
*धुळे…. धुळे महानगरीला सामान्य जनतेने एकहाती सत्ता भाजपच्या हाती दिली आहे त्याचे कारण म्हणे भाजपा सत्तेवर आले तर धुळे महानगरीचा विकास झपाट्याने होईल!!! सामान्य भोळी भाबडी जनता आपले धुळे चांगले व्हावे या उदात्त चांगल्या हेतूने पुढचा विचार करुन निर्णय घेत असतो पण प्रत्येक वेळी त्यांचे स्वप्न हे भंगलेलेच दिसुन येत आहे.धुळे शहरातील रामचंद्र नगर ते पवन नगर मुख्य रस्ता हा 100 फुटी आहे परंतु या रस्त्यावर सध्या मुख्य गटारीचे काम देखील सुरू असल्याने हा रस्ता पूर्ण खराब झालेला आहे. त्यातच या रस्त्यावर मुख्य रस्ता असल्याने वाहतूक ही 24 तास सुरू असते. बाहेरून येणारे नासिक जळगाव गुजरात कडील पाहुणे याच रस्त्याने येत असतात. त्यांना धुळ्यातील हा मुख्य रस्त्यावरील कचरा पाहून नेमके आपण धुळ्यातच आलो आहोत की धुळे महानगरपालिकेच्या कचरा डम्पिंग डेपोवर?? हा प्रश्न पडतो आहे. यातून धुळ्याची आन-बान शान ही घालवली जात आहे. वास्तविक हा प्रभाग क्रमांक 11 मधील भाग येतो आणि या भागातील चारही नगरसेवक भाजपाने दिल्याने त्यांना जनतेने निवडून दिलेले आहे. परंतु या परिसरात हे चारही नगरसेवक राहताना त्यांना कुणालाही हा कचरा दिसू नये का??? हा मोठा प्रश्न सामान्य नागरिकांमध्ये पडलेला आहे. बर कचरा यांना दिसलाच असेल तर यांनी आरोग्य विभागाकडे तक्रार का केली नाही?? आयुक्तांकडे याची तक्रार त्यांनी करणे गरजेचे होते. पण तसे होताना दिसत नाही. अनेकांना भावी नगरसेवक व्हायची हौस आहे. त्यांचे प्रयत्न भरपूर या प्रभागासाठी सुरू आहेत. पण त्यांना देखील हा कचरा दिसू नये?? म्हणजे काय?? जनता आता पुन्हा फसणार नाही जनतेला काम होणे आवश्यक आहेत रस्त्याची मुख्य कामे जरी काही प्रमाणात चांगली झाली असली तरी मुख्य रस्ता हा गेल्या दोन वर्षातच खराब झालेला आहे. यातून प्रचंड भ्रष्टाचार झालेला दिसून येतो. अनेक वस्त्यांमध्ये अजून गटारी नाहीत कॉलनीतील रहिवासी नियमित घरपट्टी पानपट्टी भरून देखील त्यांना या सुविधा मिळत नाहीत. कॉलनीतील रस्ते साफसफाई करण्यासाठी सफाई कामगार महानगरपालिकेकडून येत नाहीत. आपापल्या घरासमोरील रस्ता हा प्रत्येक घरमालक व त्यांच्या घरातील व्यक्ती होत झाडून स्वच्छता ठेवत असतात. पण बाहेरून आलेल्या पाहुण्यांना असे वाटते की धुळे महानगरपालिकेचे काम अतिशय सुंदर व चोख आहे. परंतु हा संपूर्ण पोकळ वासा आहे. जनतेचा अंत पाहू नका. त्यांच्या जीवाशी व त्यांच्या आरोग्याशी खेळ कोणीही करू नका? हे एक पाप आहे त्या पापापासून मुक्त होण्यासाठी खरी समाजसेवा जर आपणास करायची असेल तर प्रभागातील सुधारणा होणे गरजेचे आहे. त्याकडे लक्ष देण्याचे देखील आपले कर्तव्य आहे. तात्काळ या कचरा टाकणाऱ्यांवर देखील लक्ष असणे गरजेचे आहे आणि असा कचरा टाकणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई देखील झाली पाहिजे. कचरा संकलन करणाऱ्या गाड्या या प्रभागात वेळोवेळी येत देखील नाही. त्यांच्या कचरा संकलन करणाऱ्या ठेकेदाराला देखील तंबी दिली गेली पाहिजे. स्वच्छता ही आरोग्याला चांगली असते. पण धुळे महानगरपालिकेचा कारभार म्हणजे भोंगळ कारभार असल्याचा प्रकार सुरू आहे. याकडे तात्काळ आयुक्तांनी व या प्रभागातील नगरसेवकांनी लक्ष देणे गरजेचे आहे. असे सामान्य नागरिकांचे म्हणणे आहे. बातमी पत्र वाचा सा पोलिस व्हिजन धुळे


