धुळे…. कोणत्याही यशस्वी माणसांना पुरस्कारांनी सन्मानित करून समाजामध्ये स्थान मोठे केल्याने ते अजून आपल्या कामाची उंची वाढवण्यासाठी प्रयत्न करत असतात. त्यांच्या कामात अँक्युरीशी निर्माण होते. काम करणाऱ्याला एक नवी ऊर्जा निर्माण होते. याचप्रमाणे अहमदनगर जिल्ह्यातील अशीच एक महान व्यक्ती म्हणून ज्यांची ओळख आहे असे, डॉ. सी. ए. शंकर अंदानी हे २००६ पासून अहमदनगर महानगरपालिका चे कर सल्लागार म्हणून कार्यरत आहेत, ते सन २००८ पासून श्री साई बाबा संस्थान ट्रस्ट शिर्डी चे कर सल्लागार, तर ते सध्या ५२१ विविध धार्मिक स्थळे , मंदिरे, मस्जिद, गुरुद्वारा यांचे कामकाज विनामुल्य करीत आहेत. तसेच ५११ शेतकरी उत्पादक पुरक कंपनी निर्माण करण्यासाठी सहकार्य करीत आहेत. त्यांच्या या सेवाभावी कामामुळे आज ५ लाखा पेक्षा जास्त शेतकरी विविध योजनांचा लाभ घेत आहेत. आज पर्यंत त्यांना १६१० आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झाले आहेत. त्यांना ६४ मानद डॉक्टरेट प्राप्त , व ८४ वल्ड रेकॉर्ड नोंद असलेले ते एकमेव भारतीय आहेत.जात व धर्म विरहित समाजसेवा केल्यामुळे सदर नामांकन मंजूर झाले आहे. त्यांच्या या कार्याबद्दल सर्व जनमानसात मधून आनंद व्यक्त करण्यात येत आहे. बातमीपत्र वाचा साप्ताहिक पोलीस व्हिजन धुळे.
