धुळे – धुळे जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, धुळे जिल्हा न्यायालय व वकील संघाच्या संयुक्त विद्यमाने आज जागतिक योग दिवस धुळे जिल्हा न्यायालयाच्या आवारात धुळे जिल्हा व सत्र न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश आर.एच.मोहम्मद प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश साहेब धुळे यांच्या प्रमुख उपस्थितीत योग दिवस साजरा करण्यात आला यावेळी न्यायाधीश ख्वाजा सॊ. न्यायाधीश वैभव कुलकर्णी धुळे जिल्हा विधी प्राधिकरणाचे सचिव न्यायाधीश संदीप स्वामी धुळे जिल्हा वकील संघाचे अध्यक्ष एड.रामकृष्ण जोशी ,उपाध्यक्ष एड. मधुकर भिसे यांच्यासह न्यायालयाने वकील व कर्मचाऱ्यांनी योग शिक्षक राजेश सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली योग आसने व प्राणायाम सराव केला यावेळी योगासनातील अनुलोम-विलोम ,पद्मासन चक्रासन, ताड़ासन, शशांकासन, पृष्ठासन , उत्तानपाद आसन,पवनमुक्तासन, त्रिकोणासन व प्राणायाम नाडीशोधन , कपालभाती, भ्रामरी इत्यादि. विविध आसन सहभागीनी केलेत यावेळीसर्व न्यायिक अधिकारी, जिल्हा वकील संघाचे अध्यक्ष व उपाध्यक्ष तसेच वकील व कर्मचारी वृंद बहुसंख्येने उपस्थित होते
