
शिर्डी…. महाराष्ट्रातील शिर्डी हे सत्य साईबाबा यांचे श्रद्धास्थान असलेले मोठे देवस्थान आहे. या ठिकाणी संपूर्ण भारतातील विविध राज्यातून अनेक साईभक्त शिर्डी येथे साईंचे दर्शनासाठी प्रचंड गर्दीने येत असतात. यात ग्रामीण भागातील गोरगरीब जनतेचा व शेतकऱ्यांचा या श्री साईंच्या मंदिरावर दर्शनासाठी जाण्याचा जास्त कल असतो. तसेच येथे साई ट्रस्टच्या वतीने मोफत व काही आरोग्य चाचण्या या स्वस्त दराने होत असल्याने या ठिकाणी आपल्या आरोग्याच्या विविध चाचण्या करण्यासाठी देखील विविध राज्यातील पेशंट येत असतात. आपला उपचार स्वस्तात आणि कमी पैशांमध्ये या ठिकाणी होऊन जातो यासाठी गोरगरिबांसाठी येथे या ट्रस्टच्या वतीने खूप चांगली व्यवस्था करण्यात आलेली आहे. शिर्डी हे अहिल्याबाई नगर तालुक्यातील एक आध्यात्मिक मोठा ट्रस्ट म्हणून ओळखला जातो. या ठिकाणी येणाऱ्या श्रद्धाळूमुळे येथील एसटी महामंडळाचे बस स्थानक प्रचंड प्रवाशांच्या गर्दीमुळे गजबजलेले असते. आणि याच गर्दीचा फायदा घेऊन या ठिकाणी काही महिलांच्या टोळ्या छोट्या मोठ्या चोऱ्यांसाठी त्यांचे काम करत असतात. यातून ते प्रवाशांच्या खिशातील मोबाईल तसेच पाकिटे मारण्याचे काम करत असतात. अशाच प्रकार ची चोरी साक्री तालुक्यातील शेवाळी दा. या गावचे शेतकरी श्री सुरेश आनंदा साळुंखे यांच्या खिशातील अँड्रॉइड मोबाईल या टोळीतील एका महिलेने सहज चोरी केला. तो मोबाईल तिने रात्री अंधाराचा फायदा घेऊन एसटीच्या मागील बाजूला लपवून दिला. आपल्या खिशात मोबाईल होता आणि तो गायब झालेला आहे असा जेव्हा भास शेतकरी सुरेश आनंदा साळुंखे यांना झाला त्यावेळी त्यांनी इकडे तिकडे शोधा शोध सुरू केली परंतु मोबाईल मिळून आला नाही अखेर त्यांनी शिर्डी येथील एसटी महामंडळाच्या बस स्थानकावर चौकशी कक्षाला भेट देऊन तेथे त्यांची कैफियत मांडली आणि त्या ठिकाणी ड्युटीवर असलेले कर्तव्यदक्ष वाहतूक नियंत्रक श्री सुनील मुजमुळे यांनी तात्काळ तेथील सीसीटीव्ही यांची पाहणी करून त्यांना शंकास्पद आढळलेली महिलेचा त्यांनी शोध घेण्याचा प्रयत्न केला. तेथील ड्युटीवर असलेले पोलीस कर्मचारी यांना देखील त्यांनी बोलावून घेतले. आणि तेथील संशयित महिलेला त्यांनी प्रथम ताब्यात घेतले. परंतु ती कबलत नव्हती यावेळी पोलीस कर्मचारी व वाहतूक नियंत्रक यांनी त्यांच्या मोबाईलवरून हरलेल्या मोबाईल नंबर वर फोन वर केलेत कुठे रिंग वाजते आहे का याचा शोध घेतला तर तो मोबाईल एसटीच्या खाली लपवलेला आढळून आला. पोलिसांनी त्यांची खाकी दाखवल्यावर थोडी दमबाजी केल्यावर सदर महिलेने मोबाईल चोरीचा प्रकार मीच केला अशी कबुली दिली परंतु आपला मोबाईल मिळाला मला काहीही यांची तक्रार करायची नाही असे शेवाळी येथील शेतकरी यांनी वाहतूक नियंत्रक व पोलिसांना सांगितले त्यावरून वाद मिटला. आणि पोलिसांच्या समक्ष वाहतूक नियंत्रक श्री सुनील मुजमुळे यांनी तो मोबाईल मूळ मोबाईल मालक श्री सुरेश आनंदा साळुंखे या शेतकऱ्यांच्या हवाली केला. श्री सुरेश आनंदा साळुंखे हे शिर्डी येथे त्यांच्या सासऱ्यांना आरोग्य विषयी तक्रार असल्याने एम आर आय करण्यासाठी घेऊन गेले होते वैद्यकीय तपासण्या झाल्यानंतर ते रात्री बऱ्याच उशिराने शिर्डी येथील एसटी महामंडळाच्या बस स्टैंड वर आले होते आपल्या गावी परत जावे यासाठी ते या शिर्डी बस स्थानकावर थांबलेले होते आणि तिथूनच त्यांचा मोबाईल चोरट्यांनी लांबवला होता. हरवलेला मोबाईल परत मिळाल्याने त्यांनी रात्री बारा वाजता तेथून तात्काळ पोलीस विजेच्या मुख्य संपादकांना फोन केला आणि घडलेला प्रसंग सांगितला त्यावेळी शिर्डी बस स्थानकाचे वाहतूक नियंत्रक यांनी विनंती केली की संपादक साहेब एवढी बातमी आमच्या कामगिरीची टाकून द्यावी त्यांचे संपादक या नात्याने मी कौतुकही केले व त्यांना शुभेच्छा देखील दिल्या मोबाईल मिळवून देण्यासाठी शिर्डी वाहतूक नियंत्रक सुनील मुजमुळे, तसेच सुरक्षारक्षक महेश लबडे तसेच चंद्रकांत कापसे व पोलीस प्रशासन यांच्या सहकार्यातून हा गरीब शेतकरी असलेले सुरेश आनंदा साळुंखे यांचा हा मोबाईल मिळून आलेला आहे या सर्व टीमचे सा पोलिस व्हिजन धुळे वतीने हार्दिक अभिनंदन व शुभेच्छा* बातमी पत्र वाचा सा पोलिस व्हिजन धुळे मुख्य संपादक प्रल्हाद साळुंके…9881404361
