युतीस पळविल्याने तरुणाविरूध्द पोलीसांनी केला गुन्हा दाखल

शहादा.(नंदुरबार प्रतिनिधी)-सध्या मोबाईल मुळे अनेक प्रकारचे कुटुंब उध्वस्त होण्याचे प्रकार वाढले आहेत. आई वडील तरुण मुला मुलींना महागडे मोबाईल घेऊन देतात त्या मोबाईलचा गैरवापर जास्त प्रमाणात होत आहे. भारतीय संस्कृती यातून नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. अशीच एक घटना शहादा येथे घडली. एका तरुण मुलाने लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीला पळवून नेण्याची घटना मामाचे मोहिदे तालुका शहादा येथे घडली. सदर तरुण युवकाने या अल्पवयीन मुलीला विविध आमिषे दाखवून मोठी स्वप्न दाखवून आपल्या प्रेम जाळ्यात अडकवले, आणि तिला पळून नेले. घरच्यांना हा प्रकार जेव्हा कळला त्यांनी तातडीने शहादा पोलीस स्टेशन गाठून सदर तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. शहादा तालुक्यातील मामाचे मोहिदे येथील सागर ब्रिजलाल वाघ यांनी गावातील एका सोळा वर्षीय अल्पवयीन युवतीला पळून नेले आहे लग्नाच्या आम्हीच दाखवून सदर युवतीला पळविले याबाबत युवतीच्या वडिलांनी शहादा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे त्यानुसार सागर बिजलाल वाघ यांच्याविरुद्ध माधवी कलम 363 366 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदर या गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक माधुरी कंखरे करत असुन तपास सुरू आहे असे सा पोलीस व्हिजन यांना कळविले आहे.
सदर युवक युवतींना आपल्या आई-वडिलांनी लहानपणापासून मोठ्या कष्टाने लहानाचे मोठे केले असते. पुढे त्यांचे समाज रुढीपरंपरेनुसार लग्न लावून देण्यासाठी त्यांची मोठी स्वप्न असतात. आपल्या मुलगा असो किंवा मुलगी असो त्यांचे कल्याण व्हावे असेच प्रत्येक आई-वडिलांना वाटत असते. हे तरुणांनी जाणून घेतले पाहिजे. आपल्या आई-वडिलांचे समाजात प्रतिष्ठेचे नाव असते. समाजापुढे आपली शरमेने मान खाली जाऊ नये यासाठी आजच्या तरुण-तरुणींनी आपल्या आई आणि वडिलांसाठी व आपल्या कुटुंबासाठी असे चुकीचे मार्ग अवलंबणे योग्य नव्हे असा संदेश देखील समाजाकडून देण्यात येत आहे. तरुण-तरुणी योग्य वयात आल्यावर तसेच त्यांना उदरनिर्वाहाचे साधन पूर्ण झाल्यावर निश्चितच योग्य वधू वर यांचा विवाह समाज करून देत असतो आपले कुटुंब करून देत असते याचा आजच्या तरुणांनी विचार केला पाहिजे या घटनेतुन हेच शिकलं पाहिजे.
बातमी पत्र वाचा सा पोलीस व्हिजन धुळे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *