नंदुरबार… बातमी पत्र..सा.पोलीस व्हिजन धुळे…अभय युवा कल्याण केंद्र धुळे संचलित माध्यमिक विद्यालय सुंदरदे, तालुका जिल्हा नंदुरबार येथील शाळेच्या विद्यार्थ्यांना मोफत पाणी पिण्याची सोय व्हावी याकरिता नंदुरबार जिल्हा परिषद सदस्या ताईसाहेब राजश्री गावित, यांच्यातर्फे मोफत बोरवेल व हँड पंप बसवण्याचे काम सुरू झाले. आज सायंकाळी सात वाजता, शाळेच्या प्रांगणात बोरवेल करण्याची यंत्रणा आली, यावेळी गेल्या तीन दिवसांपूर्वी पाणी भाकण्याचे काम माजी जिल्हा परिषद शाळा केंद्रप्रमुख श्री दरबार सिंग गिरासे यांच्या हाताने नारळाच्या साह्याने पाणी नेमके कुठे लागणार याची तपासणी करून घेण्यात आली होती. त्या दिलेल्या पॉईंटवर आज बोरवेल करण्याचे काम सुरू करण्यापूर्वी सुंदरदे गावातील ग्रामस्थ आणि ग्रामपंचायत सुंदरदे येथील सरपंच माननीय सुनीलभाऊ पाडवी, यांच्या हस्ते पूजा विधी करून नारळ फोडण्यात आले, यावेळी विद्यालयाचे ज्येष्ठ शिक्षक श्री पुरुषोत्तम मराठे सर, श्री प्रल्हाद साळुंखे सर, श्री नंदकिशोर पोटे सर, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांमध्ये श्री कालिदास पाडवी, श्री भिकुबाई बंजारा, संजू भाई बंजारा, हे उपस्थित होते. यावेळी सुंदरदे ग्रामपंचायत सरपंच श्री सुनीलभाऊ पाडवी, माजीसरपंच , कालूसिंग नाईक,शक्तीभाउ, अनिलभाऊ, कालिदास पाडवी, व इतर पालक देखील उपस्थित होते. अभय युवा कल्याण केंद्र धुळे चे संस्थापिका अध्यक्षा,तथा माजी शिक्षण व आरोग्य उपमंत्री महाराष्ट्र राज्य, माननीय ताईसाहेब डॉक्टर शालिनीताई बोरसे, संस्थेचे सेक्रेटरी माननीय डॉक्टर दादासाहेब अभयजी बोरसे, व संपूर्ण अभय युवा कल्याण केंद्र धुळे कार्यकारी मंडळ, तसेच महिला महाविद्यालयाचे ओ एस.तात्यासो.बी.एम.पाटील. विद्यालयाचे मुख्याध्यापक बापूसाहेब के आर सूर्यवंशी यांच्या वतीने आभार मानण्यात आले.

