अकोला येथे काँग्रेस शिक्षक सेलच्या वतीने राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार 2023 मान्यवरांच्या उपस्थितीत सोहळा उत्साहात संपन्न

धुळे….. (बातमी पत्र सा पोलीस व्हिजन धुळे)..महाराष्ट्र राज्यातील संपूर्ण जिल्ह्यातील विविध माध्यमिक शाळा प्राथमिक शाळा येथील विद्यार्थ्यांना ज्ञानदान करणाऱ्या उत्कृष्ट शिक्षकांची निवड करून त्यांचा उचित सन्मान व्हायला पाहिजे ही राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या वरिष्ठांची इच्छा होती. या निमित्ताने आज 5 सप्टेंबर 2023 रोजी विविध क्षेत्रातील कार्य करीत असलेल्या शिक्षकांना राष्ट्रीय काँग्रेस शिक्षक सेल महाराष्ट्र राज्य शाखा अकोला यांच्या वतीने राज्यातील विविध क्षेत्रातील ज्या शिक्षकांनी ज्ञानदान व सोबतच सामाजिक काम देखील केलेले आहे. अशा शिक्षकांची निवड करून राज्यातील विविध जिल्ह्यांतील आदर्श शिक्षकांना मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार वितरीत करण्यात आले.सदर कार्यक्रम नवीन बस स्टॅन्ड समोर स्वराज्य भवन मध्ये या पुरस्कार सोहळ्यास माननीय श्री धीरज भाऊ लिंगाडे आमदार पदवीधर मतदारसंघ अमरावती, माननीय श्री प्रकाश भाऊ तायडे सचिव महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी, माननीय श्री किरण दादा सरनाईक आमदार शिक्षक मतदार संघ अमरावती, माननीय श्री प्रकाश जी सोनवणे प्रदेशाध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस शिक्षक सेल, माननीय डॉक्टर प्रशांत पाटील जिल्हाध्यक्ष शहर काँग्रेस कमिटी अकोला, माननीय श्री अशोक जी अमानकर जिल्हा अध्यक्ष ग्रामीण काँग्रेस कमिटी अकोला, माननीय श्री विजय भाऊ ठोकळ अध्यक्ष विदर्भ माध्यमिक शिक्षक संघ अकोला, माननीय श्री अमित बोबडे विभागीय अध्यक्ष काँग्रेस शिक्षक सेल अमरावती, माननीय साजिद भाई पठाण माजी विरोधी पक्षनेते मनपा अकोला, माननीय श्री प्रदीप शेवतकर उपाध्यक्ष काँग्रेस शिक्षक सेल अमरावती, माननीय श्री सुधाकर वाहूरवाघ, उपाध्यक्ष अमरावती विभाग, माननीय श्री संजय देशमुख महासचिव महा काँग्रेस शिक्षक सेल, या प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत हा राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण सोहळा उत्साहात साजरा झाला आहे. या पुरस्कार सोहळ्याला महाराष्ट्र राज्य कला शिक्षक महासंघाचे प्रदेशाध्यक्ष माननीय प्रल्हाद साळुंखे यांची उपस्थिती होती.त्यांनी महाराष्ट्रातील कला शिक्षकांसाठी मोठे कार्य केले आहे म्हणून त्यांना आदर्श शिक्षक राज्यस्तरीय पुरस्कार देऊन या वेळी सन्माननीत करण्यात आले.या पुरस्कार सोहळ्याचे आयोजक माननीय श्री सुयोग खडसे जिल्हा अध्यक्ष काँग्रेस शिक्षक सेल, माननीय प्राध्यापक डॉक्टर नितीन देऊळकार, जिल्हा उपाध्यक्ष, माननीय श्री सुनील जाधव महासचिव व समन्वयक महाराष्ट्र राज्य काँग्रेस शिक्षक सेल, माननीय प्राध्यापक शेख उबेद जागीरदार महासचिव काँग्रेस शिक्षक सेल, माननीय श्री संदीप सेवलकार महासचिव काँग्रेस शिक्षक सेल, सय्यद नासित अली पदाधिकारी शिक्षक सेल,अमृत पवार माननीय संजय बारतासे यांनी सदर सोहळा उत्तम रीतीने आयोजित केला.सदर पुरस्कार सोहळा काँग्रेस शिक्षक सेल अकोला या शाखेच्या वतीने करण्यात आला होता.या सोहळ्याला सहपरिवार उपस्थित राहण्याचे आवाहन काँग्रेस शिक्षक सेल अकोला शाखा पदाधिकारी यांनी केलेले होते.म्हणुन प्रचंड गर्दी देखील झाली होती.मान्यवरांनी शिक्षक खरा समाज सुधारक आहे.देशातील खराब झालेले राजकारण, जातिभेदाचे व पक्ष फोडाफोडीचे, प्रत्येक विभाग खासगी करण करणे, शिक्षकांना जुनी पेन्शन नाकारणे शिक्षकांचे पदभरती बाबत चुकीचे धोरण बाबत शासनाला दोषी धरता आता शिक्षकांनीच या समाजाला जागृत करून नवी दिशा द्यावी असे मनोगतातून आपल्या भावना प्रकट केल्या.कार्यक्रम यशस्वी संप्पन्न झाला.बातमी पत्र…यश साळुंके सा पोलीस व्हिजन धुळे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *