कासारे, ता . 17:
इंदवे येथे दशक्रिया विधीच्या कार्यक्रमानिमित्त मातृ पितृ आचार्य देवो भव स्मृती जागरण सेवाभावी संस्था कावठे तर्फे वृक्षांचे दान व वृक्ष लागवडीचा शुभ संदेश देण्यात आला…!
इंदवे येथील डाॅ. पंडितराव देवरे यांच्या पत्नी व नूतन माध्यमिक विद्यालयाचे विज्ञान शिक्षक तुषार देवरे यांच्या मातोश्री स्व.सौ सरलाबाई पंडितराव देवरे यांच्या दशक्रिया, गंधमुक्तीच्या कार्यक्रमानिमित्त प्राचार्य बी.एस.पाटील यांनी स्थापन केलेल्या संस्थेतर्फे मृत व्यक्तीच्या अस्थि व राखेचे नदीपात्रात व अन्यत्र ठिकाणी विसर्जन न करता त्याऐवजी त्या राखेचे व अस्थींचे पावित्र्य जोपासले जावे व त्या व्यक्तीची त्या झाडाच्या रूपाने कायम स्मृती राहावी म्हणून झाड लावावे व तिथे राख व अस्थि टाकावी.पर्यायाने पर्यावरण संतुलन देखील राखले जाईल असा दूर दृष्टिकोन ठेवून संस्थेतर्फे अशा कार्यक्रमांमध्ये वृक्ष वाटप करण्यात येते.प्राचार्य पाटील यांच्या कुटुंबातील सदस्यांमार्फत दरवर्षी 11000 रुपये देणगीच्या रूपाने जमा करून समाजातील विविध क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करणारे व्यक्तिमत्त्वांचा गौरव करणे,त्यांना जीवन गौरव सारखे पुरस्कार देऊन पुरस्कृत करणे,गुणी जणांचा सन्मान राखणे असे अनेकविध उपक्रम या संस्थेमार्फत राबविले जातात.या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्राचार्य बी.एस.पाटील असून सौ. रत्नमालाताई पाटील उपाध्यक्ष आहेत व त्यांच्या परिवारातील सर्वजण सदस्य आहेत.समाजासाठी चिरंतन काम करणारी ही संस्था आहे.या प्रसंगी श्री.शिवमहाराष्ट्र प्रतिष्ठान संस्थेचे उपाध्यक्ष दिनकरराव उत्तमराव पाटील, माजी सरपंच सुनील देवरे, मुख्याध्यापक बाळकृष्ण तोरवणे, मुख्याध्यापक अनिल साळुंखे, मुख्याध्यापक एच. के. देसले, पर्यवेक्षक व्ही .एम.देवरे उपस्थित होते.
संस्थेकडून होणाऱ्या वृक्ष लागवडीचा संदेश नक्कीच समाजासाठी खूपच प्रेरणादायी व महत्त्वपूर्ण ठरत आहे.आतापर्यंत जवळपास शेकडो मृत व्यक्तींच्या नावाने वृक्ष प्रदान केले गेले.वृक्ष केवळ प्रदान न करता प्रत्यक्ष लागवड करून सदर वृक्षांचे संगोपन करण्यासाठी आग्रह धरला जातो.सदर उपक्रमामुळे पर्यावरणाला मदत तर होतेच परंतु भविष्यात होणारा उष्माघात अशी लाखो करोडो वृक्ष लागवड देशभरात केली गेली तर त्याचा नक्कीच पृथ्वीवरील तापमान कमी होण्यास मदत होईल. म्हणून सदर उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.सदर उपक्रमाबद्दल विविध समाज घटकांकडून संस्थे प्रती गौरवोद्गार काढले जात आहेत.
याप्रसंगी श्री.शिवमहाराष्ट्र प्रतिष्ठान संस्थेचे उपाध्यक्ष दिनकरराव उत्तमराव पाटील,संचालिका प्रमिलाताई देसले माजी सरपंच सुनील देवरे, मुख्याध्यापक बाळकृष्ण तोरवणे, मुख्याध्यापक अनिल साळुंखे, मुख्याध्यापक एच. के. देसले, पर्यवेक्षक व्ही .एम.देवरे उपस्थित होते.

एक. आदर्श उदाहरण…. सलाम आपल्या कार्याला….सा पोलिस व्हिजन धुळे
