जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेत सन्मती मतिमंद विद्यालयाचे घवघवीत यश….

    धुळे…सा पोलीस व्हिजन न्युज…महाराष्ट्र शासन अंतर्गत दिव्यांग कल्याण मंत्रालयामार्फत आयोजित दिव्यांग विद्यार्थ्यांच्या जिल्हा स्तरीय क्रीडा स्पर्धेत दि.१४/०२/२०२४ रोजी वेगवेगळ्या स्पर्धेमध्ये श्री राधेगोविंद बहुउद्देशिय संस्था धुळे संचलित सन्मती मतिमंद मुलामुलींच्या शाळेतील विद्यार्थ्यांनी घवघवीत यश मिळवले

            महाराष्ट्र शासन दिव्यांग कल्याण विभागाच्या वतीने जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धा धुळे येथील जिल्हा क्रीडा संकुल येथे आयोजित करण्यात आल्या होत्या सदर क्रीडा स्पर्धेत श्री राधेगोविंद बहुउद्देशिय संस्था धुळे संचलित सन्मती मतिमंद मुलामुलींची शाळा धुळे येथिल विद्यार्थीनी कु. कुसुम मनोज मराठे या विदयार्थीनीने १०० मीटर धावण्याच्या स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावला तसेच लांब उडी या खेळात द्वितीय क्रमांक पटकावला. तसेच कु. भूमिका प्रविण खोंडे( ५० मीटर धावणे) ,   कु. गीतांजली भानुदास चित्ते ( सॉफ्ट बॉल थ्रो) , चि. जैद बेग मिर्झा( ५० मीटर धावणे) , चि. दिपक पाटील( गोळा फेक) , चि. दिव्येश आबा पाटील (गोळा फेक) या विद्यार्थ्यांनी द्वितीय क्रमांक पटकावला विजेत्या स्पर्धकांना जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा ताईसो धरती देवरे, पशुसंवर्धन व दुग्ध संवर्धन सभापती श्री हर्षवर्धन दहिते, समाज कल्याण अधिकारी श्री मनीष पवार साहेब व वै. सा. का पावरा साहेब या मान्यवरांच्या हस्ते सुवर्ण व रौप्य पदक देऊन गौरविण्यात आले स्पर्धक विद्यार्थ्यांना मार्गदर्शन श्रीमती. स्मिता मुर्तडक मॅडम, सौ. साधना पाटील मॅडम श्री. रूपेश माळी सर व श्री रावसाहेब बेडसे  आदींनी केले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *