कर्म.आ.मा.पाटील वरिष्ठ महाविद्यालयात महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री जयंती साजरी—————-

पिंपळनेर….. प्रतिनिधी सा पोलीस व्हिजन धुळे…
कर्म.आ.मा.पाटील, कला, वाणिज्य व कै विज्ञान वरिष्ठ महाविद्यालयात महात्मा गांधी जयंती व लाल बहादूर शास्त्री जयंती साजरी करण्यात आली.प्रथम महात्मा गांधीजींच्या व लाल बहादूर शास्त्रीजींच्या प्रतिमांचे दीपप्रज्वलन करून श्रीफळ वाढवून उद्घाटन करण्यात आले.*कार्यक्रमास अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य *श्री.के.डी.कदम हे होते.राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी प्रा.एल.जे.गवळी हे प्रमुखवक्ते होते.दुसरे वक्तेसहायक कार्यक्रम* अधिकारी डाॅ.एस.एन तोरवणे हे होते.
आपल्या भाषणात कार्यक्रम अधिकारी प्रा.एल.जे.गवळी म्हणाले की,महात्मा गांधीजींची संपूर्ण दिनचर्या ही स्वच्छतेवर आधारलेली होती.त्यांचे संपूर्ण आयुष्यच स्वच्छतेवर आधारलेले होते.शहरातील,गावातील, परिसरातील साफसफाई केली तर संसर्गजन्य आजाराचा फैलाव रोखता येऊ शकतो.हे गांधीजींनी तत्कालीन लोकांना पटवून दिले.कमी शिकलेल्या लोकांना या कामासाठी तयार केले.वैष्णव मंदिराच्या परिसरातील अस्वच्छता, चंपारण्य येथील अस्वच्छता यासाठीहीमहात्माजींनी अटोकाट प्रयत्न केले.दक्षिण अफ्रिकेत असतांना स्वच्छता व आरोग्य या विषयावर लेखन केले. गांधीजींनी* राजकीय स्वातंत्र्यापेक्षा स्वच्छतेला महत्त्व दिले. आपापल्या नद्यां,घरे,परिसर,गावे स्वच्छ ठेवण्यासाठी आपण स्वतःच जागृत राहायला हवे.प्रथम आंतरीक स्वच्छतेवर गांधीजींचा जोर होता.बाह्य स्वच्छता नंतर करा.स्वच्छता हा आचरणाचा भाग बनायला हवा.असे गांधीजींचे विचार होते.तरूणांनी विविध क्षेत्रात यश मिळवायला हवे.देशातील गरीबी निकाली लागायला हवी,विविध पंथ गुण्या गोविंदाने नांदायला हवेत,एकमेकांच्या मनात सहकार्याची भावना असावी,स्रियांना पुरूषांसारखेच अधिकार असावेत,बाकीच्यांशी सुध्दा आपले नाते शांततेचे-सौजन्यपूर्ण असायला हवे.हे सर्व काम राष्ट्रीय सेवा योजनेचे विद्यार्थी करू शकतात.ही महात्माजींची मनोभूमिका होती.आपण देखील बापुजींचे विचार जयंतीच्या निमित्ताने आचरणात आणावेत.” असे प्रतिपादन केले.दुसरे वक्ते डाॅ.तोरवणे यांनी गांधीजींच्या स्वच्छते विषयीचीतळमळीचा* उहापोह करत,आजच्या काळातही गांधीजींचे आर्थिक विचार किती मौलिक होते.हे सांगितले.तसेच लाल बहादूर शास्त्री यांच्या निस्पृह व निस्वार्थी,नैतिक मुल्यांवर आधारीत राजकारणावर प्रकाश टाकला.*
अध्यक्षीय मनोगतात प्राचार्य श्री.के.डी.कदम यांनी या “लाल बहादूर शास्त्री व महात्मा गांधीजीं या दोन थोर विभूतींवर लाखोच्या वर अशी कितीतरी पुस्तके लिहिलीत.कितीतरी चित्रपट व कथा कादंब-या निघाल्या.राजकारणातली नैतिकता काय असते.आज आपण कसे वागत आहोत,याचे आत्मपरीक्षण करायला हवे.लाल बहादूर शास्त्री व महात्मा गांधी यांच्यासारख्या नेत्यांची आज देशाला गरज आहे”.असे मत प्राचार्य कदम सर यांनी व्यक्त केले.यावेळी कु.राजलक्ष्मी शिरसाठ, कु.सलोणी राऊत,कु.क्षमा पांडे,यांनी आपले मनोगत व्यक्त केले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचलन कु.चेतना निकुम हीने केले.सदर कार्यक्रमास डाॅ.बी.सी.मोरे,प्रा.एम.व्ही बळसाणे,प्रा.के.आर राऊत,डाॅ.संजय खोडके,प्रा.सी.एन घरटे प्रा.के.एन.वसावे, प्रा.डॉ.बी.जाधव, डाॅ.एस.एस.मस्के, डाॅ.ए.जी.खरात,प्रा.हितेश वानखेडे,प्रा.पवन निकम,प्रा.प्रथमेश सुर्यवंशी, प्रा.विशाल सोनवणे, प्रा.वाघ,श्री.के एन कुवर सर,श्री.मनोज भामरे,श्री.मनोहर बोरसे, श्री.संदिप अमृतकर,श्री.सुनील गुरव, श्री.भूपाल शिंदे श्री.कैलास जिरे,श्री.ताराचंद चौरे,श्री रविंद्र मिस्तरी,श्री. नरेंद्र ढोले,श्री.बेनुस्कर, श्री.ठाकरे,श्रीमती ठाकुर मॅडम हे सर्व आवर्जून उपस्थित होते.कार्यक्रम यशस्वीतेसाठी कु.ढोले रोशणी,कु अर्पिता व कु.क्षमा पांडे यांनी परिश्रम घेतले.कार्यक्रमाचे आभार कु.डिंपल गांगुर्डे हीने मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *