खंडणीखोरांवर कारवाई करा पोलिस आयुक्तांना इंग्लिश स्कूल्स महासंघाचे निवेदन



= = = = = = = = = = = =
शाळा संरक्षण कायदा करा शासनाकडे मागणी
= = = = = = = = = = = =
छत्रपती संभाजीनगर : सा पोलीस व्हिजन धुळे……छत्रपती संभाजी नगर जिल्हयात प्रामुख्याने छत्रपती संभाजीनगर शहरात काही ठराविक व्यक्ति सामाजीक कार्याच्या नावाखाली वेगवेगळी लेटरहेड वापरून आरटीआय व आरटीई कायद्याची सबब पुढे करून शाळा ,संस्थाचालक, मुख्याध्यापक , महिला कर्मचारी यांना दबावाखाली आणून माणसिक त्रास देणे , शाळेची बदनामी करण्याची धमकी देणे , शाळेत येवून फीस च्या नावाखाली गोंधळ घालून दहशद निर्माण करणे,शाळा बंद करू , शाळेविरुद्ध निदर्शने – उपोषण करून मोर्चा काढू , शाळा बंद करण्याबाबत शिक्षणाधिकारी यांच्यावर दबाब टाकून शासनाकडे तक्रार करू अशा वेगवेगळे तंत्राच्या माध्यमातून धमक्या देवून दहशात निर्माण करून आर्थिक हण्यासापोटी खंडणीची मागणी करीत असून यामधून अनेक वेळा शाळेवर हल्ले झालेले आहे याबाबत यापूर्वीच सर्व संघटनांच्या सामुहिक शिष्टमंडळाने पोलिस आयुक्त , गृहमंत्री तसेच शिक्षण विभाग यांच्याकडे सविस्तर माहिती देवून संबंधितावर कायदेशीर कारवाईची मागणी केलेली आहे . राज्यातील शिक्षक व पदवीधर आमदारांनी सुद्धा विधान परिषदेत अशा व्यक्तिच्या विरोधात कठोर कारवाई करून तात्काळ “शाळा संरक्षण कायदा लागू करण्याची मागणी केलेली आहे
असाचा प्रकार पुन्हा शहरातील एका शाळेत घडल्याने इंग्लिश स्कूल्स महासंघाचे प्रदेश अध्यक्ष डॉ प्रसाद सोनवणे (नाशिक ) प्रदेश उपाध्यक्ष ,प्रल्हाद शिंदे (छत्रपती संभाजीनगर ) प्रदेश सरचिटणीस , हरिष शिंदे (सोलापूर ) प्रदेश सह सरचिटणीस रत्नाकर फाळके (छत्रपती संभाजीनगर ) यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाध्यक्ष भगवान पवार यांच्या नेतृत्वाखाली शुक्रवार 11 एप्रिल रोजी सायंकाळी 5:30 वा शिष्टमंडळाने पोलिस आयुक्त श्री प्रविण पवार यांची भेट घेवून सविस्तर चर्चा करून शाळेचा पालक व संबंध नसलेली तसेच हितचिंतकही नसलेली व्यक्तिंच्या विरोधात तात्काळ कायदेशीर कारवाई करावी व डॉक्टर, पत्रकार प्रमाणेच “शाळा संरक्षण कायदा “ करण्याबाबत शासनास शिफारस करावी अशी मागणी करण्यात आली याप्रसंगी पोलिस आयुक प्रविण पवार यांनी शिष्टमंडळा बरोबर सविस्तर चर्चा करून संस्था चालकांना कायदेशीर मार्गदर्शन केले तसेच गुन्हेगारी प्रवृत्तीचे व खंडणीखोर व्यक्तिंची शिक्षण विभागाकडून माहिती घेवून कायदेशीर कारवाई करण्याचे आश्वासन दिले .
या शिष्टडळात प्रदेश सहसचिव रत्नाकर फाळके , जिल्हाध्यक भगवान पवार सचिव योगेश अंभोरे , अशोक गोरे , डॉ गजानन नालमवार , डॉ विजय वाडकर , पोपट खैरनार , सुयोग खैरनार , विजय गव्हाणे , आदी प्रमुख पदाधिकारी सहभागी होते .

आपले ,
भगवान पवार योगेश अंभोरे
जिल्हाध्यक्ष जिल्हा सचिव
ESM इंग्लिश स्कूल्स महासंघ
छत्रपती संभाजीनगर