सरकारी कर्मचार्यांनी दिं ११ नोव्हेंबर रोजी संतप्त निदर्शने नोंदवली. (धुळे) जुनी पेन्शन योजना लागू करावी यासह प्रलंबित मागण्या पुर्तीसाठी सरकारी निमसरकारी कर्मचारी व शिक्षक -शिक्षकेतर कर्मचारी संघटना समन्वय समिती व राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना महाराष्ट्र यांच्या १८ लाख कर्मचारी शिक्षकांचा दिं ११ नोव्हेंबर रोजी राज्यव्यापी निदर्शने नोंदविण्यात आली. राज्यात बळीराजा वर अस्मानी संकट कोसळल्याे त्या अनुषंगाने शेतकऱ्यांना आधार देण्यासाठी सरकारी कर्मचार्यांचे एक दिवसाचे वेतन ” मुख्यमंत्री सहाय्यता फंडात” कर्तव्य भावनेने देण्यात आले आहे.. सुधारीत राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजनेची अंमलबजावणीसाठी आवश्यक मार्गदर्शक सूचना प्रसिद्ध करण्यासाठी व जुनी पेन्शन योजना जशीच्या तशी लागु करणे..पेन्शन विक्री 15 ऐवजी 11 वर्षे करणे… पी एफ आर डी ए कायदा रद्द करणे… वय वर्ष 60 65 आणि 75 नंतर अनुक्रमे पाच दहा आणि पंधरा टक्के वाढ निवृत्तीवेतनधारकांना लागू करणे… राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना रेल्वे सवलत लागू करणे… कंत्राटी कर्मचाऱ्यांना नियमित सेवेत सामावून घेणे… आणि आठवा वेतन आयोग केंद्राप्रमाणे सत्वर लागू करणे व त्या अनुषंगाने अर्थसंकल्पात तरतुद करणे, इतर प्रलंबित मागण्यांसाठी दिं ११ नोव्हेंबर रोजी समन्वय समितीच्या व राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेच्या सर्व कर्मचारी व शिक्षक -शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने क्युमाईन क्लब,जेल रोड, धुळे येथे दुपारी १:०० वाजता भोजन काळात निदर्शने नोंदविण्यासाठी उपस्थित होते कर्मचाऱ्यांनी सरकार विरोधात संतप्त घोषणाबाजी करीत लक्ष वेधले श्री राजेन्द्र माळी श्री अविनाश मोरे श्री सुधीर पोतदार श्री दिनेश सैंदाणे, श्री डी एच देसले, श्री गिरीश पाटील, श्री प्रवीण राजपूत, श्री मोहन सानप, श्री भुषण पाटील श्री सुधीर खैरनार ,श्री नरेंद्र सोनार, श्री कैलास पवार, श्री प्रशांत धनगर, श्री नागनाथ वासते,श्री एल आर राव, श्री पोपट चौधरी श्री सुनील दावने श्री राजेन्द्र चौरे, श्री दिपक सोनवणे, श्री साहेबराव पाटील श्री शरद राव आदींनी या प्रसंगी मनोगत व्यक्त केले
वृत्त प्रतिनिधी- धनंजय गाळणकरसध्या राज्यात सांप्रदायिक, सामाजिक सलोखा आणि कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती गंभीर बनलेली आहे. नाशिक येथील पंचवटी काळाराम मंदिराच्या…