
शेवाळी..दा.(साक्री) शेवाळी दातर्ती हे गाव साक्री तालुक्यातील एक सदन व सुशिक्षित उच्च विभूषित ग्रामस्थांचे गाव म्हणून संपूर्ण पंचक्रोशीत ओळखले जाणारे गाव आहे. या गावात प्रत्येक घरात दोन ते तीन सरकारी नोकरी करणारे वरिष्ठ अधिकारी तसेच नामांकित,शिक्षक वकील, डॉक्टर व सर्व क्षेत्रातील नामांकित नोकरवर्ग, आणि तांत्रिक पद्धतीने शेती करणारे मोठे शेतकरी, असलेले हे गाव या गावाने आपली प्रगती झपाट्याने करत असताना गावात विजेचा प्रश्न कायमस्वरूपी निकाली निघावा या दृष्टीने मोठ्या मनाने संपूर्ण ग्रामस्थांनी एम एस ई बी साठी वीज उपकेंद्र आपल्या गावात झाले तर संपूर्ण गावाला विजेचा प्रश्न कायमस्वरूपी निकाली लागेल गावकऱ्यांना 24 तास लाईट मिळेल शेतकऱ्यांना शेताचे पाणी सिंचन करण्यासाठी लाईटची सुव्यवस्था होईल या चांगल्या भावनेतून या उपकेंद्राला गावठाण मधून जागा उपलब्ध करून दिली आहे. मात्र या ठिकाणी अनेक काही उपअभियंता आलेत त्यांनी प्रामाणिकपणे काम करण्याचा प्रयत्न केला काही वायरमन यांनी अतिशय चांगले काम करून या गावात नावा रूपाला आलेले आहेत. गावकरी त्यांचे खूप नाव काढतात त्यांच्या बदल्या झाल्या तरी त्यांना विसरलेले नाहीत. पण सूर्याला व चंद्राला जसे ग्रहण लागते तसे काही काम चुकार अधिकारी जर एखाद्या उपकेंद्राला मिळाले त्यातून शेतकऱ्यांना मोठे नुकसान होते याचे एक जिवंत उदाहरण शेवाळी वीज उपकेंद्राला सध्या लाभलेले सावंत नामक उप अभियंता यांच्यामुळे वेळेवर शेतकऱ्यांना जळालेला ट्रान्सफॉर्मर मिळत नाही वेळेवर लाईट डीओ गेला तर तो टाकला जात नाही लाईट गेली तर ती सुरू नंतर होत नाही अशा अनंत अडचणींना शेतकऱ्यांना सामोरे जायला गेल्या चार-पाच महिन्यांपासून हा प्रश्न निर्माण झालेला आहे. महाराष्ट्र पत्रकार संघाने देखील यांना तीन महिन्यांपूर्वी निवेदन दिलेले होते तरी देखील यांच्या कामकाजात सुधारणा झालेली नाही म्हणून शेतकऱ्यांचा संताप आज अनावर झाला आणि शेतकऱ्यांनी आपल्या संतप्त भावनेतून आपल्या शेताच्या पिकांच्या नुकसाना मुळे एक कठोर निर्णय घेऊन या उपअभियंता कार्यालयाला टाळे ठोकले. त्याचे सविस्तर वृत्त असे की,आज दि.२८/०५/२०२६ गुरूवार रोजी शेवाळी येथील संतप्त शेतकऱ्यांनी शेवाळी येथील विज वितरण कंपनीला कुलुप लावुन आपला राग व्यक्त केला शेवाळी येथील ४ न.ट्रांन्सफार्मर(डि.पी.) गेल्या सात(७) दिवसापासून बंद असुन सुद्धा शेवाळी विज वितरण कंपनीचे क.अभियंता विवेक सांवत लक्ष देत नाही वेळोवेळी शेवाळी येथील शेतकरी त्यांच्याशी मोबाईलने संपर्क साधण्याचा प्रयत्न करत होते पण विवेक सावंत हे कोणाचाही मोबाईल ऊचलत नव्हते तसेच शेवाळी येथील त्यांच्या ऑफिसमध्ये ते कधीच येत नसल्याने शेतकरी संतप्त झाले सध्या कपाशी लागवड करण्याच काम चालू आहे आणि सात दिवसांपासून ट्रान्सफॉर्मर बंद असल्याने संतप्त शेतकऱ्यांनी शेवाळी येथील एम.एस.सी.बी च कार्यालयाला कुलूप लावून क.अभियंता विवेक सावंत यांच्या विरोधी घोषणा दिल्या शेवटी साक्री येथील विज वितरण कंपनीचे उप अभियंता श्री.गणेश जाधव यांनी श्री.दिपक साळुंके यांच्याशी मोबाईल द्वारा संपर्क करून आश्वासन दिले कि दोन तासात ट्रान्सफॉर्मर बसवण्याची व्यवस्था करतो तो पर्यंत आंदोलन थांबवावे शेवटी शेवाळी येथील शेतकऱ्यांनी क.अभियंता विवेक सावंत यांच्यावर त्वरित कारवाई करण्यात यावी अशी विनंती केली तसेच दोन तासात ट्रान्सफॉर्मर बसवण्यात यावे या अश्वासनावर आंदोलन माघे घेतले या वेळी शेवाळी,देवनगर येथील शेतकरी दिपक साळुंके,डॉ.विजय साळुंके, संजय साळुंके,संदिप साळुंके,आनिल साळुंके, प्रशांत भामरे, सतिष साळुंके,सोनु भास्कर,भाऊलाल सोनु, भगवान मारनर,भटु चिंधा, सुरेश मारनर, संतोष भास्कर,शंकर भटु,हीरामन, सखाराम मारनर आदी शेतकरी उपस्थित होते. समस्त शेवाळी ग्रामस्थ शेतकरी यांनी हे आंदोलन करून आज काम चुकार अभियंतांना एक प्रकारचा प्रथम इशारा दिलेला आहे. यापुढे जर असे होत असेल तर याहीपेक्षा मोठे आंदोलन करण्याचा देखील मागेपुढे विचार केला जाणार नाही असा देखील सज्जड इशारा शेळी येथील शेतकऱ्यांनी दिलेला आहे.बातमी पत्र वाचा सा पोलिस व्हिजन धुळे…


संतप्त शेवाळी दा ता साक्री जि धुळे येथील शेतकऱ्यांनी विजवितरण कायकारी उप अभियंता कार्यालयाला ठोकले टाळे व प्रचंड घोषणाबाजी करुन विजवितरण कार्यकारी उप अभियंता यांचा केला निषेध… बातमी पत्र वाचा सा पोलिस व्हिजन धुळे
