✍🏼✍🏼✍🏼✍🏼✍🏼✍🏼*शासकीय रेखा कला चित्रकला ग्रेड परीक्षा बाबत विद्यार्थ्यांना प्रश्न पत्रिका या वर्षी देण्यात येणार नाहीत फलकावर प्रश्न पत्रिका लिहून देण्याचे आदेश अखेर महाराष्ट्र राज्य कला शिक्षक महासंघ च्या तीव्र संतापाने अखेर आदेश मागे घेण्यात आला✍🏼✍🏼✍🏼✍🏼✍🏼

✍🏼🌟महाराष्ट्र शासनाच्या कलाशिक्षण मंडळ मुंबई वतीने शासकीय रेखा कला चित्रकला ग्रेड परीक्षांचे सोमवार दिनांक.. 28 ,29, 30, व एक सप्टेंबर 2026 असे नियोजित वेळापत्रक प्रसिद्ध करण्यात आले असून सदर परीक्षांना त्यांच्याकडील परिपत्रक क्रमांक/ कशिम-2026/आठ/1733 दिनांक 22 /9/ 2026 नुसार लिखित आदेश काढण्यात आले होते. यात प्रश्नपत्रिकांच्या बाबत यावर्षी प्रथमच शंभर वर्षांची परंपरा मोडीत काढण्यात आली असून, आता प्रश्नपत्रिकेची हार्ड कॉपी ही कोणत्याही परीक्षार्थी विद्यार्थ्याला देण्यात येऊ नये. केंद्राच्या पोर्टलवर एकच प्रश्नपत्रिका पाठवण्यात येईल व ती डाउनलोड करून घेऊन त्यातील प्रश्न फलकावर लिहून द्यावे असे गोंडस आदेश यात दिलेला होते. शासकीय परीक्षांचा खेळ खंडोबा करण्याचा हा प्रयत्न कलाशिक्षण मंडळांनी केलेला दिसून होता. याचा तीव्र शब्दात महाराष्ट्र राज्य कलाशिक्षक महासंघने विरोध दर्शवला होता. विद्यार्थ्यांना दोनशे रुपये फी भरून देखील जर प्रश्नपत्रिकाच मिळत नसेल तर या परीक्षांना महत्त्व राहणार नाही. तसेच या परीक्षांना मराठी, हिंदी, उर्दू, आणि इंग्रजी माध्यमातील शाळांमधील विद्यार्थी या शासकीय एलिमेंट्री व इंटरमिजिएट परीक्षांना बसत असतात. त्यांना फलकावर उर्दू ,इंग्रजी, हिंदी व मराठी या भाषेत प्रश्नपत्रिका फलकावर लिहून देणे कितपत योग्य होईल?? असा सवाल महासंघाच्या प्रदेश कार्यकारिणीने विचारला होता.याचा विचार कलाशिक्षण मंडळाच्या तज्ञ अधिकाऱ्यांनी केलेला दिसून येत नव्हता. शंभर वर्षांपासून या परीक्षांच्या प्रश्नपत्रिका मराठी उर्दू इंग्रजी व हिंदी या भाषेत छापून विद्यार्थ्यांना मिळत होत्या आणि आज त्या मिळणार नाहीत. त्यामुळे परीक्षार्थी विद्यार्थी, केंद्र संचालक, पालक व कलाशिक्षक संघटनांमध्ये प्रचंड संताप व्यक्त होत होता.यासाठी कलाशिक्षण मंडळ यांना महाराष्ट्र राज्य कला शिक्षक महासंघ वतीने विनंती करण्यात आली होती की, पूर्वीप्रमाणेच प्रत्येक विद्यार्थ्याला या शासकीय रेखा ग्रेड चित्रकला परीक्षांच्या प्रश्नपत्रिका मिळाव्यात विद्यार्थ्यांचा हक्क हिरावून घेता कामा नये व परीक्षा सुरळीत व्हाव्यात यासाठी नियोजन व्यवस्थित करावे असे मत महाराष्ट्र राज्य कलाशिक्षक महासंघाच्या वतीने करण्यात आले होते.कलाशिक्षण मंडळ मुंबई यांनी काल उशिरा रात्री हा निर्णय घेऊन अखेर पूर्वीप्रमाणेच विद्यार्थ्यांना प्रश्नपत्रिका मिळण्याची सोय करून दिली आहे असे परिपत्रक काढले त्या निर्णयाचे महासंघाच्या प्रदेश अध्यक्ष प्रल्हाद शिंदे, प्रदेश सरचिटणीस प्रल्हाद साळुंखे, प्रदेश उपाध्यक्ष राजेश निंबेकर, महेंद्र निकुंभ, सुहास पाटील, अजय भदाणे, दत्तात्रय सांगळे, प्रदेश कोषाध्यक्ष, श्री.रामचंद्र इकारे सर , प्रदेश सदस्य श्री नवाब शहा, श्री विवेक महाजन, राज्य सहचिटणीस प्रकाश चंद्र मिश्रा, मुंबई महिला आघाडी प्रमुख सौ.भारती जाधव, जेष्ठ मार्गदर्शक सुनील महाले, मोहन माने, रमेश तुंगार, नाशिक विभागीय अध्यक्ष, जिल्हा अध्यक्ष, तालुका अध्यक्ष, सर्व सदस्य तमाम महाराष्ट्रातील कलाशिक्षक यांच्या वतीने समाधान व्यक्त करण्यात आले आहे✍🏼✍🏼✍🏼✍🏼✍🏼 प्रल्हाद साळुंके प्रदेश सरचिटणीस महाराष्ट्र राज्य कला शिक्षक महासंघ 98881404361. ✍🏼✍🏼✍🏼✍🏼✍🏼✍🏼✍🏼✍🏼✍🏼✍🏼आता दिनांक..24/09/2026 वार गुरुवार चे नवीन सुधारित आदेश असे,शासकिय रेखा कला परीक्षेचा पेपर बोर्डावर लिहून देण्याचा कलासंचालकांचा आदेश मागे पूर्वीप्रमाणे प्रश्नपत्रिका विद्यार्थ्यांना मिळणार
= = = = = = = = = = = = =
महाराष्ट्र राज्य कलाशिक्षक महासंघाच्या पाठपुराव्याला यश
= = = = = = = = = = = = =
28 सप्टेंबर पासून एलिमेंटरी व इंटरमिजिएट परीक्षेला सुरुवात
= = = = = = = = = = = = = =
महाराष्ट्र शासन कला संचनालय महाराष्ट्र राज्य मुंबई यांच्या मार्फत राज्यात व राज्याबाहेरील अनेक राज्यांमध्ये 1000 पेक्षा आधिक केंद्रावर शासकीय चित्रकला ग्रेड परीक्षेचे आयोजन केले जाते या परीक्षेला इंग्रज सरकारच्या काळपासून 100 वर्षाचा इतिहास आहे दिनांक 28 व 29 सप्टेंबर रोजी एलिमेंटरी व 30 सप्टेंबर व 01 ऑक्टोंबर रोजी इंटरमिजिएट ग्रेड परिक्षांना पारंभ होणार आहे पासून परंतु यावर्षी कला संचालक व कला संचालनालयाच्या कला शिक्षण मंडळ यांनी आगळावेगळा निर्णय घेऊन परीक्षेला बसलेल्या लाखो विद्यार्थ्यांना हार्ड कॉपी प्रश्न पत्रिका न पुरवण्याचा निर्णय घेण्यात आला होता आणि प्रश्नपत्रिका सामुदायिकपणे ब्लॅक बोर्डवर प्रश्नपत्रिका लिहून देण्याचे दिनांक 22 सप्टेंबर 2026 रोजी ऐन परीक्षेच्या चार दिवस अगोदर आदेश काढण्यात येवून लाखो रुपये वाचविण्याचा प्रयत्न करून विद्यार्थी व केंद्रसंचालक , कला शिक्षकांची वेड्यात गिणती करण्याचा प्रयत्न केला . याला महाराष्ट्र राज्य कला शिक्षक महासंघ प्रदेशाध्यक्ष प्रल्हाद शिंदे व प्रदेश सरचिटणीस प्रल्हाद साळुंके यांनी तात्काळ लेखी निवेदन देऊन राज्यातील सर्व शिक्षक व पदवीधर आमदार यांच्याकडे नापसंती व्यक्त करून तात्काळ आपण हस्तक्षेप करून कला शिक्षकांना व विद्यार्थ्यांना न्याय देण्याची विनंती केली . तसेच या अजब प्रकाराने . राज्यातील तसेच राज्य-बाहेरील अनेक राज्यात कला संचालक, परीक्षा नियंत्रक व कला शिक्षण मंडळाचा विरोधात निषेध व खेद व्यक्त केला जात असून संतापाची लाट पसरली होती महाराष्ट्र राज्य कलाशिक्षक महासंघाच्या पत्रातील विनंतीनुसार अनेक आमदारांनी संबंधित विभाग प्रमुखांना दूरध्वनी द्वारे संपर्क साधून तात्काळ सदर परीक्षा सुरळीत करण्याबाबत सूचना करण्यात आल्या तेव्हा कलाशिक्षक महासंघाच्या मागणीवरून *आज कला संचालक डॉक्टर किशोर इंगळे , कला उपसंचालक व कला शिक्षण मंडळाचे अध्यक्ष विनोद दांडगे, परीक्षा नियंत्रक नागेश वाघमोडे यांनी मंत्रालयात तंत्र शिक्षण विभागातील उच्चतम अधिकारी यांच्याबरोबर तात्काळ बैठक करून महासंघाची मागणी रास्त असून पूर्वी प्रमाणे प्रत्येक विद्यार्थ्याला हार्ड कॉपी स्वरूपात प्रश्नपत्रिका दिल्या पाहिजे याबाबत चर्चा केली आणि रात्री उशिरा सर्व 1000 पेक्षा अधिक केंद्र संचालक आणि कलाशिक्षक महासंघाला लेखी स्वरुपात कळवून बोर्डावर प्रश्नपत्रिका लिहून द्यावे असे जे आदेश काढले होते ते रद्द करण्यात येऊन पूर्वीप्रमाणेच प्रश्न पत्रिका ऑनलाईन केंद्रावर लॉगिनवर उपलब्ध करून देण्यात येत असल्याचे परिपत्रक जारी करण्यात आले. यासाठी नासिक विभागाचे पदवीधर आमदार माननीय सत्यजित तांबे साहेब, नासिक विभागाचे शिक्षक आमदार माननीय किशोर दराडे साहेब, छत्रपती संभाजी नगर विभागाचे शिक्षक आमदार, माननीय विक्रम काळे साहेब, छत्रपती संभाजी नगर विभागाचे पदवीधर आमदार माननीय चव्हाण साहेब, यांनी महाराष्ट्र राज्य कलाशिक्षक महासंघाच्या विनंतीला मान देऊन कला संचालनालय मुंबई यांना फोन करून मोलाचे सहकार्य केले त्यांचे जाहीर आभार.तसेच कला संचालकाच्या या सतर्कतेमुळे व कलाशिक्षक महासंघाच्या मागणीचा विचार करून प्रश्नपत्रिका देण्याबाबत परिपत्रक काढले त्याबद्दल कला संचालक , उपसंचालक व परीक्षा नियंत्रण या सर्वांचे कला शिक्षक महासंघाच्या वतीने समाधान व्यक्त करण्यात येत असून तमाम आपल्या महाराष्ट्र राज्य कलाशिक्षक महासंघाचे सर्व प्रदेश कार्यकारणी पदाधिकारी, विभागीय कार्यकारणी पदाधिकारी, जिल्हा अध्यक्ष, तालुका अध्यक्ष, व सर्व कलाशिक्षक यांनी या परीक्षांसाठी सर्व केंद्र संचालकांना मोलाचे सहकार्य करून या परीक्षा सुरळीत करण्याचे देखील कळवण्यात येत असल्याचे प्रदेशाध्यक्ष प्रल्हाद शिंदे व प्रदेश सरचिटणीस प्रल्हाद साळुंके यांनी कळविलेल आहे.

*महाराष्ट्र राज्य कला शिक्षक महासंघ वतीने स्पष्ट इशारा देखील देण्यात आला आहे की, शासकीय रेखा ग्रेड परीक्षा कामकाजात वा कला शिक्षण मंडळ मुंबई च्या कमेटीवर कोणताही सेवानिवृत्त कलाशिक्षक वा कर्मचारी यांना नेमणूक करू नये.वा केली असल्यास त्यांची तातडीने हकालपट्टी करण्यात यावी जेणेकरून या शासकीय एलिमेंट्री व इंटरमिजिएट ड्रॉईंग ग्रेड परीक्षा चा गोपनीयतेचा भंग होणार नाही.किंवा इतर प्रकार होणार नाही.जर सेवानिवृत्त कलाशिक्षक व कर्मचारी यांचा हस्तक्षेप आढळून आला तर त्यांच्यावर होणाऱ्या पुढील कारवाईस संपूर्ण प्रशासन जबाबदार राहील असा सज्जड इशारा महाराष्ट्र राज्य कलाशिक्षक महासंघाने दिला आहे*

स्नेहांकित ,

प्रल्हाद शिंदे , प्रदेश अध्यक्ष

प्रल्हाद साळुंके
प्रदेशाध्यक्ष प्रदेश सरचिटणीस
महाराष्ट्र राज्य कला शिक्षक महासंघ