साक्री तालुका माध्यमिक सेवकांची सहकारी पतसंस्था मर्यादित साक्रीच्या चेअरमनपदी दीपक सोनवणे व व्हाईस चेअरमनपदी प्रकाश शेवाळे यांची बिनविरोध निवड

कासारे, ता. 24:सा पोलिस व्हिजन..
साक्री तालुका माध्यमिक सेवकांची सहकारी पतसंस्था मर्यादित साक्रीच्या चेअरमनपदी दीपक सोनवणे व व्हाईस चेअरमनपदी प्रकाश शेवाळे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
साक्री तालुका माध्यमिक शिक्षक पतसंस्थेची पंचवार्षिक निवडणूक सन.2023 ते 2028 या कालावधीसाठी आहे.सदर पंचवार्षिक निवडणुकीतील चेअरमन व व्हाईस चेअरमन पद हे बदलते ठेवले आहे.त्या अनुषंगाने मावळते चेअरमन सुनील क्षीरसागर,व्हाईस चेअरमन कुणाल गांगुर्डे यांनी एक वर्षाचा कार्यकाल संपल्यामुळे निवडणूक निर्णय अधिकारी आर.सी.चौधरी यांच्याकडे राजीनामा सादर केला होता.त्यानुसार निवडणूक निर्णय अधिकारी चौधरी यांनी आज ता. 24 रोजी दुपारी तीन वाजता चेअरमन व व्हा.चेअरमन पदाची निवडणूक प्रक्रियेसाठी विशेष सभा बोलावण्यात आली होती.सदर सभेत चेअरमन पदासाठी दीपक सोनवणे,व्हाईस चेअरमन पदासाठी प्रकाश शेवाळे यांनी नामनिर्देशन पत्र सादर केले होते.चेअरमन पदासाठी सूचक म्हणून सुनील भदाणे व अनुमोदक म्हणून वंदना सोनवणे.व्हा.चेअरमन पदासाठी सूचक म्हणून गायत्री पाटील,अनुमोदक म्हणून बाळकृष्ण तोरवणे हे होते.चेअरमन व व्हा.चेअरमन पदासाठी प्रत्येकी एक नाम निर्देशन पत्र कालावधीत सादर झाल्यामुळे चेअरमन पदासाठी दीपक सोनवणे,व्हा. चेअरमन पदासाठी प्रकाश शेवाळे यांची बिनविरोध निवड निवडणूक निर्णय अधिकारी आर.सी.चौधरी यांनी घोषित केली.सदर निवडीसाठी पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष तथा तज्ञ संचालक जगदीश वाघ, तज्ञ मार्गदर्शक तथा माजी चेअरमन एन.एस.साळुंखे यांनी प्रयत्न केले.निवडीनंतर चेअरमन दीपक सोनवणे,व्हा.चेअरमन प्रकाश शेवाळे यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी जगदीश वाघ,प्राथमिक शिक्षक संघटनेचे राजेंद्र नांद्रे,प्रा.कांतीलाल सोनवणे यांनी मनोगत व्यक्त केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डी.व्ही.सूर्यवंशी यांनी केले.तर आभार खेमचंद नांद्रे यांनी मानले. याप्रसंगी अनिल शिंदे,पूर्णिमा बेडसे,सुनील भदाणे, बापू पाटील,सुभाष गावित,राजेंद्र गांगुर्डे या संचालकांनी निवडीसाठी प्रयत्न केले.निवडणूक यशस्वी करण्यासाठी मानद सचिव ए.पी.दशपुते, सेवक भानुदास बागुल यांनी सहकार्य केले.

सर्व नवनिर्वाचित पदाधिकारी यांचे अभिनंदन व हार्दिक शुभेच्छा