विद्यार्थ्यांसाठी आपल्या शिक्षकांनी उत्कृष्ट पद्धतीने त्यांना शिक्षण दिले जावे यासाठी हे प्रशिक्षण देण्यात येत आहे. मूल्यवर्धन प्रशिक्षणाचे पाचवे सत्र पूर्ण झाले असून सात सत्र अजून बाकी आहेत. हे प्रशिक्षण प्रत्येक इयत्ता पहिली ते आठवीच्या शिक्षकांना देण्यात येत आहे. प्रशिक्षण स्थळी शिक्षकांना दुपारी जेवण व चहाची देखील सोय केलेली आहे. सदर प्रशिक्षण धुळे पंचायत समिती शिक्षण विभागाचे गटशिक्षणाधिकारी श्रीमान घुगे साहेब यांच्या मार्गदर्शनातून सुरू असून विस्तार अधिकारी मा.पुरुषोत्तम वना खैरनार, तालुका मुख्य समन्वयक श्री किशोर पाटील व अविनाश मराठे, तसेच सुलभक म्हणून श्री गोविंदराव बागुल सर, श्री विशाल पाटील सर, श्री सचिन पाटील सर, श्रीमती प्रतिभा पाटील मँडम, श्रीमती तेजस्वी शिसोदे मँडम, श्रीमती मनीषा पाटील मँडम हे प्रशिक्षणासाठी महत्त्वपूर्ण भूमिका निभावत आहेत. या प्रशिक्षणाला विद्यार्थ्यांना अध्यापन करण्याऐवजी त्यांच्याकडून त्यांच्या अंगी असलेल्या विविध क्षमतांचा विकास करणे व त्यांच्याकडून प्रत्यक्ष कृती करून शिक्षण देणे, न्याय, स्वातंत्र्य, समता ,बंधुता, जबाबदारी, वैज्ञानिक दृष्टिकोन ,करुणा, सेवाभाव, राष्ट्रभक्ती ,श्रम प्रतिष्ठा, अशा मूल्यांचे प्रत्यक्ष मूल्यवर्धन शिक्षक उपक्रम समाविष्ट केलेले आहेत. तसेच राष्ट्रीय शिक्षण धोरणात शाळांमधील अध्ययन अध्यापन पुढील हेतू ध्यानात ठेवून केले जावेत असे सुचवले आहे 1) मानवी आणि संविधानिक मूल्यांची रुजवणूक 2) संवाद सहकार्य सांघिक कार्य आणि कोणत्याही स्थितीत लवकर सावरण्याची लवचिकता ही जीवन कौशल्य विकसित करणे 3) सामाजिक नैतिक व भावनिक कौशल्य आणि स्वभाव गुण असलेला माणूस घडविणे हा त्यामागील उद्देश आहे.प्रशिक्षण घेतांना शिक्षक विद्यार्थी झाले असून आनंददायी शिक्षण देण्याचा स्वतः ते या प्रशिक्षणामध्ये शिक्षण घेत आहेत.बातमी पत्र वाचा सा पोलीस व्हिजन धुळे…. मुख्य संपादक. प्रल्हाद साळुंके
(राष्ट्र उभारणीसाठी शासन,शिक्षक,पालक, विद्यार्थी व प्रसारमाध्यम यांची भुमिका) शासन आणि शिक्षणज्या देशाची शिक्षणव्यवस्था मजबूत असेल तोच देश प्रगत आणि विकसित…
यातील तक्रारदार यांनी स्वेच्छानिवृत्ती घेतल्यानंतर त्यांच्या रजा रोखिकरणाची रक्कम आलोसे यांनी दिलेल्या धनादेशाद्वारे तक्रारदार यांच्या बँक खात्यात जमा झाली होती.…