
प्रतिकात्मक फोटो….
धुळे… धुळे पोलीस अधीक्षक यांनी शाळा महाविद्यालयातील विद्यार्थिनींच्या सुरक्षेबाबत दखल घेणे गरजेचे आहे. धुळे शहर तसेच धुळे ग्रामीण मधील ज्या शाळा महाविद्यालय असतील तेथे दामिनी पथकांची करडी नजर असणे आवश्यक आहे. या पथकाद्वारे पूर्वी शाळा महाविद्यालयांमध्ये दामिनी पथकांची चांगल्या पद्धतीने कार्यवाही सुरू होती. परंतु ती नंतर कमी प्रमाणात दिसून येत आहे. विशेषतः ग्रामीण भागातील मुलींच्या सुरक्षेसाठी अशा दामिनी पथकांचे प्रत्येक शाळा, महाविद्यालय आवारात एक चक्कर तरी होणे गरजेचे आहे. किंवा आठवड्यातून वार बदलवून हे दामिनी पथक जर शाळा महाविद्यालय परिसरांमध्ये चक्कर मारत असतील तर मुलींना एक सुरक्षेची आशा पल्लवीत होते.काही टवाळखोर मुलांच्या वर्तनाने मुलिंमध्ये भिती असते . दामिनी पथक म्हणजे काय ते समजून घेऊ या..दामिनी पथक हे पोलिसांचे एक विशेष पथक आहे, जे महिला आणि मुलींच्या सुरक्षिततेसाठी कार्यरत आहे. या पथकामध्ये महिला पोलीस अधिकाऱ्यांचा समावेश असतो आणि ते महिलांशी संबंधित गुन्हेगारी, छेडछाड आणि आपत्कालीन परिस्थितीत मदत करतात. या पथकाची स्थापना महिलांच्या सुरक्षेसाठी आणि मदतीसाठी करण्यात आली आहे आणि ते विशेषतः शाळा आणि महाविद्यालयांच्या परिसरात गस्त घालतात.
दामिनी पथकाची वैशिष्ट्ये:
पूर्णतः महिला पथक: हे पथक पूर्णपणे महिला पोलीस अधिकाऱ्यांचे बनलेले आहे.
सुरक्षा: महिला आणि मुलींच्या सुरक्षेसाठी आणि संरक्षणासाठी हे पथक स्थापन केले गेले आहे.
मदत: महिलांना कोणत्याही प्रकारची अडचण, छेडछाड किंवा आपत्कालीन परिस्थितीत मदत करण्यासाठी हे पथक तत्पर असते.
तात्काळ प्रतिसाद: मदतीसाठी कॉल केल्यास दामिनी पथकाचे सदस्य त्वरित घटनास्थळी पोहोचतात.
गस्त: महाविद्यालयीन आणि इतर सार्वजनिक ठिकाणी फिरून हे पथक टवाळखोरांवर लक्ष ठेवते आणि त्यांना धडा शिकवते.
मदतीसाठी संपर्क..
तुम्ही दामिनी पथकाच्या हेल्पलाइन क्रमांकावर फोन करून मदतीची मागणी करू शकता.सुरक्षासाठी सा पोलिस व्हिजन धुळे द्वारा प्रकाशित…. मुख्य संपादक.. प्रल्हाद साळुंके,सा पोलिस व्हिजन धुळे
