नंदुरबार येथे शिक्षक क्षमतावृध्दी प्रशिक्षण २.० सुरू. नंदुरबार … प्रतिनिधी… महाराष्ट्र शासनाच्या शिक्षण विभागाकडून संदर्भ दिनांक जावक क्रमांक पंचायत समिती नंदुरबार शिक्षण प्रशिक्षण /1275 /२०२५ अन्वये नंदुरबार जिल्हा गटशिक्षणाधिकारी यांच्या स्वाक्षरीने इयत्ता सहावी ते आठवी साठी केंद्र निहाय प्राथमिक व खाजगी शासन मान्यता प्राप्त माध्यमिक शाळा, आश्रम शाळा येथील शिक्षकांना येथील शिक्षकांना सदर प्रशिक्षणाला हजर राहण्याचे आदेश आहेत. त्यानुसार सुंदरदे,भालेर, व इतर केंद्र गट मधील शिक्षकांचे हे प्रशिक्षण दिनांक 11 फेब्रुवारी 2025 ते दिनांक.15/ फेब्रुवारी/2025 असे एकूण पाच दिवसाचे प्रशिक्षण सुरू राहणार आहे. इयत्ता बारावी च्या बोर्ड परीक्षा सुरू असल्याने या प्रशिक्षणास शहराबाहेर चांगल्या प्रायव्हेट स्कूल मध्ये हे प्रशिक्षण आयोजित केल्याचे संबंधित प्रशासनाने सांगितले.सध्या हे प्रशिक्षण कृष्णा इंठरनँशनल इंग्लिश मिडीयम स्कूल पातोंडा ता.जि.नंदुरबार येथे सुरू असुन या केंद्रात साधारण इयत्ता सहावी ते आठवी पर्यंत अध्यापन करणारे शिक्षक शिक्षिका हे प्रशिक्षण लाभ घेत आहेत.सदर प्रशिक्षण माध्यमिक शिक्षण अधिकारी,श्री प्रवीण अहिरे , प्राथमिक शिक्षण अधिकारी श्रीमती वंदना वळवी तसेच डायट चे प्राचार्य व सर्व स्टाफ, तसेच सुंदरदे गट केंद्र प्रमुख श्री देसले बापु यांच्या मार्गदर्शनाखाली हे प्रशिक्षण सुरू आहे.या प्रशिक्षण केंद्र चे नियंत्रण अधिकारी म्हणून श्री. नरेंद्र पाटील हे काम पाहत आहेत.या प्रशिक्षणासाठी तज्ञ मार्गदर्शक म्हणून श्री.भगवान राजपूत सर,श्री कल्पेश देवरे सर, हितेश वाडेकर सर,उदय प्रकाश पाटील सर हे अत्यंत चांगल्या पध्दतीने सदर प्रशिक्षणाला हजर असलेल्या प्रशिक्षण घेणाऱ्या शिक्षकांना नवीन शैक्षणिक धोरण बाबत चांगले मार्गदर्शन करत असल्याचे शिक्षक शिक्षिका सांगत आहेत. या प्रशिक्षणात राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020, राज्य अभ्यासक्रम आराखडा पायाभूत स्तर 2023, राज्य अभ्यासक्रम आराखडा शालेय शिक्षण 2024, गुणवत्ता मूल्यांकन आणि आश्वासन आराखडा प्रस्तावना व संरचना, शाळा गुणवत्ता मूल्यांकन आणि आश्वासन आराखडा क्षेत्र क्रमांक एक ते सहा, शाळा गुणवत्ता मूल्यांकन आणि आश्वासन आराखडा परिशिष्ट एक ते आठ, समता आधारित अध्ययन व अध्यापन प्रक्रिया, क्षमता आधारित मूल्यांकन संकल्पना, क्षमता आधारित मूल्यांकन कार्यनीती, क्षमता आधारित प्रश्न प्रकार, क्षमता आधारित प्रश्न निर्मिती कौशल्य,विचार प्रवर्तक प्रश्न, गटकार्य अध्ययन निष्पत्तीनुसार प्रश्न निर्मिती, समग्र प्रगती पत्र संकल्पना व पार्श्वभूमी, समग्र प्रगती पत्रक स्तर रोहन स्वरूप, या अभ्यासक्रमावर प्रशिक्षण देण्यात येत आहे.सदर प्रशिक्षण डिजिटल स्क्रीन बोर्ड वरून देण्यात येत आहे. विविध नवीन शैक्षणिक साधने यातून सदर प्रशिक्षण घेण्याचा शासनाचा मानस आहे.सदर प्रशिक्षण मध्ये दुपारी दोन वाजता भोजन व सायंकाळी चार वाजता चहा देखील शिक्षकांना प्रशिक्षण ठिकाणी देण्यात येत आहे.शिक्षक शिक्षिका हे आनंदाने हे प्रशिक्षण घेत असल्याचे सा पोलीस व्हिजन धुळे यांना आढळून आले.