
पिंपळनेरच्या वरिष्ठ महाविद्यालयात शिक्षक दिन साजरा….. कर्म. आ.मा. पाटील कला,वाणिज्य आणि कै. आण्णासाहेब एन.के.पाटील वरिष्ठ महाविद्यालयात 5 सप्टेंबर शिक्षक दिन व डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन यांची जयंती साजरा करण्यात आली. याप्रसंगी विचार मंचावर महाविद्यालयाचे प्र.प्राचार्य प्रा. के.डी. कदम, सेवानिवृत्त प्रा.डॉ.डब्ल्यू. बी शिरसाठ प्रा.एल. जे.गवळी प्रा. डॉ. एस. एन.तोरवणे उपस्थित होते.प्रमुख वक्ते राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम आधिकारी प्रा.एल.जे.गवळी म्हणाले की डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन बहुआयामी शिक्षक होते जीवनात मानवी वर्तन कसे असावे.म्हणून त्यांच्या जीवनाकडे विद्यार्थ्यांनी बघावे. कार्यक्रमाचे अध्यक्षीय मनोगतात प्राचार्य के. डी.कदम म्हणाले प्रत्येक व्यक्ती लहान,मोठी गुरु असते कारण प्रत्येकाकडून शिकण्यासारखे असते चांगले ते आत्मसात करून आचरणात आणले पाहिजे. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचलन प्रा. डॉ. एस. एन.तोरवणे यांनी केले.चेतना निकुंभ, राऊत सलोनी,पवार सागर,घाणेकर इंद्रायणी, या विद्यार्थ्यांनीही मनोगत व्यक्त केले.कार्यक्रमाचे आभार प्रा.के.एन.वसावे यांनी मानले याप्रसंगी प्रा.के.आर. राऊत, डॉ. एस. पी. खोडके,प्रा.एम. व्ही.बळसाने प्रा. व्ही.जी.उगलमुगले प्रा.डॉ. वाय. एम. नांद्रे, डॉ.एस.एस.मस्के प्रा. डी.बी. जाधव प्रा. सी. एन. घरटे.प्रा. डॉ. ए.जी.खरात डॉ. एन.बी.सोनवणे प्रा. सूर्यवंशी, प्रा.वानखेडे,प्रा.वाघ, प्रा.देसले, प्रा.सोनवणे, प्रा. डॉ. प्रशांत बागुल, शिक्षकेतर कर्मचारी,विद्यार्थी, विद्यार्थिनी उपस्थित होते
