शासकीय रेखाकला ग्रेड परीक्षा २०२६च्या नियोजनाचा आढावा प्रत्यक्ष कलासंचालक व संचालक यांच्या परीक्षा केंद्र भेटीतुन सुरू

मुंबई……सोमवार, दिनांक २८ सप्टेंबर २०२६ पासून राज्यभर सुरू होणाऱ्या शासकीय रेखाकला ग्रेड परीक्षा २०२६च्या नियोजनाच्या अनुषंगाने आज महाराष्ट्र राज्याचे कला संचालक डॉ. किशोर इंगळे यांनी नागपूर येथील परीक्षा केंद्रांना प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली.तसेच मुंबई व इतर जिल्ह्यांमध्ये महाराष्ट्र राज्य कला शिक्षण मंडळ मुंबई संचालक श्री विनोद दांडगे यांनी भेटी दिल्या आहेत.इतर जिल्ह्यातील परीक्षा केंद्रावर देखील भेटी दिल्या जाणार आहेत.

यावेळी त्यांनी परीक्षा केंद्रावरील विविध व्यवस्थांचा आढावा घेतला. विशेषतः प्रश्नपत्रिका, उत्तरपत्रिका तसेच परीक्षा साहित्याच्या गोपनीयतेसंदर्भातील उपाययोजनांची त्यांनी प्रत्यक्ष पाहणी केली. परीक्षा प्रक्रियेदरम्यान गोपनीयता व सुरक्षितता अबाधित राहावी, याबाबत संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना देण्यात आल्या.

तसेच विद्यार्थ्यांना परीक्षेच्या निर्धारित वेळेनुसार प्रश्नपत्रिका व आवश्यक परीक्षा साहित्य वेळेत उपलब्ध होईल, याची खात्री करण्यात आली. परीक्षा सुरळीत, पारदर्शक व नियोजनबद्ध पद्धतीने पार पाडण्यासाठी सर्व संबंधित यंत्रणांनी आवश्यक ती दक्षता घ्यावी, अशा सूचना डॉ. इंगळे यांनी यावेळी दिल्या.

बातमी पत्र वाचा सा पोलिस व्हिजन धुळे…

मुख्य संपादक… प्रल्हाद साळुंके, धुळे