आ.अनुपभैय्या, महापौर मायादेवी परदेशींचा व आयुक्त यांची’धुळे महानगरपालिकेच्या कामचुकार कर्मचारी वर खडक कारवाई’

धुळे (सा पोलिस व्हिजन क्राईम न्यूज ब्युरो) महानगरपालिकेच्या कामकाजात गंभीर कुचराई झाल्याचा ठपका ठेवत मोठी प्रशासकीय कारवाई करत तब्बल १६ अधिकारी व कर्मचार्‍यांना निलंबित करण्यात आले आहे. धुळे शहराचे आमदार अनुपभैय्या अग्रवाल यांच्या मार्गदर्शनाखाली, धुळे शहर भाजपा जिल्हाध्यक्ष गजेंद्रशेठ अंपळकर यांच्या विशेष पुढाकाराने आणि महापौर सौ.मायादेवी परदेशी यांच्या खंबीर नेतृत्वात धुळे मनपा प्रशासनाने ही आजवरची सर्वात मोठी कारवाई केल्याने मनपा वर्तुळात खळबळ माजली आहे.
महापालिकेच्या प्रामुख्याने स्वच्छता विभागाशी संबंधित अधिकार्‍यांवर ही कारवाई करण्यात आली असून, यामध्ये मुख्य स्वच्छता निरीक्षक, स्वच्छता निरीक्षक तसेच मुकादम पदावरील कर्मचार्‍यांचा समावेश आहे. शहरातील स्वच्छता व्यवस्थापनात झालेल्या त्रुटींमुळे ही कठोर पावले उचलण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे.
निलंबन कालावधीत संबंधित अधिकारी-कर्मचार्‍यांनी मुख्यालयाची पूर्वपरवानगी घेतल्याशिवाय मुख्यालय सोडू नये, असे आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे. तसेच त्यांना नियमानुसार निर्वाह भत्ता देण्यात येणार असून या आदेशाची नोंद त्यांच्या सेवापुस्तकात करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे, निलंबनासोबतच संबंधितांना सुधारण्यासाठी एक महिन्याची अंतिम संधी देण्यात आली आहे. या कालावधीत कामकाजात अपेक्षित सुधारणा न झाल्यास उपायुक्त (आरोग्य) यांनी संबंधितांना सेवेतून बडतर्फ करण्याची शिफारस सक्षम प्राधिकार्‍यांकडे सादर करावी, असे स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत. ही कारवाई महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमाच्या कलम ५६(२) तसेच महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त व अपील) नियम, १९७९ अंतर्गत करण्यात आली आहे असे आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे. या कारवाईमुळे धुळे महापालिकेतील प्रशासनाने निष्काळजीपणा व कामातील हलगर्जीपणाबाबत शून्य सहनशीलतेचा स्पष्ट संदेश दिला आहे.शहरातील स्वच्छता व्यवस्थेत सुधारणा घडवून आणण्यासाठी ही कारवाई निर्णायक ठरणार का, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.
** निलंबित अधिकारी व कर्मचारी*
या कारवाईत मुख्य स्वच्छता निरीक्षक राजेश वसावे, लक्ष्मण पाटील, चंद्रकांत जाधव यांच्यासह स्वच्छता निरीक्षक गौतम गोयर, रुपेश पवार, सौजाद शेख, आसिफ बेग, अर्जुन जाधव, प्रभारी स्वच्छता निरीक्षक अनिल जावडेकर यांचा समावेश आहे. मुकादम पदावरील आकाश चांगरे, चेतन गोयर, कैलास पाटील, साजित सिकंदर शेख, किशोर मोरे, दत्तात्रय माळी व सफर बेग यांनाही निलंबित करण्यात आले आहे.
भाजपचा विरोधकांसह शिवसेना उबाठावर निशाणा
याच धडक कारवाईची माहिती देताना भाजपचे जिल्हा प्रवक्ता तथा उपाध्यक्ष पृथ्वीराज आधार पाटील यांनी पत्रकाद्वारे विरोधकांचा समाचार घेतला आहे. त्यांनी नमूद केले की, भाजपा आमदार अनुपभैय्या अग्रवाल, जिल्हाध्यक्ष गजेंद्रशेठ अंपळकर, महापौर सौ मायादेवी परदेशी, आयुक्त नितीन कापडणीस यांनी कर्तव्यात कसूर करणार्‍या व धुळेकरांच्या आरोग्याशी खेळणार्‍या १६ कर्मचार्‍यांना तात्काळ निलंबित करण्याचे आदेश देण्यात आले आहे. धुळे महानगरपालिकेला शिस्त लावण्यासाठी मनपा आयुक्त श्री. नितीन कापडणीस यांनी नेहमीच महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे.
’शासकिय गाडी सोडून महापौर
दुचाकीवरून ’ऑनद वे
महापौर पदाचा पदभार स्वीकारताच शासकीय वाहन आणि सर्व सेवा-सवलती नाकारून त्यागाचा आदर्श निर्माण करणार्‍या महापौर सौ. मायादेवी परदेशी आज खर्‍या अर्थाने धुळे महानगरात ’कर्तव्यशक्ती’ म्हणून ओळखल्या जात आहेत. आजही, त्या कोणतीही आलिशान गाडी न वापरता, भर उन्हात आपले पती आणि ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते महादेव परदेशी यांच्यासोबत दुचाकीवरून (मोटरसायकल) शहराच्या गल्लीबोळात फिरून समस्या जाणून घेत आहेत. जनतेच्या हितासाठी रस्त्यावर उतरून काम करणार्‍या या रणरागिणी नेतृत्वामुळेच आज प्रशासनातील कामचुकार यंत्रणेचे धाबे दणाणले आहेत.
’कचरा गँग’ला सणसणीत चपराक !
केवळ फेसबुक आणि व्हॉट्सपवर रिकाम्या पोस्ट टाकून राजकारण करणार्‍या ’उबाठा’ टोळीला उर्फ ’कचरा गँगला’ सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नांशी काहीही देणे-घेणे उरलेले नाही. विरोधासाठी विरोध करणे हेच त्यांचे एकमेव सूत्र बनले आहे. जनतेच्या सुख-दु:खात कधीही न दिसणारी ही ’टोळी उर्फ गँग’ फक्त सोशल मीडियावर स्वतःची पाठ थोपटून घेते. पण लक्षात ठेवा, धुळेकर जनता सुज्ञ आहे. महापौरांनी आणि प्रशासनाने केलेला हा ’सर्जिकल स्ट्राईक’ तुमच्या ’फोटोबाजी’ च्या राजकारणाला दिलेली चोख चपराक आहे, असा देखील दावा या पत्रकातून भाजपने केला आहे.
महापौर सौ.मायादेवी परदेशी यांची थेट तंबी

धुळेकर जनतेचा पगार खायचा आणि कामाच्या वेळी टाळाटाळ करायची, हा प्रकार आता माझ्या धुळ्यात खपवून घेतला जाणार नाही! हे १६ जणांचे निलंबन तर फक्त एक ’ट्रेलर’ आहे. जर महिनाभरात स्वतःला सुधारले नाही, तर खुर्च्या रिकाम्या करायला तयार राहा; तुम्हाला कायमचा घरचा रस्ता दाखवायला मी मागेपुढे पाहणार नाही. जनतेच्या जीवाशी खेळणार्‍यांना यापुढे महापालिकेत थारा नाही. काम करायचे असेल तरच खुर्चीवर बसा, अन्यथा गाशा गुंडाळा! असा इशाराच महापौर मायादेवी परदेशी यांनी दिला आहे. असेही पत्रकात म्हटले आहे.या कारवाई चे समर्थन सामान्य धुळेकर जनतेने केले आहे.