ग्रामीण प्राथमिक आरोग्य केंद्र बोरकुंड द्वारा रानमळा गावातील शालेय विद्यार्थ्यांना नियमित लसीकरण मोहीम राबवण्यात आली. धुळे…. इयत्ता पाचवी व दहावी म्हणजेच १० ते १६ वर्ष वयोगटातील शालेय विद्यार्थ्यांना टी टी चे नियमित लसीकरण मोहीम ग्रामीण प्राथमिक आरोग्य केंद्र बोरकुंड यांच्या नियोजित कार्यक्रम अंतर्गत आज धुळे तालुक्यातील रानमळा गावातील प्राथमिक शाळा व अभय युवा कल्याण केंद्र धुळे संचलित एकनाथ महाराज हायस्कूल रानमळा ता जि धुळे येथील शाळेत हा लसीकरण चा आरोग्य विभाग वतीने मोहीम राबवण्यात आली.सदर मोहीम बोरकुंड आरोग्य केंद्र चे प्रमुख वैद्यकीय अधिकारी मा डॉ रमेश पाडवी यांच्या प्रमुख मार्गदर्शनातून डॉक्टर भूषण भदाणे वैद्यकीय अधिकारी, कोमल भिसे आरोग्य सहाय्यक, विशाल पाटील आरोग्य सहाय्यक, वैशाली पवार आरोग्य सहायिका, सपना दगडू बाविस्कर आरोग्य सेविका, एस एन बहादुर्गे आरोग्य सेवक, रोहिनी खर्चे आशा स्वयंसेविका, आशा बैसाने आशा स्वयंसेविका, यांनी सर्व विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष शाळेत येऊन लसीकरण केले यावेळी विद्यालयाचे मुख्याध्यापक बापूसाहेब किरण पाटील यांच्या मार्गदर्शनातील विद्यालयाचे ज्येष्ठ शिक्षक प्रल्हाद साळुंखे, यांनी आरोग्य अधिकाऱ्यांचे स्वागत केले. यावेळी विद्यालयाचे उपशिक्षक श्री एस आर सूर्यवंशी, श्रीमती वंदना पाटील, श्री विकी पवार, श्री पावरा सर, श्री चंद्रकांत भदाणे सर, सर्व शिक्षक शिक्षण कर्मचारी उपस्थित होते. विद्यार्थ्यांना टी टी चे लसीकरण करून आरोग्य अधिकाऱ्यांनी त्यांना या लसीकरणाबाबत सविस्तर माहिती व उपयोग सांगितला त्यानंतर रात्री जेवणानंतर एक गोळी देखील घेण्यासाठी दिली गेली. विद्यार्थ्यांना या लसीकरणाचा आपल्या आरोग्याची निगडित नक्कीच फायदा होतो असे यावेळी आरोग्य अधिकाऱ्यांनी भाषण करताना सांगितले. या लसीकरणात शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी प्रत्यक्ष भाग घेऊन त्यांनी देखील लसीकरण करून घेतले. विद्यालयाच्या वतीने आरोग्य अधिकाऱ्यांचे आभार श्री एस आर सूर्यवंशी यांनी मानले.