पुणे येथील सेंट जॉसफ बँथनी काँन्व्हेट स्कूल ची विद्यार्थिनी क्षितीजा चे शासकीय रेखा ग्रेड परीक्षा मध्ये महाराष्ट्र राज्यात गुणवत्ता यादीत यश संपादन

पुणे… पुणे येथील सेंट जाॅसफ बॅंथनी कॉन्व्हेंट स्कूल देहूरोड, पुणे ही एक शैक्षणिक क्षेत्रातील नामांकित शाळा आहे. या शाळेत विविध शैक्षणिक सांस्कृतिक कार्यक्रम पासून तर विविध उपक्रम या ठिकाणी राबवले जातात. यामुळे येथील शाळेतील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक गुणवत्ता वाढीवर चांगल्या प्रकारे परिणाम दिसून येत असतो. विद्यार्थ्यांना शासकीय परीक्षांमध्ये देखील सहभागी केले जाते. या शासकीय ग्रेड परीक्षा महाराष्ट्र शासनाच्या कला शिक्षण मंडळ मुंबई, यांच्या वतीने दरवर्षी घेतल्या जातात. त्यात शासकीय रेखा ग्रेड परीक्षा एलिमेंटरी व इंटरमिजिएट या परीक्षांचा समावेश असतो.याच शाळेच्या मागील वर्षी घेतल्या गेलेल्या सन.2025 मध्ये शासकीय चित्रकला ग्रेड परीक्षा एलिमेंटरी व इंटरमिजिएट या दोन्ही परीक्षांचे निकाल शंभर टक्के लागले असून या विद्यार्थ्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. या विद्यालयाची एलिमेंटरी या ग्रेड परीक्षेमध्ये इयत्ता आठवी तुकडी ब मधील विद्यार्थ्यांनी कुमारी. क्षितिजा अविनाश माने, हिने सर्वोत्तम अ ग्रेड श्रेणी संपादन करून तिने महाराष्ट्र राज्य गुणवत्ता यादीत 97 वा क्रमांक संपादन केला. ही अतिशय अभिनंदननी बाब आहे.शासकीय चित्रकला ग्रेड परीक्षा मध्ये विद्यार्थ्यांना सौ शितल थेऊरकर ,श्री श्रीकांत जाधव सौ.दिव्या माळी या कला शिक्षकांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन लाभले. शाळेच्या प्राचार्या. सिस्टर जेफिन एस आय सी . यांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणाऱ्या कला शिक्षकांचे संस्थेच्या वतीने हार्दिक अभिनंदन केले. व पुढील वाटचालीसाठी विद्यालयातील अजून इतर विद्यार्थ्यांना असेच मार्गदर्शन करून पुढील वर्षी देखील याच पद्धतीने राज्य गुणवत्ता यादीमध्ये आपल्या विद्यालयाचे विद्यार्थी चमकतील अशा अशा व्यक्त केल्या आहेत.बातमी पत्र वाचा सा पोलिस व्हिजन धुळे…. बातमी पत्र..यश साळुंके,सह संपादक पुणे.