नंदुरबार जिल्ह्यातील सुंदरदे गावात गांव दिवाळी मोठ्या उत्साहात साजरी…. नवापूर विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार व भावी आमदार दादासाहेब शरद गावित यांची दिवाळीस प्रत्यक्ष भेट देऊन सर्व समाजबांधवांना दिल्या शुभेच्छा!!!!

नंदुरबार.. सा पोलीस व्हिजन धुळे….दिनांक 27.. फेब्रुवारी 2023- रोजी नंदुरबार जिल्ह्यातील सुंदरदे गावात गांव दिवाळी सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या गाव दिवाळी ची परंपरा फार वर्षांपूर्वीची सुरू असून गाव दिवाळी म्हणजे आपल्यासाठी सर्वात मोठा सण हा आदिवासी समाजात मानला जातो. याला एक ऐतिहासिक परंपरा जोडली गेली आहे. प्राचीन काळापासून आदिवासी समाजाने जंगलात राहून, डोंगराच्या कपारी गुहांमध्ये राहून आपले जीवन सतत निसर्गाच्या सानिध्यात कठीण परिस्थितीत काढलेले आहे. त्यांची निसर्गावर आणि देवावर पूर्ण श्रद्धा असते. आदिवासींची ही दिवाळी राणी दिवाळी म्हणून ओळखली जाते. आदिवासींचे देव मोगरा माता ही कुलस्वामिनी आहे. कुलस्वामिनी देव मोगरा माता यांची बहीण पांडोरी माता हिचे या राणी दिवाळी मध्ये पूजन केले जाते. म्हणून तिला गाव दिवाळी किंवा राणी दिवाळी असे म्हटले जाते. यावेळी शिवार्या देव, हिवल्या देव, व इतर आदिवासी समाजाचे देवांचे पूजन केले जाते. यानिमित्त आदिवासी संस्कृती चे जतन आपल्या हातून केले जाते ते पुण्यच आहे असा त्यांचा समज ठाम आहे. आपण आज निसर्गाच्या सानिध्यात राहून कष्ट करून जे पोट भरत आहोत, याला आशीर्वाद कुलस्वामिनी देव मोगरा मातेचा आहे पांडोरी मातेचा आहे. अशी दृढ श्रद्धा संपूर्ण आदिवासी समाज परिसरात आहे. या गाव दिवाळीनिमित्त प्रचंड मोठ्या संख्येने गोडधोड फराळाचे हॉटेल्स विविध स्टॉल विविध सौंदर्यप्रसाधनाची दुकाने पाळणे खेळणी अशा विविधतेची दुकाने या ठिकाणी मांडण्यात आलेले असतात त्यातून मोठी यात्राच या निमित्ताने भरत असते. आजूबाजूच्या पंचक्रोशीतील संपूर्ण आदिवासी समाज या राणी दिवाळीसाठी संपूर्णरात्रभर यात्रेचे स्वरूप असते रात्री जागरण म्हणून सोंगाड्या पार्टी ज्याला आपण तमाशा म्हणतो सतत तीन दिवस हा कार्यक्रम नागरिकांना करमणुकीसाठी सुरू असतो. सुंदरदे गावातील उत्साही सामाजिक कार्यकर्ते श्री कालिदासभाई पाडवी यांनी साप्ताहिक पोलीस व्हिजन ला माहिती देताना सांगितले की या गाव दिवाळीसाठी कितीही गरीब कुटुंब असले तरी प्रत्येक नातेवाईकांना आपल्या घरी या दिवाळीनिमित्त पाहुणे म्हणून बोलावले जाते प्रत्येक कुटुंबामध्ये कोंबडी चिकन भाजी, चांगल्या प्रकाराचा भात, भाकरी पोळ्या असे जेवण घरोघरी या देव दिवाळीनिमित्त केले जाते. सामाजिक कार्यकर्ते कालिदास भाई पाडवी यांच्या घरीआज रात्री सुंदरदे ता जि नंदुरबार येथील गाव दिवाळी प्रसंगी सामाजिक कार्यकर्ते कालिदासभाई पाडवी यांच्या घरी नवापूर मतदार संघाचे माजी आमदार व मा.आदिवासी विकास मंत्री डॉ विजय कुमार गावित साहेब यांचे लहान बंधू तसेच नवापूर विधानसभा मतदारसंघाचे भावी आमदार मा .आमदार साहेब शरददादा पाडवी. यांनी प्रत्यक्ष भेट देऊन सुंदरदे गावातील या गाव दिवाळीसाठी शुभेच्छा यावेळी त्यांनी संपूर्ण यात्रेतील परिसर पायी चालत आपल्या प्रत्येक आदिवासी समाज बांधवांना भेटून शुभेच्छा दिल्या. यावेळी श्री कालिदास भाई पाडवी, यांच्या कुटुंबीयांच्या वतीने दादासाहेब शरद पाडवी यांचा शाल पुष्पगुच्छ देऊन आदरार्थी सत्कार करण्यात आला. साप्ताहिक पोलीस व्हिजनचे मुख्य संपादक माननीय प्रल्हाद साळुंखे यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी सुंदरदे ग्रामपंचायत कार्यालय चे प्रमुख सन्माननीय सरपंच, ग्रामसेवक निखिल बाविस्कर, सामाजिक कार्यकर्ते पंकज पाटील, ग्रामपंचायत सदस्य माळी दादा, ग्रामपंचायत सदस्य वकील साहेब, सामाजिक कार्यकर्ते प्रकाश माळी हे आवर्जून उपस्थित होते. यावेळी दादासाहेब शरद पाडवी यांनी गावातील मूलभूत सुविधांबाबत काही कमतरता आहे का याची प्रत्यक्ष चर्चा ग्रामस्थांशी करून त्या सोडवण्याचा नक्की प्रयत्न केला जाईल हे आश्वासन या दिवाळीनिमित्त दिले आहे. ही दिवाळी मोठ्या थाटामाटात साजरी झाली असून हा सोहळा सतत तीन दिवस सुरू राहणार आहे असे सामाजिक कार्यकर्ते कालिदास पाडवी यांनी कळवले आहे.बातमी पत्र वाचा सा पोलीस व्हिजन धुळे…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *