
धुळे… धुळे शहरातील अनेक रस्त्यांची कामे सध्या सुरू आहेत. आणि रस्ता, गटारी, लाईट, पाणी या मूलभूत गरजा याच सामान्य जनतेच्या खऱ्या उपयोगात येणाऱ्या गरजा म्हणून त्या पाहिल्या जातात. सामान्य नागरिकांना या सुविधांव्यतिरिक्त इतर मागण्या फारच कमी असतात. महानगरपालिकेच्या निवडणुका लागल्यात त्या आधीच अनेक रस्त्यांची उद्घाटन करून कामाचा धडाका लावण्यात आलेला होता. परंतु निवडणुका लागल्याने मध्येच ती कामे थांबली. त्यानंतर निवडून आलेल्या नगरसेवकांनी आपल्याला आपल्या वॉर्ड मध्ये काम करण्यासाठी निधी उपलब्ध व्हावा यासाठी प्रयत्न सुरू केलेत. अशाच प्रकारचा प्रयत्न वार्ड क्रमांक.11 मधील रामचंद्र नगर ते पवन नगर मधील दाता सरकार मंगल कार्यालय पर्यंतचा जो मुख्य रस्ता आहे त्या रस्त्याची अतिशय वाईट दुर्दशा झाली होती. गटारीचे ड्रेनेज हे अंडरग्राउंड टाकण्याचे काम बऱ्याच दिवसापासून चालू होते. त्यामुळे या रस्त्यावरचे काम अपूर्ण अवस्थेमध्ये राहिल्याने नागरिकांना या रस्त्यावरून चालणे देखील खूप कठीण झाले होते.या वार्डातील महानगरपालिकेच्या माझी महापौर तथा आता निवडणुकीत भाजप पक्षाच्या नवनियुक्त निवडून आलेल्या नगरसेविका जयश्रीताई अहिरराव व त्यांचे पती सामाजिक कार्यकर्ते गुड्डू भाऊ अहिरराव यांनी या रस्त्यासाठी मंजूर झालेले दोन कोटी रुपयांचा निधी हा अतिशय तुटपुंज्या असल्याने, प्रशासनाला सांगत हा रस्ता आम्हाला उच्च दर्जाचा तयार करायचा असून एकदाच चांगले काम व्हावे या रस्त्याच्या मधोमध दुतर्फा व्हावा, मध्यभागी लाईटचे पोल यावेत, साईडला सुंदर झाडे लावण्यात यावीत अशा पद्धतीने सिमेंट काँक्रेट चा हा रस्ता मजबूत तयार करायचा असल्याने यावर अतिरिक्त दोन कोटीचा निधी मंजूर करून घेण्यास यश प्राप्त केले आहे. *या रस्त्यासाठी तत्कालीन पालकमंत्री गिरीश भाऊ मिळाले यांच्या डीपीडीसी मधून निधी मिळाला.
या साठी पालकमंत्री जयकुमार भाऊ रावल, आमदार अनुप भैया अग्रवाल, जिल्हाध्यक्ष गजेंद्र भाऊ अंपळकर ,त्यांचे सहकार्य मिळत आहे .अशी माहिती नवनिर्वाचित भाजपाच्या नगरसेविका जयश्रीताई अहिरराव यांनी साप्ताहिक पोलीस व्हिजन ला माहिती दिली आहे*. सामान्य ज्येष्ठ नागरिकांनी याविषयी नगरसेविका जयश्री ताई अहिराव यांच्याशी सकारात्मक चर्चा केली आणि या रस्त्याबाबत जी कामाची आपण सुरुवात केली त्याबद्दल नागरिकांनी आभार देखील मानलेत. या दोन महिन्यात हा उत्तम रस्ता तयार करण्यासाठी आम्हाला वेळ द्या अशी विनंती देखील सामाजिक कार्यकर्ते गुड्डू भाऊ अहिरराव आणि त्यांच्या धर्मपत्नी नवनिर्वाचित भाजपा नगरसेविका जयश्रीताई अहिराव यांनी कॉलनी परिसरातील जमलेल्या नागरिकांना विनंती केली आहे. हा रस्ता धुळे जळगाव कडे जाणारा पारोळा रोड आहे शेतकरी पुतळ्याला लागून हा पंधरा मीटरचा रस्ता थेट दाता सरकार मंगल कार्यालय इथपर्यंत उत्तम प्रकारचा काँक्रीटीकरण रस्ता होणार आहे. या रस्त्यावर रहदारी अतिशय जास्त प्रमाणात असल्याने दीर्घकाळ या रस्त्याला टिकण्यासाठी हा निर्णय घेण्यात आलेला आहे. रामचंद्र नगर, पवन नगर, स्वामीनारायण सोसायटी, नवनाथ नगर, अलंकार सोसायटी, शिव कॉलनी, रामनगर, अभय कॉलेज कडे जाणारी वाहतूक याच रस्त्यावरून जात असल्यामुळे हा रस्ता प्रतिष्ठित मानला जातो. यासाठी हा रस्ता तयार होत असल्यामुळे नागरिकांमध्ये उत्साहाचे व आनंदाचे वातावरण आहे. या वॉर्ड मध्ये चारही नवनिर्वाचित नगरसेवक हे भाजपाचे निवडून दिलेले असल्याने नागरिकांकडून या नवनिर्वाचित नगरसेवकांकडून कामाच्या अपेक्षा आहेत. आणि त्या नक्कीच पूर्ण होतील अशी आशा देखील आहे. नवनिर्वाचित नगरसेविका जयश्रीताई अहिरराव यांनी मनावर जर घेतले तर ते काम करतातच हा आजवरचा अनुभव जनतेला आहे. सामान्य लोकांमध्ये मिसळणे गोरगरिबांच्या लग्न समारंभ असो की इतर कार्यक्रम या ठिकाणी जयश्रीताई आवर्जून भेट देतात त्यामुळे त्यांचा जनमानसात आदर आहे. म्हणून या रस्त्याचे काम लवकरात लवकर पूर्ण होईल अशी त्यांनी जनतेला आश्वासित केले आहे.

