माता भगिनींसाठी मकर संक्रांतीच्या निमित्त मातृ स्नेह मेळावा संपन्न

साक्री….दिनांक 23 1 2026 रोजी न्यू इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय पिंजारझाडी या महाविद्यालयात माता-भगिनींसाठी मकर संक्रांतीच्या पावन परवा निमित्त मातृ स्नेह मेळावा तसेच हळदीकुंकवाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. हा कार्यक्रम मातृत्व माया स्नेह आणि आपुलकीचा असा सर्वसमावेशक सोहळा दिनांक 23/ 1/ 26 रोजी पार पडला त्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे अध्यक्ष म्हणून डॉ .प्रतिभाताई चौरे पिंपळनेर ह्या होत्या. त्यांनी शाळेतील विद्यार्थिनींना तसेच सर्व माता-भगिनींना चांगल्या पद्धतीने समाज प्रबोधनातून मार्गदर्शन केले त्या कार्यक्रमाचे आयोजन सौ ज्योती सुधीर गावित एज्युकेशन सोसायटी पिंजारझाडी संचलित न्यू इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाच्या सचिव यांनी केले . या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती संध्या शेवाळे मॅडम यांनी केले. या कार्यक्रमात शाळेतील विद्यार्थिनींनी आदिवासी लोककलेतील नृत्य , व्यसनमुक्ती वर पथनाट्य, गायन, वादन, सादर केले या कार्यक्रमासाठी गावातील तसेच पंचक्रोशीतील महिलांनी आदिवासी वेशभूषा परिधान करून विविध खेळ खेळले या कार्यक्रमासाठी न्यू इंग्लिश स्कूल पिंजारझाडीचे अध्यक्ष, मुख्याध्यापक, पर्यवेक्षिका मॅडम, तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी बंधू-भगिनींचे मो लाचे सहकार्य लाभले.