प्रताप कापड मिल आणि मिल परिसराचे आद्य जनक श्रीमंत प्रताप शेटजी अग्रवाल यांची जयंती निमित्त महापौर सौ.प्रतिभाताई चौधरी यांच्या प्रमुख उपस्थितीत अभिवादन.

वृत्त प्रतिनिधी- सा पोलीस व्हिजन धुळे
धुळे शहरातील प्रख्यात प्रताप कापड मिलचे संस्थापक आणि मालक श्रीमंत प्रताप शेटजी अग्रवाल यांची जयंती आणि पुण्यतिथी निमित्त मिल मधील दगडी चाळीतील तरुणांच्या वतीने दरवर्षी अभिवादनचा कार्यक्रम आयोजित करण्यात येत असतो. दि.११ डिसेंबर २०२३ रोजी श्रीमंत प्रताप शेटजी यांच्या जयंती निमीत्त धुळे महापालीकेचे कर्तव्यदक्ष महापौर सौ.प्रतिभाताई चौधरी, माजी महापौर श्रीमान चंद्रकांत सोनार, नगरसेविका सौ.सुरेखाताई उगले, प्रताप मिलचे सहाय्यक प्रबंधक श्री.आझाद कुमार सिंग आणि मान्यवरांच्या हस्ते श्रीमंत प्रताप शेटजी अग्रवाल यांच्या संगमरवरी पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात येवून अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी प्रताप कुमार मित्र मंडळाचे सर्व पदाधिकारी श्री.चेतन सोनार,धनंजय गाळणकर,रोहन सपकाळ,दिलीप पाटील,शामभाऊ यादव,आशिष वाघ,सतीश चौधरी,मयूर काळे,अनिकेत शेगावकर,कपिल गायकवाड,निखिल गायकवाड,रोहन भाऊ सपकाळ,आशिष भाऊ वाघ, सतीश भाऊ चौधरी,मयूर भाऊ काळे,अनिकेत शेगावकर,कपिल गायकवाड, निखिल गायकवाड,मनोज भाऊ गिरी,तुषार जाधव,योगेश पवार,लखन क्षिरसागर,पंकज करपे,अल्पेश पाटील,प्रेम जाधव,शुभम पाटील आदी उपस्थित होते.