साक्री शहरात एका रात्रीतून चोरट्यांनी तीन दुकाने फोडली, साक्री शहरात पोलीस आहेत की नाही??? असा खडा सवाल थेट व्यापाऱ्यांचा!. धुळे …. धुळे जिल्ह्यातील साक्री तालुका हे पुरोगामी विचारांचा तालुका म्हणून ओळखला जातो . या तालुक्यात पांजरा कान साखर कारखाना जेव्हा सुरू होता. किंवा तेथील कामगार असो की तेथील कर्मचारी साक्री शहरात संपूर्ण बाजार करण्यासाठी येत होता. प्रचंड पैशांची उलाढाल या साखळी शहरातून होत होती. परंतु कालांतराने मस्त प्रशासनामुळे हा कारखाना बंद पडला. आणि साक्री शहराची उलाढाल कमी झाली. परंतु साक्री शहराच्या अवतीभवती असलेले खेडेगाव त्यातील लोकसंख्या वाढली शेती चांगल्या पद्धतीने शेतकऱ्यांनी डेव्हलपमेंट केली. त्यातून आता साक्री शहरातील संपूर्ण व्यापारी पुन्हा चांगल्या पद्धतीने या बाजारपेठेतील उत्पन्न मिळू लागले. साक्री शहरात वाढता कॉलनी परिसर तसेच वाढते व्यवसाय यातून साक्री शहराची चांगली ओळख आता झाली आहे. परंतु या साक्री शहरात व्यापारी व त्यांची व्यावसायिक दुकाने मात्र सुरक्षित नाहीत अशी भयानक परिस्थिती सध्या झालेली आहे. साक्री शहरातील नामांकित व्यापारी श्री साहेबचंद मोतीलाल जैन यांचे साक्री शहरात पेट्रोल पंपाजवळ असलेले काकाजी प्रोव्हिजन अँड जनरल स्टोअर्स हे भरभराटीने चालणारे दुकान आहे. याच दुकानाला तब्बल एक दोन वर्षात चौथ्यांदा दुकान फोडण्याची घटना घडली आहे. चोरट्यांनी चौकार षटकार मारण्याचा विचार केला आहे की काय?? कि साक्री शहर पोलिसांची निष्क्रियतेची ओळख धुळे जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनाच थेट या चोरट्यांना करून द्यायची आहे की काय? असा सवाल संतप्त व्यापाऱ्यांकडून होत आहे. काकाजी प्रोविजन दुकान चोरट्यांनी शटर उचकवून तसेच वरील पत्रा वाकवून दुकानात प्रवेश करून गल्ल्यातील साधारण अंदाजे दहा ते बारा हजाराची रोकड व किराणामाल लंपास केला आहे.यावरुन साक्री शहरात पोलीस आहेत की नाही? असतील तर मग त्यांचा खाकी वर्दीतला धाक चोट्यांना राहिला का नाही? हे एक कोडे न सुटणारे आहे. चोरट्यांची मजल साक्री शहरातच का वाढत आहे? वास्तविक आता खऱ्या अर्थाने छडा लावण्याचा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या कर्तब गारीवर जातो. साक्री शहरातील पोलीस स्टेशन मधून काही पोलिसांच्या बदल्या झाल्या तरी देखील त्यांच्या इशाऱ्यावर येथे हे पोलीस स्टेशन चालते का?? अशीच चर्चा शहरात दपक्या आवाजात बोलली जात आहे. साक्री शहर पोलीस स्टेशन मध्ये डॅशिंग अधिकाऱ्यांची नेमणूक का होत नाही? जर झालीच तर अशा चांगल्या अधिकाऱ्याला टिकू दिले जात का नाही? असे अनेक प्रश्न संतप्त व्यापाऱ्यांकडून होत आहे. सचिन सोनवणे यांचे नर्मदा कृषी सेवा केंद्र यावर देखील चोरट्यांनी मोर्चा वळवून तेही दुकान फोडले आहे. तेथील काही मुद्देमाल लंपास केला आहे. याच दुकानाला बाजूला लागून असलेले हरीश हार्डवेअर मशनरी चे दुकान देखील चोरट्यांनी फोडले आहे. वास्तविक या सर्व दुकानांना सीसीटीव्ही कॅमेरे बसवलेले आहेत. चोरट्यांनी ते सीसीटीव्ही कॅमेरे फोडताना तेथील दृश्य टिपले गेलेले आहे. यातून साक्री शहरांमध्ये पोलिसांचा चोरट्यांना धाकच उरलेला नाही हे यातून दिसून येत आहे. वास्तविक हाकेच्या अंतरावर शहर पोलीस स्टेशन आहे. धुळे सुरत रस्त्यावर ही दुकाने आहेत. 24 तास रहदारी सुरू असते. तरी चोरट्यांची मजल होते कशी?? जेव्हा जेव्हा चोऱ्या झाल्या तेव्हा तेव्हा व्यापाऱ्यांनी तक्रारी केलेल्या आहेत. मात्र चोरटे सापडता सापडेनात. मग हे चोरटे जातात नेमके कुठे?? पोलिसांना यांचा सुगावा लागत कसा नाही!! साक्री शहरातील चोट्यांसह,दोन नंबरचे धंदे बंद जर कुठे सुरू असतील तर त्यांचा शोध पोलिसांनी घेऊन ती कायमची बंद केली पाहिजेत अशी व्यापारांची पुर्वी पासुन मागणी आहे. या चोरट्यांच्या धाकामुळे व्यापारी पूर्ण धास्तावलेले आहेत. त्यांनी दिवसभर व्यवसाय करायचा कसा? आणि रात्री आपली दुकाने सांभाळायची कशी? विश्रांती घ्यायची केव्हा!! असा संभ्रम त्यांच्या मनात आलेला आहे. साक्री शहरात एकाच रात्री तीन व्यापारी दुकाने फोडण्याच्या जो प्रकार आहे तो पोलिसांच्या कामगिरीवर प्रश्नचिन्ह आहे. आता कठोर पावले उचलली पाहिजेत आणि धुळे जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी स्वतः लक्ष घालून या चोरट्यांचा बंदोबस्त कायमस्वरूपी करण्याची मागणी व्यापारी वर्गाकडून होत आहे. काकाची प्रोव्हिजन च्या साक्री शहरात एकूण सहा ते सात दुकाने आहेत. वास्तविक या सर्व भावांचे आपल्या ग्राहकांची संबंध ठरवण्याचे असल्याने सर्वांचे व्यवसायात तेजीत चालतात. कुणाच्याही भानगडीत हे पडणारे व्यापारी नाही. सर्वांशी सलोखा कायम ठेवून उत्तम प्रकारे व्यवसाय करणारी एक जैन कुटुंब नामांकित आहे. परंतु त्यांच्यावरच वारंवार चोरट्यांनी हैदोस माजवून दुकाने फोडून प्रचंड नुकसान करायचे यावर हे कुटुंब भयभीत झाले आहे. साखरी शहर पोलीस स्टेशनचे पीआय खलाणे यांनी घटनास्थळी भेट दिली असून प्रत्यक्ष पाहणी केली आहे. गुन्हा नोंदवण्याचे काम सुरू असल्यामुळे नेमका किती ऐवज गेला आहे त्याची सविस्तर माहिती मिळू शकली नाही. पोलीस प्रशासनाने यावर तात्काळ चोरट्यांचा माग शोधून लवकरात लवकर जेरबंद करण्यात यशस्वी व्हावे असे आवाहन जनतेकडून केले जात आहे.बातमी पत्र वाचा सा पोलीस व्हिजन धुळे….. मुख्य संपादक प्रल्हाद साळुंके

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *