रस्ता वहिवाट वरून दोन शेतकऱ्यांच्या भानगडी अखेर तहसीलदार यांच्या मध्यस्थीने कायमचे मिटले वाद. अंतापुर, ता. २५: सा पोलीस व्हिजन क्राईम न्यूज ब्युरो…अमरावतीपाडा (ता. बागलाण) येथील दोन शेतकऱ्यांचा वहिवाटी बाबत अनेक दिवसांपासून वाद होत होता व वादाचे रूपांतर जोरदार भांडणात होत होते. तहसीलदार कैलास चावडे यांनी सदर वाद सामोपचाराने मिटविल्याने वादावर पडदा पडला आहे.सदर शेतकऱ्यांचा वाद बागलाणचे तहसीलदार कैलास चावडेयांच्याकडे ता.५ जुलै २०२४ रोजी दावा दाखल झाला होता.यात उत्तम शिवराम पानसरे हे वादी आणि काळू मधू गवळी आणि कारभारी निंबा कांदळकर हे प्रतिवादी होते.पहिली तारीख झाल्यानंतर दुसऱ्या तारखेला तहसीलदार चावडे यांनी वादी प्रतिवादी या दोघांचे समुपदेशन करताना सांगितले की,वादविवाद ,कोर्टाच्या तारखा ,दाव्याचा खर्च यामुळे सदर रस्ता मोकळा करायला विलंब होणार आहे. त्यातून दोन्ही शेतकऱ्यांसह घरातील सदस्यांचा संबंध खराब होणार आहेत.शिवाय एकमेका शेजारी सातत्याने राहानारे बांधवांत वितूष्ट निर्माण होणार असल्याने आपण जर सामोपचाराने हा प्रश्न मिटवला तर खटला चालवायची गरज पडणार नाही असे तहसीलदारांनी दोन्ही पक्षकारांना समजावले.यावेळी दोन्ही पक्षकार एकमेकाकडे वेगवेगळे स्वरूपाच्या अटीशर्ती टाकत होते.त्यात तहसीलदार चावडे यांनी स्वतः वेळ देऊन दोघांचे म्हणणे ऐकून दोघांची तडजोड घडवून आणली व एक शेतकरी याने दुसऱ्यासाठी काय करावे आणि दुसऱ्या शेतकऱ्याने पहिल्यासाठी काय करावे याबाबत दोघांमध्ये समेट घडवून देव मामलेदार यांच्या मूर्ती समोर शपथ घेऊन सदरचा वाद हा तडजोडीने मिटविण्यात आला.

यामुळे दोन्ही शेतकरी आनंदित झाले असून त्यांचा अनेक महिन्यांपासून प्रलंबित असलेला वहिवाटीचा वाद संपुष्टात आला आहे.
देव मामलेदार यांची शपथ घेतल्यानंतर तहसीलदार चावडे यांनी आपल्या दालनात स्वतःच दोन्ही शेतकऱ्यांचा शाल, श्रीफळ देऊन सत्कार केला. अशाच पद्धतीने शेतकऱ्यांनी
शेत व रस्त्याचे वाद तडजोडीने जागेवरच मिटवून सुखा समाधानाने राहुन शेती क्षेत्रात उत्तम पद्धतीने प्रगती करावी असे आव्हान चावडे यांनी केले आहे.
(संत देव मामलेदार यशवंतराव महाराज यांच्या पवित्र पुण्यभूमीत आजपर्यंत सर्व विभागातील अनेक उत्तम अधिकारी होऊन गेलेत त्यातील एक कर्तव्यदक्ष आदर्शवत अधिकारी म्हणून सुरुवातीला प्राथमिक शिक्षकाचे काम करून नंतर आपल्या जिद्द व मेहनतीने परीक्षा देऊन कैलास चावडे तहसीलदार म्हणून बागलाण तालुक्याला लाभले आहेत.
त्यांनी आजपर्यंत अशा प्रकारे अनेक शेती व इतर वाद सामोपचाराने मिटवले आहेत.
आपले प्रशासकीय पद सांभाळून शैक्षणिक संस्था ,शाळा ,कॉलेज व इतर ठिकाणी उपस्थित राहून महत्त्वपूर्ण आपल्या विनोदी व मार्मिक शब्दांची रचना करून मार्गदर्शन करीत असल्याने प्रत्येकाच्या हृदयात त्यांनी आपले एक स्थान मिळवले आहे..
खरोखरच जनतेमध्ये मिसळून जनतेचे विविध प्रश्न सोडवून एक प्रशासकीय अधिकारी कसा असावा त्याचे एक उत्तम उदाहरण म्हणजे तहसीलदार कैलासजी चावडे साहेब..सदर बातमीपत्र पत्रकार व निसर्गमित्र श्री अरुणकुमार भामरे , सटाणा यांनी सा पोलीस व्हिजन धुळे यांना कळवले आहे. छायाचित्र… अमरावतीपाडा येथील शेतकऱ्यांनी रस्ता वहिवाटीचे वाद मिटविल्याने त्यांचा शाल, श्रीफळ देऊन सत्कार करताना तहसीलदार कैलास चावडे.(छायाचित्र- अरुणकुमार भामरे)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *