धुळे येथील हरवलेला दहावीचा विद्यार्थी जयकुमार अखेर सापडला ! पश्चिम देवपूर पोलिसांच्या अथक परिश्रमांना यश

धुळे..सा पोलीस व्हिजन धुळे.. आई आणि वडील यांच्यासाठी आपल्या पोटचा मुलगा असो की मुलगी ही खूप प्रिय असते. विशेषता आईचे खूप खूप प्रेम असते. धुळे येथील येथील चावरा शाळेचा दहावीचा विद्यार्थी जयकुमार उर्फ साई उज्ज्वल जाधव (वय १५) हा १० सप्टेंबर रोजी शाळेला जाताना बेपत्ता झाला होता. यातून त्याचे आई-वडील व नातेवाईक खूप चिंतेत होते.जयकुमार म्हणजेच साई च्या आईने तर सोशल मीडिया वर व्हिडिओ टाकुन आपल्या मुलाला घरी येण्याचे रडुन रडुन आवाहन केले होते.तो व्हिडिओ पाहुन अनेकांच्या डोळ्यांत पाणी आलं आणि प्रत्येकाला वाईट वाटले.प्रत्येक जण आपापल्या व्हाँटसप गृप वर आईची हाक टाकत होता. पोलीसातही मिसींग केस दाखल करण्यात आली होती.जयकुमार चा सहा दिवस शोध घेतल्यानंतर अखेर पश्चिम देवपूर पोलिसांच्या प्रयत्नांना यश आले असून जयकुमारला मध्यप्रदेशातील पिथमपूर येथे सुखरूप सापडवला.

घडले असे होते की,जयकुमार शाळेत जात असताना अचानक गायब झाला होता. त्याच्या शोधासाठी पोलिसांनी महामार्गावरील मंदिरे, ढाबे, हॉटेल्स तसेच ५० ते १०० ठिकाणांचे सीसीटीव्ही फुटेज तपासले. सोशल मीडियावरही त्याचा शोध घेण्याची मोहीम सुरू करण्यात आली होती.

जयकुमार सायकलवरून धुळे सोडून थेट उज्जैनच्या दिशेने गेला होता. महाकाल मंदिरात दर्शन घेतल्यानंतर तो पुढे पायी निघाला. मोबाईल नसल्याने संपर्क होत नव्हता. शेवटी पिथमपूर येथे एका ट्रक चालकाच्या मदतीने त्याने मामाशी संपर्क साधला.

पोलिसांनी तातडीने कार्यवाही करून जयकुमारला ताब्यात घेतले व सुखरूप घरी आणले. या संपूर्ण मोहिमेत पश्चिम देवपूर पोलिसांनी दाखवलेली संवेदनशीलता व चिकाटी कौतुकास्पद ठरली.आणि आई वडील व नातेवाईक काँलनी परीसरात आनंदी वातावरण निर्माण झाले.धुळे पोलीसांच्या या कामगिरीमुळे सा पोलीस व्हिजन चा वर्दीला सलाम… प्रल्हाद साळुंके मुख्य संपादक सा पोलीस व्हिजन धुळे 👍