पुरोगामी आणि बहुजन आंबेडकरी विचारधारेच्या ज्येष्ठ समाजसेवकांचे धुळे जिल्हा प्रशासनास निवेदन, महापुरुषांबद्दल बेताल वक्तव्य करणारे व्याख्याता राहुल सोलापूरकर यांच्यावर कारवाई करा.

सा पोलीस व्हिजन धुळे,वृत्त प्रतिनिधी- धनंजय गाळणकर
धुळे- पुरोगामी विचार मंच आणि आणि बहुजन आंबेडकरी विचारधारेच्या ज्येष्ठ समाजसेवकांच्या वतीने धुळे जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून राज्याचे मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांना दि. १० फेब्रुवारी रोजी निवेदन देण्यात आले. मनुवादी विचारसरणीचे व्याख्याता राहुल सोलापूरकर यांनी हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवराय आणि घटनाकार परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबाबत बेताल वक्तव्य केले आहे. त्यामुळे पुरोगामी आणि आंबेडकरी समाजाच्या भावना दुखावल्या आहेत. त्यांच्या वक्तव्यामुळे देशात आणि राज्यात कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण होत आहे. तरी व्याख्याता राहुल सोलापूरकर यांच्यावर राष्ट्रीय सुरक्षा कायदा अंतर्गत कठोर कारवाई करण्यात यावी. तसेच त्यांचे भाषण सभा मुलाखती यांवर बंदी घालण्यात यावी. राहुल सोलापूरकर हे मनुवादी विचाराने प्रेरित असलेले व्याख्याते आहेत. प्रसिद्धी झोतात येण्यासाठी ते राष्ट्रपुरुषांबद्दल अपमान जनक आणि बेताल वक्तव्य करत असतात. तरी राज्याचे मुख्यमंत्री म्हणून श्री देवेंद्रजी फडणवीस यांनी त्यांच्या सर्व सभांवर आणि मुलाखतींवर बंदी घालावी तसेच त्यांच्यावर कठोर कारवाई करावी. अशा आशयाचे निवेदन पुरोगामी आणि बहुजन आंबेडकरी विचारधारेच्या ज्येष्ठ समाजसेवकांच्या वतीने धुळे जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून राज्याचे मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांना देण्यात आले. याप्रसंगी बहुजन आणि पुरोगामी विचार मंचचे जेष्ठ कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रा. बाबा हातेकर, संविधान संरक्षण समितीचे अध्यक्ष श्री. हरिश्चंद्र लोंढे, दैनिक आपला महाराष्ट्राचे संपादक हेमंत मदाने‚ ज्येष्ठ पत्रकार रमेश दाणे‚ गो.पी. लांडगे‚ डॉ.पापालाल पवार‚ मनोहर मोहीते‚ पंडितराव बेडसे‚ बी.बी. वानखेडे‚ कॉम्रेड एल. आर. राव, डॉ. श्रीकृष्ण बेडसे, छोटूलाल मोरे, रामकृष्ण शिंदे, रमेश शिरसाठ, धनंजय गाळणकर दीपकुमार साळवे आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *