धुळे …सा पोलिस व्हिजन ला पोलिस प्रशासनाने दिली माहिती … देवपुरातील नकाने रोड परिसरात राहणाऱ्या एका 62 वर्षीय सेवानिवृत्त अभियंताला आयपीएस अधिकारी असल्याचे भासवून मनी लॉडरींगच्या नावाने घाबरवण्यात आले. त्या मोबदल्यात बँक खात्यात पैसे जमा करण्यास भाग पाडून तब्बल 64 लाखांची फसवणूक करण्यात आली याप्रकरणी सायबर पोलीस ठाण्यात मंगळवारी सायंकाळी अज्ञात व्यक्तीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे नकाने रोडला लागून प्रमोद नगरातील सेक्टर 3 मध्ये अविनाश विष्णू शिनकर वय वर्ष 62 हे राहतात पाटबंधारे विभागात अभियंता म्हणून ते निवृत्त झाले आहेत काही दिवसांपूर्वी ते घरी असताना अज्ञात व्यक्तीने त्यांना व्हाट्सअप वर फोन केला त्याचे अंकित शर्मा नाव असून आयपीएस अधिकारी असल्याचे त्यांनी सांगितले मनी लॉन्ड्रींग प्रकरणात आपला सहभाग समोर आला आहे त्यामुळे तुमच्यावर कारवाई केली जाणार अशी भीती दाखवली या भीतीला घाबरून अविनाश शिनकर यांनी कथित आयपीएस अधिकाऱ्याने सांगितलेल्या बँक खात्यात पैसे भरले मात्र त्यानंतरही अज्ञात व्यक्ती त्यांना सतत घाबरत होता शिनकर यांनी तब्बल 64 लाख रुपये आरटीजीएस द्वारे वर्ग केले 12 सप्टेंबर ते 24 ऑक्टोबर च्या दरम्यान हा प्रकार घडला त्यानंतर हा प्रकार शिनकर यांनी निकटवर्ती यांना सांगितल्यावर पोलिसांची मदत घेण्यात आली. याप्रकरणी अविनाश शिनकर यांच्या तक्रारीवरून आता सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपासासाठी आता सायबर सेल ऍक्टिव्ह झाला असून तसेच तंत्रज्ञानाची मदत घेतली जात आहे याशिवाय आजवर झालेल्या व्यवहारांची माहिती पोलीस घेत आहेत लवकरच गुन्ह्याची उकल केली जाईल नागरिकांनी सावध राहणे गरजेचे असल्याची माहिती पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी दिली आहे. अशाच प्रकारच्या अनेक विविध फसवणुकीचे गुन्हे वाढत असल्याने पोलीस प्रशासनाकडे असलेल्या नागरिकांनी सर्व तक्रारी दाखल केल्यास अशा ठकबाजांची आता खैर नाही असे पोलिस प्रशासनाने सा पोलिस व्हिजन ला माहिती दिली आहे . बातमी पत्र वाचा सा पोलिस व्हिजन

मनी लॉन्ड्रींग.
