वृत्त प्रतिनिधी : धनंजय गाळणकर
फेब्रुवारी महिन्यात दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा सुरु झाली असून लगेचच दहावीची परीक्षा देखील सुरू होणार आहे. परीक्षा देण्यासाठी पूर्ण जिल्ह्यातून विद्यार्थी शहरातून ग्रामीण भागात व ग्रामीण भागातून शहरात परीक्षा केंद्रावर परीक्षा देण्यासाठी मोठ्या प्रमाणावर ये जा करतात. त्यासाठी परिवहन विभागाच्या बसेसचा मोठ्या प्रमाणावर उपयोग केला जातो. या विद्यार्थ्यांनी परीक्षा केंद्रावर वेळेवर पोहचावे या करिता परीक्षा काळात वेळापत्रक प्रमाणे बसेस सोडण्याचे नियोजन करावे. तसेच परीक्षेच्या कालावधीत लांब व मध्यम पल्ल्याच्या एस. टी. बसेसला जर विद्यार्थ्यांनी हाथ दिला तर त्यांनी सुद्धा विद्यार्थ्यांसाठी बस थांबवावी असे आदेश द्यावेत. ज्यामुळे विद्यार्थी दहावी, बारावीच्या अतिशय महत्वाच्या मानल्या जाणाऱ्या परीक्षेला विद्यार्थी वेळेवर पोहचतील. तसे योग्य ते दिशा निर्देश पूर्ण जिल्ह्यातील सर्व चालक व वाहकांना द्यावेत. अशी मागणी धुळे परिवहन मंडळ विभागीय अधीक्षक प्रवीण पाटील साहेब यांना “मी धुळेकर संघटनेच्या” वतीने निवेदन देऊन मागणी करण्यात आली. यावेळी मी धुळेकरचे अध्यक्ष निरंजन भतवाल, दिनेश वाघ, छोटू भाऊ पोतदार, रफिक शेख, विशाल गायकवाड, फरदिन शेख, आफ्रिदी शेख उपस्थित होते.
