
धुळे…दि..१६.११.२५. धुळे महानगरीला पूर्वी नगरपालिका होती. तेव्हा जी परिस्थिती होती ती परिस्थिती पुढे महानगरपालिका झाल्यानंतर शहराचा विकास खूप बदलेल अशी लोकांची धारणा होती. अनेकांनी धुळे नगरपालिका महानगरपालिका व्हावी यासाठी आंदोलने देखील केली होती. परंतु कालांतराने वस्त्या वाढल्या लोकसंख्या वाढली त्यामुळे महानगरपालिका धुळे ही अस्तित्वात आली तिला एक दिमागदार सुंदर अशी सर्व सुविधायुक्त भव्य दिव्य अशी इमारत मिळाली. महाराष्ट्रात नाही अशी महानगरपालिकेची नवीन इमारत या धुळे शहराला लाभली. मात्र या महानगरपालिकेच्या कार्यालयात बसणारे आरोग्य विभागातील कर्मचारी असो की इतर कर्मचारी असो त्यांचे जनतेच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष होत असल्याचे प्रत्यक्षात जाणवत आहे. सर्वात भयानक प्रश्न म्हणजे कॉलनी परिसरांमध्ये कचरा संकलन करण्यासाठी येणाऱ्या घंटागाड्यांचा झालेला आहे. या घंटागाड्यांना कचरा संकलन करण्यासाठी कमीत कमी एक दिवसाआड तरी या घंटागाड्या कॉलनी परिसरातून यायला पाहिजेत म्हणजे नागरिक आपल्या घरातील ओला व सुका कचरा या गाडीत सहज टाकून देतात त्यामुळे शहराचा स्वच्छतेचा प्रश्न आपोआप सुटतो. आरोग्य व्यवस्था चांगली राहते. परंतु गेल्या पाच-सहा महिन्यांपासून या घंटागाड्यांच्या ठेकेदाराच्या मनमानी कारभारामुळे संपूर्ण व्यवस्था बिघडली आहे. कचरा संकलन करणाऱ्या गाड्या रामनगर पवन नगर रामचंद्र नगर स्वामीनारायण सोसायटी शिव कॉलनी थेट अभय कॉलेज पर्यंत असलेला जो परिसर आहे या परिसरात या गाड्या आठ-आठ दिवस फिरकतच नाहीत. अनेकदा नागरिक या गाड्या आल्यानंतर त्यांच्याकडे तक्रार करतात परंतु ते गाडीवाले आम्हाला काही माहीत नाही असे सांगून वेळ निभावून नेतात यांच्यावर जीपीएस सेवा लावली पाहिजे म्हणजे गाडी कुठून कुठपर्यंत फिरत आहे यांचे लोकेशन थेट आयुक्तांना मिळेल तरच यांची व्यवस्था सुधारणार आहे या परिसरात निवडून आलेले जे नगरसेवक असतील त्यांनी देखील यांच्यावर पाळत ठेवली पाहिजे. या गाड्या का येत नाहीत याची तक्रार त्यांनी थेट आयुक्तांना केली पाहिजे हे नगरसेवकांचे वास्तविक काम आहे परंतु जनतेला वेठीस कसे धरता येईल हा प्रश्न अनुत्तीर्ण आहे. या परिसरातील सामाजिक कार्यकर्ते मनोज भाऊ कोळेकर हे अनेक प्रश्न सोडून टाकतात असा या परिसरातील नागरिकांचा अनुभव आहे म्हणून अनेक जण त्यांच्याकडे तक्रार करतात ते ती तक्रार सहज सोडवतात परंतु सत्ताधारी मात्र याकडे पाठ फिरवतात हा अनुभव या परिसरातील नागरिकांना प्रत्यक्ष आता जाणवत आहे. कचरा संकलन करण्याचा हा जो प्रश्न आहे तो सार्वजनिक आहे तो तातडीने सुटावा असे आयुक्तांना आवाहन करण्यात येत आहे.**बातमी पत्र वाचा सा पोलिस व्हिजन धुळे
