कर्म.आ.मा.पाटील वरिष्ठ महाविद्यालयात स्वच्छताही सेवा अंतर्गत पिंपळनेर पोलीस्टेशन येथे श्रमदान.—-‐—————————————कर्म.आ.मा.पाटील वरिष्ठ महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना या एककाने पिंपळनेर पोलिस्टेशन येथे पोलिस्टेशन च्या आवारातील केरकच-याची 1तास साफसफाई केली.प्रारंभी प्रभारी प्राचार्य के.डी.कदम यांनी रॅलीचे श्रीफळ वाढवून उद्घाटन केले.स्वच्छतेवर घोषणा देत रॅली पिंपळनेर पोलिस्टेशन ला गेली.तेथे पोलिस मित्रांसोबत एन.एस.एसच्या विद्यार्थ्यांनी आवारातील साफसफाई केली.कार्यक्रमाच्या समारोप प्रसंगी राष्ट्रीय कार्यक्रम अधिकारी प्रा.एल.जे.गवळी व विद्यार्थ्यांनी पोलीसांच्या जीवन कार्या बदल एक गीत सादर केले.पिंपळनेर पोलिस्टेशनचे पी.एस.आय.मा.पारधी साहेब यांनी मनोगत व्यक्त करतांना स्वच्छता असली तर आपले आरोग्यतंदुरुस्त राहते.बाह्य स्वच्छता जेवढी महत्वाची तेवढीच आंतरीक स्वच्छता देखील महत्त्वाची असते.प्रत्येक विद्यार्थ्यांने आपले घर,आपले अंगण,आपला परिसर,आपली गल्ली,आपले महाविद्यालय,आपले गाव व आपली नदी कसे स्वच्छ राहील यासाठी कटिबद्ध असायला हवे.आपोआप स्वच्छता राखली जाऊन संपूर्ण भारत स्वच्छ होईलअसे मत व्यक्त केले.सदर कार्यक्रमास मा.पी.एस.आय श्री.पारधी साहेब, प्राचार्य श्री.के.डी.कदम सर, पत्रकार श्री.सुभाष जगताप,सर्व पोलीस बंधु,होमगार्ड बंधु भगिनी व महाविद्यालयातील डाॅ.बी.सी.मोरे,डाॅ.एन.बी.सोनवणे,प्रा.सी.एन.घरटे,डाॅ.खरात ए.जी. प्रा.डी.बी.जाधव,प्रा.डाॅ.वाय.एम.नांद्रे प्रा.सी.एन.घरटे,प्रा.पी.एम.सावळे प्रा.हितेश वानखेडे, प्रा.पवन निकम ,प्रा.सुर्यवंशी,श्री.सुनील गुरव, श्री.संदिप अमृतकर,श्री.के.एन.कुवर,श्री.नरेंद्र ढोले श्री.ठाकरे, श्रीमती ठाकूर मॅडम,हे देखील स्वच्छता अभियानात सहभागी झाले. पोलिस्टेशन येथील कार्यक्रम आटोपून पुन्हा महाविद्यालयातील बागेची व परिसरातील साफसफाई करण्यात आली.सदर कार्यक्रमास प्रा.पवन निकुम, मौनेश सोनवणे,कु.क्षमा पांडे,कु.चेतना निकुम, कु.डिंपल गांगुर्डे.कु.सुलोनी राऊत,कु.रोशनी ढोले,कु.राजलक्ष्मी शिरसाठ, कु.प्रगती गोसावी,भावसिंग, राकेश,संतोष,दाविद, करण या विद्यार्थ्यांचे मोलाचे सहकार्य लाभले.कार्यक्रमाच्या शेवटी आभार डॉ. एस.एन तोरवणे यांनी आभार मानले..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *