भुसावळ….(सा.पोलीस व्हिजन क्राईम न्यूज ब्युरो)जळगाव मध्ये धरणगाव-एरंडोल तालुक्यात एका बापाने आपल्या मुलाचा खून करून त्याचा मृतदेह धरणामध्ये पुरून स्वतः आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सुसाईड नोट मध्ये या घटनेची त्यांनी माहिती दिली आहे. मृत मुलगा 22 वर्षीय रील स्टार विकी उर्फ हितेश विठ्ठल पाटील आहे. त्याच्या वडीलांचे नाव विठ्ठल सखाराम पाटील आहे. विठ्ठल पाटील माजी सैनिक होते. त्यांनी आत्महत्या करत आयुष्य संपवले आहे.
विठ्ठल पाटील यांनी सुसाईड नोट मध्ये ‘आपण मुलाचा खून केला असून मृतदेह धरणात पुरला आहे.’ असं म्हटलं आहे. पोलिसांनी ही सुसाईड नोट सापडल्यानंतर तपास सुरू केला आणि धरणातून विकीचा मृतदेह बाहेर काढला.
भोरखेडा गावाजवळील धरण परिसरात विकी पाटीलचा मृतदेह पुरलेल्या अवस्थेत आढळला आहे. जेसीबीच्या मदतीने कुजलेल्या अवस्थेत मृतदेह बाहेर काढला. विठ्ठल पाटील यांनी मुलाचा खून करून स्वतः आत्महत्या का केली? याचा उलगडा अद्याप झालेला नाही.
