
अभय माध्यमिक विद्यालय सुंदरदे, येथे भारतीय भाषा उत्सव साजरा. सुंदरदे..(नंदुरबार)…. प्रतिनिधी….. अभय युवा कल्याण केंद्र धुळे संचलित, माध्यमिक विद्यालय सुंदरदे ता जि नंदुरबार येथील शाळेत शालेय विद्यार्थ्यांना भारतीय भाषा उत्सव साजरे करण्याबाबत संपूर्ण मार्गदर्शन करण्यात आले. विद्यालयाचे मुख्याध्यापक बापूसाहेब पी जी शिंदे सर यांनी विद्यार्थ्यांना विविध भाषांतील ओळख व आपल्या संपूर्ण देशामध्ये विविध भाषांचा परिचय असणे सर्व विद्यार्थ्यांना आवश्यक आहे.असे आपल्या मनोगतात सांगितले. बहुभाषिकतेला व भारतीय भाषेतून शिक्षण देणे हे प्रामुख्याने शिक्षण प्रवाहाचे मुख्य कारण आज होऊ शकते. शालेय स्तरावर विद्यार्थ्यांमध्ये भारतीय भाषा आणि साहित्याबद्दल सखोल कृतज्ञता वाढवणे आपली संस्कृतीची ओळख होणे यासाठी भारतीय भाषा उत्सव फार महत्त्वाचा आहे. विद्यार्थ्यांनी आपल्या परिसरातील स्थानिक भाषा, तसेच इतर भाषांमध्ये मराठी गुजराती, इंग्रजी, पंजाबी, मल्याळम, कन्नडी, यांची प्राथमिक ओळख त्यांना असणे गरजेचे आहे. राष्ट्रभाषा हिंदी हिचा जास्तीत जास्त वापर संपूर्ण आपल्या देशामध्ये होतो. ज्या ठिकाणी इतर भाषा आपल्याला बोलता येत नाही समजत नाही त्या ठिकाणी आपण हिंदी आणि इंग्रजीचा वापर करू शकतो. विद्यार्थ्यांनी यावेळी विविध भाषांमध्ये गीत गायन तसेच विविध भाषांमधील पुस्तके वाचन करण्याचा उपक्रम राबवला. यावेळी विद्यार्थ्यांना बहुभाषिक ते बद्दल सुंदरदे केंद्र चे केंद्र प्रमुख बापूसाहेब देसले यांच्या मार्गदर्शनाखाली बहुभाषिक उपक्रम राबवला.विद्यालयातील उपशिक्षक,श्री.पुरुषोत्तम मराठे सर,श्री.पी.जी.साळुंके सर,श्री.एम.एस.पाटील सर,श्री.नंदकिशोर पोटे सर यांनी मार्गदर्शन केले.आभार प्रदर्शन श्रीमती वसावे मॅडम यांनी केले.या कार्यक्रमास सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

